Green Chana Nutrition Alert : हिवाळ्यात थंडीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी आहारात काही पदार्थ्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: थंडीत चणे खाणे फायदेशीर मानले जाते. यात हिरवे चण्यामध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असतात. तसेच यातील सेच्युरेटेड मॅक्रोन्यूट्रिएंट स्नायू मजबुतीसाठी फायदेशीर असते. हिरवे चणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो. अशा स्थितीत उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दररोज १०० ग्रॅम हिरव्या चण्याचे सेवन केल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांच्या मते, हिरवे चणे, काबुली चण्याच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते.

हिरव्या चण्यामध्ये व्हिटॅमिन सी घटक मुबकल प्रमाणात असतात, त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात हिरव्या चण्याचा समावेश करू शकता. याशिवाय तुम्ही हिरव्या चण्यांची भाजी किंवा सलाड बनवून खाऊ शकता. त्याचबरोबर उकडलेले हिरवे चणेदेखील स्वादिष्ट लागतात.

पंतप्रधान मोदींचा ११ दिवस केवळ नारळ पाणी पिऊन उपवास; पण शरीरासाठी हे कितपत फायदेशीर? काय सांगतात डॉक्टर? वाचा

१०० ग्रॅम हिरव्या चण्यामध्ये कोणकोणते पौष्टिक घटक असतात, जाणून घेऊ..

  • कॅलरीज : ५४ kcal
  • कार्बोहायड्रेट्स : ११.६२ ग्रॅम
  • फायबर : ४.१ ग्रॅम
  • शुगर : १.४ ग्रॅम
  • प्रोटीन : २.८२ ग्रॅम
  • फॅट: ०.३७ ग्रॅम
  • व्हिटॅमिन सी
  • व्हिटॅमिन ए
  • व्हिटॅमिन के
  • व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स (बी१, बी२, बी३ आणि बी५)
  • कॅल्शियम
  • फॉस्फरस
  • लोह
  • पोटॅशियम
  • मॅग्नेशियम
  • कॉपर
  • मॅंगनीज
  • अँटिऑक्सिडंट्स

हिरव्या चण्यांचे आरोग्यासाठी फायदे

१) प्रतिकारशक्ती वाढते : हिरव्या चण्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून दूर राहता येते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच संसर्गाचा धोका कमी होतो.

२) रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते : हिरव्या चण्यातील फायबर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. रक्तातील ग्लुकोज आणि लिपिड प्रोफाइलवरही याचा सकारात्मक परिमाण होतो, ज्यामुळे टाइप २ मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हिरवे चणे फायदेशीर ठरतात.

३) पचनक्रिया सुधारते : हिरव्या चण्यातील फायबर आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवते, त्यामुळे पचनक्रियेसंबंधित कोणत्याही आजारापासून दूर राहता येते.

४) डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम : व्हिटॅमिन एने समृद्ध हिरवे चणे दृष्टी दोष सुधारण्यास मदत करतात आणि वयाप्रमाणे वाढणारा मॅक्यूलर डिजेनेरेशनचा धोका कमी करू शकतात.

५) स्मृती आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर : हिरव्या चण्यातील फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटिऑक्सिडंट्स मेंदूतील पेशींना चालना देतात. तसेच मेंदूच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करू शकतात.

६) यकृताचे आरोग्य निरोगी राहते : मर्यादित संशोधनातून असे समोर आले की, हिरव्या चण्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि दाहकविरोधी गुणधर्म यकृताचे आरोग्य निरोगी ठेवते.

मधुमेही हिरवे चणे खाऊ शकतात का?

सिंघवाल यांच्या म्हणण्यानुसार, मधुमेह असलेल्या व्यक्ती हिरव्या चण्याचे सेवन करू शकतात. यातील लो ग्लायसेमिक इंडेक्स आणि फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात.

गर्भवती महिलांनी हिरवे चणे खाणे फायदेशीर आहे का?

हिरवे चणे गर्भवती महिलांना फायदेशीर ठरू शकतात, ज्यामुळे बाळाच्या वाढीसाठी आवश्यक व्हिटॅमिन सीसारखे पोषक घटक मिळतात.

‘या’ गोष्टींची काळजी घ्या

१) तुम्हाला कोणतीही ॲलर्जी असल्यास हिरवे चणे खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२) यातील नैसर्गिक साखरेचे प्रमाण लक्षात घेऊनच त्याचे सेवन करा.

३) गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डरची समस्या टाळण्यासाठी त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करा.

‘हे’ गैरसमज करा दूर

१) हिरव्या चण्याच्या सेवनाने मधुमेह बरा होतो?

हिरवे चणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी यामुळे मधुमेह बरा होऊ शकत नाही.

२) हिरव्या चण्याच्या सेवनामुळे कर्करोग बरा होऊ शकतो?

हिरव्या चण्यातील अँटिऑक्सिडंट्स घटक कॅन्सरचा धोका कमी करू शकतात, परंतु याच्या सेवनाने कर्करोग रोखता येत नाही किंवा बरा करू शकत नाही.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nutrition alert green chana choliya green chickpea health benefits heres what a 100 gram serving of green chana contains sjr