What is the REM sleep?: चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. चांगल्या झोपेसाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा असला तरी झोप येत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. फोनच्या व्यसनामुळे आणि सोशल मीडिया आणि टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे आजकाल बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यामुळे त्यांना चांगली झोप लागत नाही आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चांगली झोप प्रत्येकासाठी आवश्यक आहे, परंतु काही वेळा अतिरिक्त कामांमुळे किंवा जे लोक नाईट शिफ्टमध्ये काम करतात, अशांना योग्य वेळी झोप घेणे शक्य होत नाही; अशावेळी ते सकाळी झोपतात. अशा लोकांना “आरईएम” झोपेचा इतरांप्रमाणे प्रभावीपणे अनुभव घेता येऊ शकतो का? तसेच नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांनी झोप पूर्ण करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, जाणून घेऊयात.

REM ही झोपेची अवस्था आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती गाढ झोपेत असताना स्वप्न पाहत असते. या अवस्थेत ब्रेन स्टेम मेंदूला संदेश पाठवते, जेणेकरून शरीराच्या इतर भागांनाही आराम मिळू शकेल. मात्र, सकाळी झोपणाऱ्यांना “आरईएम” झोपेचा अनुभव घेता येतो का? या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मुंबईतील सर एचएन रिलायन्स हॉस्पिटलचे डेप्युटी कन्सल्टंट – न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर इशू गोयल आणि ग्रेटर नोएडा येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार बालरोगतज्ज्ञ, डॉ. प्रशांत यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
Common lifting mistakes and how to avoid them
Lifting Heavy Objects Tips : जड वस्तू उचलताना तुम्हीसुद्धा श्वास रोखून ठेवता का? मग थांबा! डॉक्टरांचा हा सल्ला वाचा

ग्रेटर नोएडा येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार बालरोगतज्ज्ञ, डॉ. प्रशांत सांगतात, “होय, लोकांना सकाळीही आरईएम झोपेचा अनुभव येतो. मात्र, हे तुमच्या झोपेच्या कालावधी आणि गुणवत्तेवर अवलंबून आहे. REM स्लीप ही मुख्यतः झोपेच्या सुरुवातीच्या ९० मिनिटांत येते. त्यामुळे झोप नाही तर गाढ झोप घेणं आहे गरजेचं आहे, जी रात्रीच्या वेळेतच व्यवस्थित मिळते. झोपेच्या सुरुवातीच्या या टप्प्यात मेंदूची क्रिया जशी जागृत असताना होती तशीच सामान्य असते, पण शरीर निचपीत पडून असते आणि फक्त मेंदूचं काम सुरु असतं.” “REM स्लीप मेमरी एकत्रीकरणात, तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी, तुमची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्यासाठीही मदत करते.

डॉ. इशू गोयल यांच्या मते, झोपेमध्ये सरासरी सहा-सात चक्रे असतात आणि प्रत्येक चक्रात वेगवेगळे टप्पे असतात. जसे की, नॉन रॅपिड आय मूव्हमेंट (NREM) या प्रकारांमधून आपण वन रॅपिड आय मूव्हमेंट (REM) या प्रकारामध्ये जातो. त्यानंतर गाढ झोप हा तिसरा प्रकार असतो. हा कालावधी सर्वसाधारणपणे ९० मिनिटांचा असतो.” REM स्लीपमध्ये मेंदू दिवसा मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी आणि दीर्घकालीन आणि अल्पकालीन स्मृती तयार करण्यासाठी सक्रियपणे कार्य करतो. जर एखाद्या व्यक्तीची झोप अपुरी असेल किंवा REM स्लीप मिळत नसेल तर अशा व्यक्तिंना स्मृतिभ्रंश होऊ शकतो. किंवा स्मरणशक्ती, थकवा, दिवसा झोप लागणे आणि वारंवार डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.”

हेही वाचा >> उद्या खूप दमछाक होणार आहे? मग आजच ‘अशी’ पूर्ण करा झोप; खेळाडूंचा हा फंडा एकदा वापरून पाहाच

जेव्हा तुम्ही रात्री झोपत नाही तेव्हा काय होते?

डॉ. प्रशांत म्हणाले की, रात्री झोपणे टाळल्याने लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. तुम्हाला स्मरणशक्तीच्या समस्या, कार्य कमी होणे, अपचन, मूड बदलणे असा त्रास होऊ शकतो. यावेळी रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. सकाळची झोप रात्रीच्या झोपेची भरपाई करू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला नाईट शिफ्टमुळे रात्रीचे जागरण करावेच लागत असेल तर चांगल्या झोपेसाठी वातावरण अनुकूल आहे, याची खात्री करणे आवश्यक आहे.

डॉ. गोयल सांगतात, “झोपण्यापूर्वी कॅफीन, अल्कोहोल, धूम्रपान यांसारखे उत्तेजक पदार्थ शक्यतो टाळले पाहिजेत. रात्रीच्या शिफ्टमध्येही लोकांनी झोपेची एकूण आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अर्धा तास, एक तास डुलकी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.