Healthy Habits : नवीन वर्षात अनेक जण नवे संकल्प करतात. सकाळी लवकर उठणे, वजन कमी करणे, नियमित पुस्तक वाचणे, व्यायाम करणे इत्यादी. काही लोकांचे संकल्प यशस्वी होतात आणि त्यांचे सकारात्मक परिणामसुद्धा दिसून येतात. तुम्ही कधी विचार केला का की, तुम्ही ३० दिवस गोड पदार्थांचे सेवन केले नाही, नियमित १०,००० पावले चाललात आणि फक्त घरी तयार केलेले अन्नाचे सेवन केले, तर काय बदल दिसू शकतो? तसेच तुम्ही नवीन वर्षामध्ये या गोष्टीचे अनुकरण केले, तर कोणते फायदे दिसून येतील? तर, आज आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊ या दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तज्ज्ञांच्या मते, गोड पदार्थ न खाणे, १० हजार पावले चालणे आणि ३० दिवस घरी तयार केलेले अन्न खाणे यांमुळे मोठा शारीरिक बदल दिसू शकतो. मुंबईच्या परळ येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीनच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल सांगतात, “हा चांगल्या सवयींचा एक भाग आहे की, जो अतिशय फायदेशीर ठरू शकतो आणि त्यामुळे अनेक प्रकारे आरोग्याचे फायदे मिळू शकतात.”

हेही वाचा : Washing Hands Frequently : तुम्हाला सुद्धा सतत हात धुण्याची सवय आहे का? मग या सवयीचा त्वचेवर कसा परिमाण होतो डॉक्टरांकडून जाणून घ्या

कोणते बदल दिसून येतात?

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर साखरेचे सेवन कमी करणे फायद्याचे ठरू शकते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्हाला साखरेचे सेवन करण्याची इच्छा होईल आणि त्यामुळे तुम्ही गोंधळलेले दिसाल. कदाचित तुम्ही मूडी बनू शकता. कारण- रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि संतुलित ठेवण्यासाठी थोडा वेळ लागतो. डॉ. अग्रवाल सांगतात, “यादरम्यान ऊर्जा पातळीमध्ये हळूहळू नियमितपणा आणि स्थिरपणा दिसून येतो.”

आहार कसा असावा?

साखरेचे कमी सेवन करणे, तसेच नियमित चालणे आणि घरी तयार केलेल्या अन्नाचे सेवन करण, यांसारख्या गोष्टी नियमित केल्याने वजन कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. डॉ. अग्रवाल पुढे सांगतात, “भरपूर भाज्या, फळे, शेंगा आणि व्हिटॅमिन्स, फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसिडस्, प्रोटीन्स व कार्बोहायड्रेट्स यांसारखे आवश्यक पोषक घटक असलेला आहार घेणे आवश्यक आहे.”

हेही वाचा : बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी अतिधोकादायक यादीत; खाद्य सुरक्षा विभागाचा मोठा निर्णय

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आहारात आवश्यक पोषक घटकांची कमतरता असेल, तर संपूर्ण आरोग्यावर परिणाम जाणवू शकतो. डॉ. अग्रवाल पुढे सांगतात, “कोणताही नवीन बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. ज्यांना मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्यानंतर आवश्यक बदल करावा.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No sweets 10k steps daily and eat home cooked meals for 30 days what happens to the body read expert told ndj