Health Benefits of Cinnamon : दालचिनी हा मसाल्याचा प्रकार अनेक गृहिणी विविध पदार्थांमध्ये वापरतात, जो आपल्या जेवणाची चव वाढवण्यास मदत करतो. आयुर्वेदानुसार दालचिनीचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी शतकानुशतके केला जात आहे. जेवणात दालचिनीचा वापर केल्याने अन्नपदार्थाला चांगला वास येतो. यातील औषधी गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. याशिवाय हिवाळ्यात दालचिनीचे सेवन केल्यास व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दरम्यान, उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या डायटिशियन एकता सिंघवाल यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दालचिनीतील आरोग्यदायी गुणधर्म आणि फायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
१०० ग्रॅम ग्राउंड दालचिनीमध्ये कोणते घटक असतात?
- कॅलरी: २४७ kcal
- कर्बोदकांमधे: ८०.५९ ग्रॅम
- आहारातील फायबर: ५३.१ ग्रॅम
- साखर: २.१७ ग्रॅम
- प्रथिने: ४ ग्रॅम
- फॅट: १.२४ ग्रॅम
दालचिनीचे आरोग्यदायी फायदे
१) रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते : दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे रोगप्रतिकारकशक्तीला वाढवण्यास मदत होते. तसेच वजन नियंत्रित राहते.
२) मधुमेहावर नियंत्रण : दालचिनीच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरते.
३) पचनक्रिया सुधारते : दालचिनीमधील हाय फायबरमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अस्वस्थता दूर करून पचनास मदत करू शकते. अपचन, पोटदुखी आणि छातीत जळजळ यावर दालचिनीचे सेवन खूप प्रभावी ठरते.
४) हृदयाचे आरोग्य सुधारते : उच्च कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळी यांसारखे जोखीम घटक कमी करून हृदयाच्या आरोग्यावर दालचिनीचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
५) दाहक-विरोधी गुणधर्म : दालचिनीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहेत, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात.
मधुमेहाचे रुग्ण दालचिनीचे सेवन करू शकतात का?
मधुमेह असलेल्या व्यक्ती दालचिनीचे सेवन करू शकतात. हे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. परंतु, त्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.
गर्भवती महिलांसाठी ते फायदेशीर आहे का?
दालचिनीचे माफक प्रमाणात सेवन गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे धोकादायक स्थिती टाळता येते. यातील काही अँटिऑक्सिडंट गुणधर्म तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात, मात्र अतिसेवन टाळावे.
‘या’ गोष्टींची घ्या काळजी
- दालचिनीच्या सेवनामुळे ॲलर्जी होत असल्यास ती खाणे टाळा.दालचिनीच्या नैसर्गिकबंधित समस्या उद्भवू शकतात.
- तसेच विशिष्ट औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी दालचिनीचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- दालचिनीसंदर्भातील हे गैरसमज करा दूर
१) दालचिनीमुळे मधुमेह बरा होऊ शकतो?
दालचिनीमुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते, परंतु मधुमेह पूर्णपणे बरा करू शकत नाही.
२) दालचिनीच्या सेवनाने कर्करोग टाळू शकतो किंवा बरा होऊ शकतो?
दालचिनीमधील अँटिऑक्सिडंट गुणधर्माचे अनेक आरोग्य फायदे असू शकतात, परंतु त्याच्या सेवनामुळे कर्करोग टाळू किंवा बरा होऊ शकत नाही.