सामान्यतः जेव्हा हृदय शरीराच्या गरजेसाठी आवश्यक असलेला पुरेसा रक्तपुरवठा करू शकत नाही तेव्हा हृदय बंद पडते. दीर्घ काळापर्यंतचा उच्च रक्तदाब, मधुमेह यांमुळे हृदयावर बऱ्याच काळापासून तणाव निर्माण होत असतो; पण हे घडत असल्याने कालांतराने कधी हृदय बंद पडेल हे तुम्हाला कदाचित माहीत नसते.

आता लघवीची चाचणी करून हृदयविकाराचा अंदाज लावता येऊ शकतो आणि त्यामुळे वेळीच उपचार घेणे शक्य होईल. ‘द युरोपियन जर्नल ऑफ हार्ट फेल्युअर’मधील नव्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.

MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…

संशोधनानुसार, रुग्णांमध्ये हृदय बंद पडण्याचा जास्त धोका असण्याची शक्यता शोधण्यासाठी आता लघवीची चाचणी आणि त्याचे विस्कळित मार्कर (deranged markers) मदत करू शकतात. वेळीच निदान झाल्यामुळे हृदयविकार टाळून लवकरात लवकर उपचार घेणे शक्य होईल. हे निष्कर्ष अगदी नवे नाहीत; परंतु अभ्यासामध्ये मोठ्या नमुन्याचा समावेश आहे. त्यामुळे हृदयविकाराचे लवकर निदान करण्यासाठी आता लघवीची चाचणीची वैध मानली जाऊ शकते.

URINE MARKERS म्हणजे काय?

अभ्यासात असे आढळून आले, ”लघवीतील अल्ब्युमिन (Albumin), उत्सर्जन (यूएई) व सीरम क्रिएटिनिनची (Serum creatinine) पातळी जास्त असलेल्या लोकांना हृदय बंद पडण्याचा धोका जास्त असतो. एक साधी निदान चाचणी हृदयरोग तज्ज्ञांना प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यासाठी मदत करू शकते.” असे दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी, प्रिन्सिपल डायरेक्ट, डॉ. निशिथ चंद्रा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

या संशोधनात ११ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २८ ते ७५ वर्षे वयोगटातील सुमारे सात हजार डच व्यकी सहभागी झाल्या होत्या. या संशोधकांनी या सहभागींच्या लघवीच्या नमुन्यांच्या माहितीचे विश्लेषण केले आहे. केवळ अल्ब्युमिन उत्सर्जनाची (UAE) पातळी जास्त असलेल्यांना सर्व कारणांमुळे मृत्यू होण्याचा धोका वाढला होता.

हे मूत्रपिंड खराब होणे आणि हृदय बंद पडणे यांच्यातील संबंधदेखील स्पष्ट करतात. निरोगी मूत्रपिंड रक्तातील रसायनांचे निरोगी संतुलन राखण्यास मदत करतात. रक्तप्रवाह फिल्टर करण्याच्या त्यांच्या भूमिकेचा एक भाग म्हणजे अल्ब्युमिन (शरीरात फिरणारे सर्वांत सामान्य मोठ्या आकाराचे प्रथिन) तुमच्या लघवीत जात नाही याची खात्री करणे. लघवीमध्ये सोडियम किंवा ग्लुकोजचे लहान रेणू असणे सामान्य गोष्ट आहे; परंतु अल्ब्युमिन असणे मात्र सामान्य नाही. त्यामुळे जर लघवीमध्ये अल्ब्युमिन असेल तर याचा अर्थ मूत्रपिंड नीट काम करीत नाही आणि तिची फिल्टर करण्याची यंत्रणा बिघडली आहे.

सीरम क्रिएटिनिन (Serum creatinine) म्हणजे मूत्रपिंड विषारी घटक बाहेर काढू शकत नाही. हे दोन्ही कार्डिओ-रेनल सिंड्रोम (Cardio-Renal Syndrome) सूचित करतात; ज्याद्वारे हृदय किंवा मूत्रपिंडातील दीर्घकालीन समस्या अवलंबून असलेल्या अवयवावर समान परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर हृदय पुरेसा रक्तपुरवठा करू शकत नसेल, तर किडनीच्या कार्यावर परिणाम होतो किंवा किडनी खराब झाली, तर त्याचा परिणाम हृदयावर होतो. म्हणूनच दोन्ही अवयवांवर लवकरात लवकर उपचार घेण्याची खात्री करण्यासाठी, अल्ब्युमिन-क्रिएटिनिनचे गुणोत्तर (Albumin-Creatinine Ratio ) किती आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

हेही वाचा – काळी मिरी वापरा अन् कोलेस्ट्रॉल कमी करा, हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी कसे करावे सेवन? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

लघवीमध्ये ल्ब्युमिन-क्रिएटिनिनचे गुणोत्तराची सुरक्षित पातळी किती असावी?

