Nightmares Linked To Dementia : जर तुमचेही मूल वाईट स्वप्नांमुळे जागे होत असेल तर त्याचा पार्किन्सनचा धोका वाढू शकतो, पार्किन्सन आजार हा एक प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर आहे, जो नर्व सेल्सच्या डिजनरेशनमुळे होते. त्यामुळे आरोग्याचा समतोल साधणे कठीण होते. इतकेच नाही तर पार्किन्सन आजारामुळे हात, पाय आणि जबड्याला कंप सुटतो. याशिवाय शरीराच्या हालचाली संथगतीने सुरू राहतात. बर्मिंगहॅम सिटी हॉस्पिटलमध्ये अलीकडील एक संशोधन झाले. ज्यात असे दिसून आले की, लहान वयात जर वारंवार भयानक स्वप्ने पडत असतील तर ते स्मृतिभ्रंश आणि पार्किन्सन आजाराचे कारण ठरू शकते. यामुळे कमी वयातच हे आजार होण्याची शक्यता वाढते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संशोधनात ७ ते ११ वर्षे वयोगटातील ६९९१ मुलांचा समावेश होता. या वयात त्यांना पडत असलेल्या भयानक स्वप्नांचे मूल्यांकन करण्यात आले. संशोधनात असे आढळले की, ज्या मुलांना भयानक स्वप्ने पडत नाहीत, त्यांच्या तुलनेत ज्या मुलांना वारंवार त्रासदायक किंवा भयानक स्वप्ने पडतात, त्यांना वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत पार्किन्सन आजार होण्याची शक्यता ८५ टक्क्यांनी अधिक असते.

हेही वाचा : चमत्कारच! आईच्या पोटातच बाळाच्या मेंदूवर झाली शस्त्रक्रिया, दोन दिवसांनी झाला त्याचा जन्म
आरोग्यतज्ज्ञ काय म्हणतात?

आरोग्यतज्ज्ञांनी असे म्हटले की, काही लोकांसाठी भयानक स्वप्ने हे पार्किन्सन रोग, स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. हा आजार मेंदूच्या समोरील उजव्या भागात न्यूरोडिजनरेशनमुळे होतो. जो रॅपिड आय मूव्हमेंट झोपेच्या दरम्यान नकारात्मक भावना कमी करण्यासाठी (REM) आवश्यक आहे.

पालकांनी काळजी कशी घ्यावी?

वाईट स्वप्नांमुळे मुलांना झोपेत अनेक अडचणी येतात, यामुळे घाबरून, अस्वस्थ वाटल्याने मुलांना पटकन जाग येते. मुलांना स्वप्नात राक्षस, कोळी किंवा भयानक शार्क आणि काही अप्रिय घटना दिसतात. तज्ज्ञांच्या मते, मध्यरात्री भयानक स्वप्ने पडण्याची समस्या सर्व वयोगटातील मुलांमध्ये सामान्य आहे. विशेषत: १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये हे लक्षण दिसते.

अशा परिस्थितीत पालकांनी मुलांशी वेळोवेळी बोलावे, त्यांना सर्व काही ठीक आहे याची खात्री करून द्यावी, मुलांना मोबाइल आणि इतर गॅझेटच्या कमी संपर्कात येण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांसोबत जास्त वेळ घालवावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nightmares during childhood may increase the risk of this disease sjr
Show comments