हिवाळा ऋतू आपल्याबरोबर भरपूर स्वादिष्ट आणि आरोग्यदायी हंगामी भाज्या घेऊन येतो. या भाज्यांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात; ज्यांच्या सेवनामुळे अनेक आजारांपासून आराम मिळतो. त्यात भरपूर प्रमाणात फायबर, मँगनीज व सेलेनियम यांसारखी सूक्ष्म खनिजे असतात. याच भाज्यांपैकी एक भाजी म्हणजे सलगम. मलाईदार पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाची ही भाजी मधुमेह, हृदय अन् डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. दरम्यान, उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या डाएटिशियन एकता सिंघवाल यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना १०० ग्रॅम सलमग भाजीत किती प्रमाणात पोषक घटक असतात हे सांगितले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डाएटिशियन एकता सिंघवाल यांच्या मते, सलगमची ताजी पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते; जे नैसर्गिकरीत्या हाडे मजबूत करण्यासाठी मदत करते. जाणून घेऊ १०० ग्रॅम सलगम भाजीचा आहारात समावेश केल्यास कोणते फायदे मिळतात?
- कॅलरीज : २८ kcal
- कर्बोदके : ६.४३ ग्रॅम
- फायबर : १.८ ग्रॅम
- साखर : ३.८९ ग्रॅम
- प्रथिने : ०.९ ग्रॅम
- फॅट्स : ०.१ ग्रॅम
- जीवनसत्त्वे : व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स (B1, B2, B3 व B5 सह)
- खनिजे : कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, मॅंगनीज
सलगम खाण्याचे आरोग्यदायी फायदे
१) प्रतिकारशक्तीत वाढ : सलगममध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते; जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करते. तसेच, ऑक्सिडेटिव्ह तणावापासून पेशींचे संरक्षण करते.
२) हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत : सलगममधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते.
३) पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम : सलगममध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते; ज्यामुळे आहारात त्याचा समावेश केल्यास बद्धकोष्ठता, आतड्यांचे कार्य व चयापचय क्रिया सुरळीत राहते. तसेच पचनाशी संबंधित विविध समस्यांपासून आराम मिळतो. त्याशिवाय सलगममध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात; ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते.
४) दृष्टिदोषात सुधारणा : सलगममधील व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे; ज्यामुळे दृष्टिदोष सुधारतो आणि मोतीबिंदू, काचबिंदू, मॅक्युलर डिजनरेशन इत्यादी समस्यांचा धोका टाळता येतो.
५) हाडांसाठी उपयुक्त : सलगमधील कॅल्शियम आणि फॉस्फरस तुमच्या हाडांचे आरोग्य राखण्यासाठी उपयोगी ठरते.
‘या’ व्यक्तींच्या आरोग्यादृष्टीने सलगम खाणे फायदेशीर आहे का?
१) मधुमेह असलेल्या व्यक्ती सलगम खाऊ शकते का?
सिंघवाल यांच्या मते, मधुमेह असलेल्या व्यक्ती सलगम खाऊ शकतात. त्यातील कमी ग्लायसेमिक आणि फायबरचे प्रमाण मधुमेहींसाठी उपयुक्त असते. परंतु, मधुमेह असलेल्या व्यक्तीने त्याचे किती प्रमाणात सेवन करावे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
२) गर्भवती महिलांनी सलगम खाणे फायदेशीर आहे का?
बाळाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन सीसाठी गर्भवती महिलांनी सलगम खाणे फायदेशीर ठरू शकते. परंतु, त्याचे जास्त प्रमाणात सेवन टाळणे महत्त्वाचे आहे.
सलगम खाताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी
१) कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असल्यास खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
२) त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असल्याने त्याच्या सेवनावर नियंत्रण ठेवा.
३) सलगमच्या अतिसेवनामुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
‘हे’ गैरसमज करा दूर
१) सलगममुळे मधुमेह बरा होतो?
- सलगम हा मधुमेही रुग्णाच्या आहाराचा एक निरोगी भाग असू शकतो; परंतु त्याने मधुमेह बरा करू शकत नाही.
२) सलगम कर्करोग टाळू शकतो किंवा बरा करू शकतो?
- सलगमचे अँटिऑक्सिडंट्स संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्याने कर्करोग टाळू शकत नाही किंवा सलगममुळे कर्करोग बरा होऊ शकत नाही.