लघवीतील अल्ब्युमिन ते क्रिएटिनिन गुणोत्तर (UACR) ३० मिलीग्रॅम प्रति ग्रॅमच्या खाली असावे. सामान्य UACR मूल्य पुरुषांमध्ये १७ मिलीग्रॅम प्रति ग्रॅमपेक्षा कमी किंवा समान असते परंतु स्त्रियांमध्ये, ही पातळी जास्त असल्याचे दिसून येते, जी सुमारे २५ मिलीग्रॅम प्रति ग्रॅम इतकी आहे. ३० मिलीग्राम प्रति ग्रामपेक्षा कमी गुणोत्तर असणे सौम्य मानले जाते, ३९ ते ३०० मिलीग्रॅम प्रति ग्रॅमम हृदयासाठी मध्यम धोका दर्शवते आणि ३०० मिलीग्रॅम प्रति ग्रॅमपेक्षा जास्त हृदयासाठी गंभीर धोका दर्शवते.

किडनी आणि हृदयाची कार्ये कसे संबंधित आहेत?

लघवीतील अल्ब्युमिन ते क्रिएटिनिन गुणोत्तर (UACR) ३० मिलिग्रॅम प्रतिग्रॅमच्या खाली असावे. सामान्य UACR मूल्य पुरुषांमध्ये १७ मिलिग्रॅम प्रति ग्रॅमपेक्षा कमी किंवा समान असते; परंतु स्त्रियांमध्ये ही पातळी जास्त असल्याचे दिसून येते, जी सुमारे २५ मिलिग्रॅम प्रतिग्रॅम इतकी आहे. ३० मिलिग्रॅम प्रतिग्रॅमपेक्षा कमी गुणोत्तर असणे सौम्य मानले जाते. ३९ ते ३०० मिलिग्रॅम प्रतिग्रॅम हे गुणोत्तर हृदयासाठी मध्यम धोका दर्शवते आणि ३०० मिलिग्रॅम प्रतिग्रॅमपेक्षा हे जास्त गुणोत्तर हृदयासाठी गंभीर धोका दर्शवते.

हेही वाचा – मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर कमी करण्यास जिरे कशी करतात मदत? जिरे खाण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या

हृदय आणि मूत्रपिंड या दोन्ही अवयवांच्या वैयक्तिक समस्या असू शकतात आणि त्याचा परिणाम इतर अवयवांवर होऊ शकतो. परंतु, कधी कधी दोन्ही अवयवांच्या स्वतंत्र समस्यादेखील निर्माण होऊ शकतात. हृदयविकाराचा झटका किंवा हृदय बंद पडल्यामुळे किडनीला रक्तपुरवठा कमी होऊन, त्यावर दबाव येतो. परंतु ज्या क्षणी हृदयाची स्थिती सुधारते, त्याच क्षणी मूत्रपिंडाचीदेखील स्थिती सुधारते. काही वेळा मूत्रपिंडाचे आजार, जसे की क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) हृदयावर जास्त भार टाकतात. कारण- रोगग्रस्त मूत्रपिंडाला मदत करण्यासाठी, रक्त मिळविण्यासाठी त्याला अधिक पुरवठा करणे आवश्यक असते. त्यामुळे रक्तदाब (बीपी) वाढतो आणि हृदयविकार होऊ शकतो.

CKD हृदयाच्या धमन्यांमध्ये एथेरोस्क्लेरोसिस (Atherosclerosis) किंवा प्लेक (Plaque) जमा होण्यास गती देऊ शकते. म्हणूनच जर तुम्हाला रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाचे लवकर निदान झाले असेल, तर हृदयरोगतज्ज्ञ क्रिएटिनिनची पातळी तपासतात. तुमच्या रक्तदाबाचे नेमके कारण शोधण्यासाठी असे केले जाते. कारण- ते कमी करण्यासाठी दिलेली औषधे, जेव्हा तुमचे मूत्रपिंड नीट काम करीत नाही तेव्हा त्याचे कार्य आणखी बिघडवू शकतात. तुम्हाला आणखी एक प्रकारचे रक्तदाब औषध दिले जाऊ शकते जे तुम्हाला तुमच्या लघवीतील अल्ब्युमिन कमी करण्यास मदत करू शकते. तुमचा रक्तदाब सामान्य असला तरीही कमी मीठ, सोडियम असलेल्या आहाराच्या सेवनाचा सल्ला दिला जातो. याव्यतिरिक्त तुम्हाला वरीलपैकी एक औषध घेण्यास सांगितले जाऊ शकते

आता हृदयरोगतज्ज्ञ लघवीतील अल्ब्युमिन व क्रिएटिनिन गुणोत्तर मोजण्यासाठी आणि तुमचे हृदय व मूत्रपिंड यांची स्थिती काय आहे याचे मूल्यांकन करण्यासाठी लघवीच्या चाचणीची शिफारस करू शकतात. त्या चाचणीचा रिपोर्ट पाहून, ते योग्य पावले उचलण्याचा आणि आवश्यक त्या औषधोपचाराचा सल्ला देऊ शकतात.