Dietician Reveals List Claiming The Top Fruits For Biggest Various Nutrients : आहारासाठी निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे फळे. फळे पोषक, प्रोटेक्शन अशा विविध प्रकारचे आवश्यक पोषक घटक शरीराला देत असतात. आपण जे फळं रोज खातो, ते प्रत्येक फळ आपल्या शरीराला विशिष्ट पोषण देतात (Nutrient Rich Fruits) , ज्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरतात. पण, जेव्हा आपण विचार करतो की, कोणत्या फळात विशिष्ट पोषणतत्त्वांचे सर्वाधिक प्रमाण आहे, तेव्हा मात्र आपण सगळेच विचारात पडतो.

अलीकडेच एका इन्स्टाग्राम पोस्टने विविध पोषक घटक असणाऱ्या फळांची यादी (Nutrient Rich Fruits) जाहीर केली आहे. यामध्ये ॲव्होकॅडो सर्वात चरबीयुक्त फळ, साखरेसाठी खजूर, प्रथिनेसाठी पेरू, फायबरसाठी रास्पबेरी आणि अँटिऑक्सिडंट्ससाठी डाळिंब. किवीमध्ये व्हिटॅमिन सीचा स्त्रोत, व्हिटॅमिन एसाठी आंबा आणि पोटॅशियम पॉवरहाऊस म्हणून केळी या सर्व गोष्टी या यादीत हायलाईट केल्या आहेत. तसेच पोस्टला कॅप्शन देण्यात आली की, ‘जर निसर्गाने तयार केले नसेल, तर ते खाऊ नका (If nature didn’t make it, don’t take it) म्हणजे निसर्गाने दिलेल्या गोष्टीच आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात. कृत्रिम गोष्टी वापरणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Heart Attack Prevention
Heart Attack: हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वयाच्या विशीत अन् तिशीत ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
When Aishwarya Rai Bachchan shared her tips for glowing skin
वयाच्या पन्नाशीतही तजेलदार त्वचा असणाऱ्या ऐश्वर्या रायने सांगितले सौंदर्याचे रहस्य? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?

तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने आहारतज्ज्ञ अनुश्री शर्मा यांच्याशी चर्चा केली. आहारतज्ज्ञ अनुश्री शर्मा यांनी या दाव्यांची तपासणी केली आणि आपल्या आहारात समाविष्ट केलेल्या आणि विविध पोषक घटकांच्या अतिरिक्त फायद्यांबद्दल माहिती दिली. त्यांच्या मते, यातील काही दावे खरे असले तरी कमी ओळखली जाणारी फळंदेखील तितकीच पोषणतत्त्वांनी (Nutrient Rich Fruits) परिपूर्ण असतात.

हेही वाचा…Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल

अनुश्री शर्मा म्हणतात की, भारतात आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) द्वारे प्रदान केलेल्या आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतो, जसे की भारतीय अन्न संयोग तक्ते आणि भारतीय अन्नांचे पोषण मूल्य.

तर मार्गदर्शक तत्त्वांनुसार माहिती पुढीलप्रमाणे ….

फॅट्स : बहुतेक फळांमध्ये चरबीचे प्रमाण कमी असते. पण, ॲव्होकॅडो हे अपवाद आहेत, कारण यात चरबीचे प्रमाण जास्त असते.

साखर : इतर फळांच्या तुलनेत खजुरामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते.

प्रथिने : फळांमध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते. पण, पेरू हे फळ या सगळ्यांमध्ये वेगळे ठरते (Nutrient Rich Fruits). कारण इतर फळांच्या तुलनेने यात जास्त प्रथिने असतात.

फायबर : सपोटा (Sapota) आणि पेरूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे, जे आहारातील गरजा पूर्ण करण्यासाठी एक चांगला स्त्रोत ठरतात.

अँटिऑक्सिडंट्स : जास्तीत जास्त फळं अँटीऑक्सिडन्ट्सने परिपूर्ण असतात, पण प्रत्येक फळात त्याचे प्रमाण आणि प्रकार वेगवेगळे असतात. अँटीऑक्सिडन्ट्स आपल्या शरीराला हानिकारक पदार्थांपासून संरक्षण देतात.

व्हिटॅमिन सी : किवी हे व्हिटॅमिन सी कंटेंटसाठी ओळखले जाते. पण, आवळा, पेरू, कस्टर्ड, सफरचंद यांसारख्या भारतीय फळांमध्ये याचे प्रमाण खरोखरच जास्त असते.

व्हिटॅमिन ए : पपई, अ‍ॅप्रिकोट, टरबूज यांप्रमाणेच आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए जास्त असते.

पोटॅशियम : केळी हे पोटॅशियमने भरपूर आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारे एकमेव फळ आहे. पण, द्राक्षे, पेरू, डाळिंबातही पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.

विशिष्ट पोषक तत्वांच्या पलीकडील आरोग्य फायदे (Nutrient Rich Fruits) :

फळांमध्ये भरपूर फायबर, अँटिऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल, जीवनसत्त्वे, खनिजे असतात. ही फळे गोड असतात, त्यामुळे मिठाईसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो आणि गोड खाण्याची आवड असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात. फळांमध्ये असणारे फायबर तृप्ती आणि परिपूर्णतेची भावना प्रदान करतात. जीवनसत्त्वे अँटिऑक्सिडंट्स म्हणून कार्य करतात आणि रोगप्रतिकारक शक्तीला (इम्यून सिस्टम) सपोर्ट देतात. ॲव्होकॅडोमधील चरबी वनस्पती आधारित असतात आणि हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात. फळे आतड्यांचे आरोग्यदेखील वाढवतात, पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करतात आणि फायबर वजन व्यवस्थापनास मदत करतात.

जर निसर्गाने ते बनवले नाही तर ते खाऊ नका :

ही वस्तुस्थिती आहे, कारण प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्यापेक्षा नैसर्गिक गोष्ट खाल्लेली खूपच चांगली आहे. अनुश्री शर्मा म्हणतात की, नैसर्गिक पदार्थ हे आरोग्यासाठी सामान्यत: चांगले असतात, कारण कृत्रिम पदार्थ गोड असतात आणि त्यांच्या रंगांमध्ये पौष्टिक मूल्य नसते, त्यामुळे अन्नाची पोषक गुणवत्ता कमी होऊ शकते; त्यामुळे नैसर्गिक स्रोतांवर अवलंबून राहणे सामान्यतः सोयीचे ठरेल.

सोयीसाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी केळी, संत्री किंवा बेरी यांसारखी फळे उपयुक्त ठरू शकतात. स्थानिक आणि हंगामी फळे जसे की, आवळा किंवा भारतीय बोर, निवडण्याचीदेखील शिफारस केली आहे. कारण ही फळे अधिक परवडणारी आणि पौष्टिकदृष्ट्या हंगामी गरजांशी जुळतात (Nutrient Rich Fruits) (उदा. उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी टरबूज); असे अनुश्री शर्मा म्हणाल्या आहेत.