Health Benefits of Cinnamon : दालचिनी हा मसाल्याचा प्रकार अनेक गृहिणी विविध पदार्थांमध्ये वापरतात, जो आपल्या जेवणाची चव वाढवण्यास मदत करतो. आयुर्वेदानुसार दालचिनीचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी शतकानुशतके केला जात आहे. जेवणात दालचिनीचा वापर केल्याने अन्नपदार्थाला चांगला वास येतो. यातील औषधी गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. याशिवाय हिवाळ्यात दालचिनीचे सेवन केल्यास व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

दरम्यान, उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या डायटिशियन एकता सिंघवाल यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दालचिनीतील आरोग्यदायी गुणधर्म आणि फायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

Ayurveda for Diabetes
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ ४ आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा; फक्त तज्ज्ञांकडून सेवनाची योग्य पद्धत समजून घ्या 
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Boiled Ajwain Water Benefits
रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे; पाहा शरीरात कोणते बदल होतात? 
Pune Heavy Rush At Shreemant Dagdusheth Halwai Ganpati 2024 shocking video
पुणे तिथे काय उणे! रात्री २ वाजता दगडूशेठ मंदिराबाहेरची गर्दी पाहून झोप उडेल; जाण्याआधी एकदा VIDEO पाहाच
Puneri pati viral for parking in his spot funny puneri pati goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने जारी केला नवा जीआर; सुधारित शासन निर्णयातून कोणती घोषणा?
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत

१०० ग्रॅम ग्राउंड दालचिनीमध्ये कोणते घटक असतात?

  • कॅलरी: २४७ kcal
  • कर्बोदकांमधे: ८०.५९ ग्रॅम
  • आहारातील फायबर: ५३.१ ग्रॅम
  • साखर: २.१७ ग्रॅम
  • प्रथिने: ४ ग्रॅम
  • फॅट: १.२४ ग्रॅम

दालचिनीचे आरोग्यदायी फायदे

१) रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते : दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे रोगप्रतिकारकशक्तीला वाढवण्यास मदत होते. तसेच वजन नियंत्रित राहते.

२) मधुमेहावर नियंत्रण : दालचिनीच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरते.

३) पचनक्रिया सुधारते : दालचिनीमधील हाय फायबरमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अस्वस्थता दूर करून पचनास मदत करू शकते. अपचन, पोटदुखी आणि छातीत जळजळ यावर दालचिनीचे सेवन खूप प्रभावी ठरते.

४) हृदयाचे आरोग्य सुधारते : उच्च कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळी यांसारखे जोखीम घटक कमी करून हृदयाच्या आरोग्यावर दालचिनीचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

५) दाहक-विरोधी गुणधर्म : दालचिनीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहेत, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात.

मधुमेहाचे रुग्ण दालचिनीचे सेवन करू शकतात का?

मधुमेह असलेल्या व्यक्ती दालचिनीचे सेवन करू शकतात. हे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. परंतु, त्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.

गर्भवती महिलांसाठी ते फायदेशीर आहे का?

दालचिनीचे माफक प्रमाणात सेवन गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे धोकादायक स्थिती टाळता येते. यातील काही अँटिऑक्सिडंट गुणधर्म तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात, मात्र अतिसेवन टाळावे.

‘या’ गोष्टींची घ्या काळजी

  • दालचिनीच्या सेवनामुळे ॲलर्जी होत असल्यास ती खाणे टाळा.दालचिनीच्या नैसर्गिकबंधित समस्या उद्भवू शकतात.
  • तसेच विशिष्ट औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी दालचिनीचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • दालचिनीसंदर्भातील हे गैरसमज करा दूर

१) दालचिनीमुळे मधुमेह बरा होऊ शकतो?

दालचिनीमुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते, परंतु मधुमेह पूर्णपणे बरा करू शकत नाही.

२) दालचिनीच्या सेवनाने कर्करोग टाळू शकतो किंवा बरा होऊ शकतो?

दालचिनीमधील अँटिऑक्सिडंट गुणधर्माचे अनेक आरोग्य फायदे असू शकतात, परंतु त्याच्या सेवनामुळे कर्करोग टाळू किंवा बरा होऊ शकत नाही.