Nitin Gadkari Exercise Routine: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अगदी चमत्कारिक वेट लॉस करून अनेकांना थक्क केले आहे. केवळ वजनच नव्हे तर एकूणच गडकरींच्या तब्येतीत सुधार दिसून येत आहे. करोनानंतर गडकरींनी आपल्या जीवनशैलीत केलेले काही बदल त्यांनी अलीकडेच इंडीयन एक्स्प्रेस अड्ड्यावर बोलून दाखवले. १३५ वरून ८९ आणलेलं वजन आणि श्र्वसन संबंधित तक्रारी दूर करण्यासाठी योगा, प्राणायाम व व्यायामाची मदत झाल्याचे गडकरी सांगतात. पैसे हे जीवनाचं साधन आहे ध्येय नाही असं म्हणत गडकरींनी सर्वांना व्यायामाचे फायदे पटवून दिले आहेत शिवाय आपल्या रूटीनमध्ये गडकरी कोणते व्यायाम करतात हे ही त्यांनी सांगितले आहे. चला तर पाहुयात काही सोप्या व्यायामाच्या झटपट पद्धती…

नितीन गडकरी कोणते व्यायाम करतात?

गडकरी म्हणतात की सकाळी श्वसन संबंधित व्यायाम म्हणजेच प्राणायाम करूनही ताजेतवाने वाटते. या व्यायामांनी दमा व खोकला, कफ असे त्रासही कमी झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

When's The Best Time To Eat Rice? to burn fats and calories also keeps blood sugar in control health tips
मंडळी आता भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दररोज किती तास व्‍यायाम करावा? (फोटो सौजन्य @Freepik)
Heart Attack Exercise : हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दररोज किती तास व्‍यायाम करावा?
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
A 6-6-6 walking regimen will improve your health Experts
६-६-६ चालण्याचा नियम तुमच्या आरोग्य सुधारेल; तज्ज्ञांनीही सांगितले जबरदस्त फायदे…
Rohit Roy talks about diet
२५ दिवसांत १६ किलो वजन घटवलं अन्…; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “मी अत्यंत मूर्खासारखा…”
Ram Kapoor recently shared his personal struggles with weight loss,
“दोनदा ३० किलो वजन कमी केले पण पुन्हा ‘जैसे थे’! नेमके चुकले कुठे? राम कपूरने केला खुलासा, तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Prashant Kishor
Prashant Kishor Hospitalised : आमरण उपोषणादरम्यान प्रशांत किशोर यांची प्रकृती ढासळली; रुग्णालयात केलं दाखल

1) श्वासावर नियंत्रण

या व्यायामात आपल्याला आपल्या श्वासावर कसे नियंत्रण ठेवायचे याचा सराव करता येतो. यासाठी आधी नाकावाटे मोठा श्वास भरून घ्या व नंतर छाती व पोटात काही सेकंद श्वास रोखून नाकावाटेच श्वास बाहेर सोडा.

2) लीप ब्रिदिंग

यामुळे तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढीस लागते. यासाठी नाकावाटे श्वास घ्या व जसे आपण गरम चहाला फुंकर घालतो तशाच पद्धतीने तोंडावाटे हळू हळू श्वास सोडा. हे आपण १५ वेळा करू शकता.

3) मेणबत्तीचा व्यायाम (Candle Blow Exercise)

या व्यायामाने श्वासनलिकेत अडकलेला कफ निघून जाण्यास मदत होते. यासाठी नाकाने मोठा श्वास घ्या आणि मग एकाच वेळेत खूप मेणबत्त्या विझवल्याप्रमाणे श्वास बाहेर सोडा. असे निदान १० वेळा करावे.

4) थोरेसिक एक्सपान्शन व्यवसाय (Thoracic Expansion Exercises)

या व्यायामाने फुफ्फुसांमध्ये अडकलेला कफ निघून जाण्यास मदत होते. सर्दीने जर नाक बंद झाले असेल तर त्यातही आराम मिळू शकतो. नाकाने मोठा श्वास घ्या शक्य होईल त्याच्या एक सेकंदाच्या आधीच श्वास पुन्हा तोंडाने सोडून द्या. हा व्यायाम १० वेळा करावा.

5) फुगा फुगवण्याचा व्यायाम (Balloon Blowing Exercise)

नाकाने मोठा श्वास घ्या व एखादा फुगा घेऊन एकाच श्वासात फुगवण्याचा प्रयत्न करा. यामुळे फुफ्फुसे सक्रिय होऊन तुम्हाला श्वसनाचे त्रास असल्यास आराम मिळेल.

हे ही वाचा<< नितीन गडकरी यांनी ताज हॉटेलमध्ये शेफला पगार विचारला; म्हणतात, “रोज संध्याकाळी ७ नंतर मी..”

6) थोरेसिक मोबॅलिटी व्यायाम (Thoracic Mobility Exercises)

तुम्ही जसा श्वास घ्याल तेव्हा दोन्ही हात वरच्या बाजूने उचला व जेव्हा तुम्ही श्वास सोडाल तेव्हा हात खाली आणा. यामुळे फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. हा व्यायाम निदान १५ वेळा करावा.

7) सेगमेंटल एक्स्पान्शन व्यायाम (Segmental Expansion Exercise)

या व्यायामा आपल्याला पोटाला तीन ठिकाणी बेल्टने बांधायचे आहे. जास्त दाब देऊ नका. जसा तुम्ही नाकाने श्वास सोडाल तसा एक एक कपडा सोडा. हा व्यायाम प्रत्येक लेव्हलवर ५ वेळा करावा.

या व्यायामाच्या मदतीने नितीन गडकरी यांना जरी फायदा झाला असला तरी तुम्ही वैद्यकीय सल्ला घेऊनच हे व्यायाम करावेत.

Story img Loader