What is the REM sleep?: चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. चांगल्या झोपेसाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा असला तरी झोप येत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. फोनच्या व्यसनामुळे आणि सोशल मीडिया आणि टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे आजकाल बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यामुळे त्यांना चांगली झोप लागत नाही आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चांगली झोप प्रत्येकासाठी आवश्यक आहे, परंतु काही वेळा अतिरिक्त कामांमुळे किंवा जे लोक नाईट शिफ्टमध्ये काम करतात, अशांना योग्य वेळी झोप घेणे शक्य होत नाही; अशावेळी ते सकाळी झोपतात. अशा लोकांना “आरईएम” झोपेचा इतरांप्रमाणे प्रभावीपणे अनुभव घेता येऊ शकतो का? तसेच नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांनी झोप पूर्ण करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, जाणून घेऊयात.

REM ही झोपेची अवस्था आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती गाढ झोपेत असताना स्वप्न पाहत असते. या अवस्थेत ब्रेन स्टेम मेंदूला संदेश पाठवते, जेणेकरून शरीराच्या इतर भागांनाही आराम मिळू शकेल. मात्र, सकाळी झोपणाऱ्यांना “आरईएम” झोपेचा अनुभव घेता येतो का? या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मुंबईतील सर एचएन रिलायन्स हॉस्पिटलचे डेप्युटी कन्सल्टंट – न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर इशू गोयल आणि ग्रेटर नोएडा येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार बालरोगतज्ज्ञ, डॉ. प्रशांत यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

ग्रेटर नोएडा येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार बालरोगतज्ज्ञ, डॉ. प्रशांत सांगतात, “होय, लोकांना सकाळीही आरईएम झोपेचा अनुभव येतो. मात्र, हे तुमच्या झोपेच्या कालावधी आणि गुणवत्तेवर अवलंबून आहे. REM स्लीप ही मुख्यतः झोपेच्या सुरुवातीच्या ९० मिनिटांत येते. या टप्प्यात मेंदूची क्रिया जशी जागृत असताना होती तशीच सामान्य असते, पण शरीर अर्धांगवायूच्या अवस्थेत राहते.” “REM स्लीप मेमरी एकत्रीकरणात, तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी, तुमची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्यासाठीही मदत करते.

डॉ. इशू गोयल यांच्या मते, झोपेमध्ये सरासरी सहा-सात चक्रे असतात आणि प्रत्येक चक्रात वेगवेगळे टप्पे असतात. जसे की, नॉन रॅपिड आय मूव्हमेंट (NREM) या प्रकारांमधून आपण वन रॅपिड आय मूव्हमेंट (REM) या प्रकारामध्ये जातो. त्यानंतर गाढ झोप हा तिसरा प्रकार असतो. हा कालावधी सर्वसाधारणपणे ९० मिनिटांचा असतो.” REM स्लीपमध्ये मेंदू दिवसा मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी आणि दीर्घकालीन आणि अल्पकालीन स्मृती तयार करण्यासाठी सक्रियपणे कार्य करतो. जर एखाद्या व्यक्तीची झोप अपुरी असेल तर त्याला स्मरणशक्ती, थकवा, दिवसा झोप लागणे आणि वारंवार डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.”

हेही वाचा >> उद्या खूप दमछाक होणार आहे? मग आजच ‘अशी’ पूर्ण करा झोप; खेळाडूंचा हा फंडा एकदा वापरून पाहाच

जेव्हा तुम्ही रात्री झोपत नाही तेव्हा काय होते?

डॉ. प्रशांत म्हणाले की, रात्री झोपणे टाळल्याने लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. तुम्हाला स्मरणशक्तीच्या समस्या, कार्य कमी होणे, अपचन, मूड बदलणे असा त्रास होऊ शकतो. यावेळी रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. सकाळची झोप रात्रीच्या झोपेची भरपाई करू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला नाईट शिफ्टमुळे रात्रीचे जागरण करावेच लागत असेल तर चांगल्या झोपेसाठी वातावरण अनुकूल आहे, याची खात्री करणे आवश्यक आहे.

डॉ. गोयल सांगतात, “झोपण्यापूर्वी कॅफीन, अल्कोहोल, धूम्रपान यांसारखे उत्तेजक पदार्थ शक्यतो टाळले पाहिजेत. रात्रीच्या शिफ्टमध्येही लोकांनी झोपेची एकूण आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अर्धा तास, एक तास डुलकी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.