..आणि कोव्हिडची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. दर महिन्या दोन महिन्यांनी कोव्हिडचे नवे बाळ आपल्याला भेटायला येते आहे. आता जे.एन. १ हे कोविडचे नवे बाळ आपल्या अंगणात आले आहे. मूळात हे नवे बाळ ओमायक्रॉन कुटुंबातीलच आहे. आपण नियमितपणे कोव्हिड विषाणूंचे जनुकीय क्रमनिर्धारण करतो आहोत आणि त्यामुळे विषाणूंमध्ये होणारे जनुकीय बदल आपल्याला लगोलग कळत आहेत. जे एन .१ हा नवा विषाणू प्रकार मुळात फार काळजी करावा असा नाही. सध्या अमेरिका, चीन, सिंगापूर आणि भारतात हा नवा विषाणू आढळून आलेला आहे. जागतिक आरोग्य संघटना याला व्हेरियंट ऑफ कंसर्न म्हणजे काळजी करावा असा व्हेरियंट म्हणत नाही कारण या नव्या विषाणू प्रकारामुळे आजार प्रसाराचा वेग जरी वाढत असला तरी त्याचा संसर्ग घातक नाही. एकूणात सौम्य स्वरुपाचा संसर्ग होताना दिसतो आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुळात कोव्हिड विषाणू आता आपल्या वातावरणात स्थिरावला आहे. शास्त्रीय भाषेत सांगायचे म्हणजे हा विषाणू एंडेमिक झाला आहे त्यामुळे हवामानानुसार त्यामध्ये वाढ आणि घट होऊ शकते. सध्या देशासह राज्यात शीतलहर सुरु आहे. या सीझनल बदलामुळे इन्फ्ल्युएंझा , कोविड आजारामध्ये वाढ होते आहे. त्यामुळे आता कोव्हिड रुग्णांमध्ये काही प्रमाणात जी वाढ होताना दिसते आहे ती केवळ जे.एन. ७ मुळे आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. या वाढीमध्ये हवामानविषयक घटकांचा वाटा मोठा आहे. येणाऱ्या काळातही इन्फ्ल्युएंझाप्रमाणे कोव्हिडदेखील पावसाळा आणि हिवाळयात काही प्रमाणात वाढू शकतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
हेही वाचा : घरातल्या जवळच्या माणसाला नैराश्य आल्याचं कसं ओळखावं, त्याच्याशी कसं वागावं? जाणून घ्या
स्वतःच्या जनुकीय रचनेमध्ये सातत्याने बदल करत राहणे हा विषाणूच्या जीवनक्रमातील नैसर्गिक भाग आहे. विषाणूला स्वतःची संख्या वाढविण्यासाठी एका सजीव पेशीची गरज असते. या सजीव पेशीतील संसाधनाच्या मदतीने विषाणू स्वतःची संख्या वाढवत असतो. विषाणूंची संख्यात्मक वाढ होत असताना त्यामध्ये काही चुका जाणता अजाणता होतात, त्यालाच आपण म्युटेशन असे म्हणतो. विषाणूंच्या जनुकीय रचनेची तुलना आपण एखाद्या विटांनी बांधलेल्या भिंतीशी केली तर प्रत्येक वीट म्हणजे एक अमिनो ऍसिड असते आणि यातील अमिनो ऍसिडचा क्रम बदलणे म्हणजेच वेगळी वीट वेगळ्या ठिकाणी लावली जाणे याला आपण म्युटेशन म्हणतो. म्युटेशनद्वारा होणारा प्रत्येक बदल हा महत्त्वपूर्ण असतो असे नव्हे, अनेकदा जनुकीय रचनेमध्ये होणारे बदल हे किरकोळ स्वरूपाचे असतात. विषाणूच्या स्पाईक प्रोटीनमध्ये होणारे बदल अधिक महत्त्वाचे असतात कारण स्पाईक प्रोटीनच्या मदतीने विषाणू मानवी शरीरातील रिसेप्टर सोबत जोडला जातो, फुफ्फुसातील पेशींना चिकटतो. त्यामुळे या प्रथिनातील बदल अधिक महत्त्वाचे असतात.
हेही वाचा : आठवड्यातून तीन दिवस ढोकळा खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? आहारतज्ज्ञ म्हणाल्या…
विषाणू आपली जनुकीय रचना बदलतो तेव्हा त्याचा काय परिणाम होतो? जनुकीय रचना बदलल्यामुळे विषाणूला काहीवेळा नवे गुणधर्म प्राप्त होऊ शकतात. काही वेळा हे बदल विषाणू प्रसारास सहाय्यभूत ठरतात किंवा काही वेळा प्रसाराचा वेग मंदावतो देखील. काही विशिष्ट बदलांमुळे विषाणू मानवी शरीरातील कोणत्या अवयवावर हल्ला करेल, याचे स्वरूप देखील बदलू शकते.तसेच विषाणूच्या घातकतेमध्ये देखील बदल होऊ शकतात. पण सुदैवाने जे.एन.१ या व्हेरियंटमुळे प्रसाराचा वेग वाढण्याशिवाय काही वावगे घडताना दिसत नाही. त्यामुळे पॅनिकची गरज नाही. भीती अजिबात नको आहे.
हेही वाचा : मला सर्दी, ताप आहे की Covid JN.1, फरक कसा ओळखावा? तज्ज्ञांनी सांगितली नवी लक्षणे, उपचार
पण भीती नको असे म्हणताना येणारा ख्रिसमस आणि नववर्षाचा काळ लक्षात घेता काळजी घेणे मात्र अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः ज्यांना डायबिटिस, उच्च रक्तदाब, कर्करोग किंवा असे अतिजोखमीचे आजार आहेत आणि ज्यांचे वय साठीच्या पुढे आहे त्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे, ज्यांना फ्ल्यू सारखी लक्षणे आहेत त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात जाणे टाळायला हवे आणि विनाकारण एकमेकांना घाबरवणारे खोटे मेसेज फॉरवर्ड करणेही टाळले पाहिजे. प्रत्यक्ष रोगापेक्षा सोशल मीडियामधून पसरणारे इन्फोडेमिक अनेकदा पॅंडेमिक किंवा इपिडेमिकपेक्षा भयावह असते आणि कोणताही विषाणू नव्हे तर आपणच ते पसरवत असतो.
कोव्हिड काय कोणताही विषाणू हा बहुरुपीच असतो. त्याची रुपे योग्यवेळी ओळखून आवश्यक ती खबरदारी आपण घेऊ या आणि आपणही त्याच्यासोबत जागरुक नागरिक म्हणून आपल्यात आवश्यक ते बदल करु या.