Benefits of 100 Gram Ajwain: दिवाळीत भरपूर फराळ, रोज रात्री जेवणात चवीला भारी पण पचायला जड असणाऱ्या मेजवानीमुळे पोटाची दशा झाली आहे? अशावेळी औषधे घेण्यापेक्षा चिमूटभर ओवा आणि कोमट पाणी प्या असा सल्ला तुम्हालाही अनेकांनी दिला असेल. वर्षानुवर्षे पोटाच्या, श्वसनाच्या त्रासांवर ओव्याचा उपाय करण्याची आपल्याकडे पद्धत आहेत. ओवा हा खऱ्या अर्थाने विविध पोषक सत्वांचे पॉवर हाऊस म्हणून ओळखला जातो. पण या ओव्याच्या बियांमध्ये नेमकी कोणती सत्व असतात? त्याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? ओव्याच्या सेवनाने वजन कमी होते का? गरोदर महिलांनी ओवा खावा का? डायबिटीज असल्यास ओव्याने फायदा होतो की नुकसान? या सगळ्या प्रश्नांची नेमकी उत्तरे आपण आज तज्ज्ञांकडून जाणून घेणारआहोत .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन एक्सस्प्रेसने डॉ निरुपमा राव, पोषणतज्ञ, रेजुआ एनर्जी सेंटर, मुंबई यांच्याशी चर्चा करून आपल्या आहारात १०० ग्रॅम ओव्याच्या सेवनाचे काय योगदान मिळू शकते याविषयी माहिती दिली आहे.

१०० ग्रॅम ओव्यामध्ये असणारे पोषक सत्व

  • प्रथिने -17.1 ग्रॅम
  • फॅट्स – 21.8 ग्रॅम
  • खनिजे – 7.9 ग्रॅम
  • फायबर – 21.2 ग्रॅम
  • कार्ब्स – 24.6 ग्रॅम
  • ऊर्जा -363 kcal
  • कॅल्शियम – 1525 मिग्रॅ
  • फॉस्फरस – 443 मिग्रॅ
  • लोह – 12.5 मिग्रॅ

ओव्याचे फायदे

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म: ओव्याच्या दाण्यांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात.

खराब कोलेस्टेरॉलवर उपाय: ओव्याचा अर्क कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड आणि एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी आहे आणि हृदय-संरक्षणात्मक एचडीएल (चांगले) कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यात सुद्धा ओवा कामी येऊ शकतो.

पोटातील गॅसवर परिणामी: ओव्याचा अर्क गॅस्ट्रिक समस्या आणि दीर्घकालीन अपचन टाळण्यासाठी आणि उपचार करण्यास मदत करतो.

खोकल्यापासून आराम: ओव्याच्या बियांमुळे फुफ्फुसात हवा वाढण्यास मदत होते परिणामी खोकल्यावर हा अत्यंत उत्तम उपाय ठरू शकतो.

डॉ राव यांनी पुढे सांगितले की, ओवा त्याच्या पाचक गुणधर्मांसाठी ओळखले जाते, आणि सणासुदीच्या काळात फायदेशीर ठरू शकतो. त्याचे गुणधर्म अपचन, पोट फुगणे आणि गॅस कमी करण्यास मदत करतात. सणाच्या दिवसांमध्ये अधिक कॅलरीयुक्त व जड पदार्थांचे सेवन केले जात असल्याने अपचनाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते अशावेळी ओव्याचे सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्याआधी सेवन करणे उपयुक्त ठरू शकते.

मधुमेहींसाठी ओव्याचे सेवन योग्य आहे का?

डॉ राव सांगतात की, मधुमेहाच्या रूग्णांनी नियमितपणे ओव्याचे सेवन करणे सुद्धा फायदेशीर ठरू शकते कारण यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर राहण्यास मदत होऊ शकते. तुम्ही नुसताच ओवा खाऊ शकत नसाल तर तुमच्या नियमित जेवणामध्ये ओव्याची पाने किंवा दाणे फोडणीसाठी वापरू शकता. जेवणानंतर कोमट पाण्यासह ओव्याचे सेवन सर्वोत्तम ठरू शकते.

गर्भारपणात ओवा खाणे सुरक्षित आहे का?

गरोदर स्त्रियांना अपचनाची समस्या वारंवार जाणवते अशावेळी ओव्याचे पाणी त्यांना खूप मदत करू शकते. परंतु सेवन करण्याआधी तुमच्या वैद्यकीय स्थितीची माहिती असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.

डॉ राव यांच्या मते ओव्याच्या अतिसेवनामुळे अनेक प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. त्यामुळे पोटात व छातीत जळजळ होऊ शकते किंवा चक्कर येणे आणि मळमळ होणे, असेही त्रास जाणवू शकतात.

ओव्याच्या सेवनाच्या विषयी समज- गैरसमज

१) ओव्यामुळे वजन कमी होते?

ओव्यामुळे चयापचय सुरळीत होण्यास मदत होऊ शकते, परंतु वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. ओवा हा जादुई उपाय नाही.

हे ही वाचा<< त्वचेला खाज सुटणे, पित्त उमटणे यामागे अस्वच्छताच नाही, ‘हे’ असतं मुख्य कारण; ताणाने येणारं पुरळ कसं दिसतं?

२) ओव्यामुळे श्वसनाच्या समस्या दूर होतात?

ओव्यामुळे खोकला किंवा श्वसन समस्यांमध्ये आराम मिळू शकतो, पण श्वसनाच्या त्रासांच्या गंभीर स्थितीत वैद्यकीय उपचारांसाठी ओवा हा पर्याय नाही.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nutrition alert 100 gram serving of ajwain or carom seeds how it affects blood sugar weight loss magic potion how to eat ova svs