nutrition alert honey health benefits : मध हे नैसर्गिक औषध आहे. ऋतू बदलतानाही निसर्गाकडून मिळणाऱ्या पदार्थाला सोनेरी अमृत मानले जाते. मधात मधुर चवीशिवाय अनेक पौष्टिक गुणधर्मही आहेत; ज्यामुळे हिवाळ्यात मधाचे सेवन केल्यास शरीर निरोगी राहते. तसेच घसा खवखवण्यावर औषधापासून ते नैसर्गिक ऊर्जा वाढवण्यापर्यंत मधाचे बहुआयामी गुणधर्म आहेत. हिवाळ्यात मधाचे सेवन केल्यास अनेक समस्यांपासून सुटका होते. त्यामुळे उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे जनरल फिजिशियन व संस्थापक-संचालक डॉ. शुचिन बजाज यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना रोज १०० ग्रॅम मधाचे सेवन केल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधात आहेत ‘हे’ पौष्टिक घटक

डॉ. बजाज यांनी दिलेल्या माहितीनुसार १०० ग्रॅम मधामध्ये आढळणारे पौष्टिक घटक खालीलप्रमाणे :

– कॅलरीज : ३०४ kcal
– कर्बोदके : ८२.१२ ग्रॅम
– साखर : ८२.१२ ग्रॅम
– प्रथिने : ०.३ ग्रॅम
– चरबी : ० ग्रॅम– जीवनसत्त्वे आणि खनिजे : मधामध्ये क जीवनसत्त्व, कॅल्शियम, लोहासह इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी-अधिक प्रमाणात आढळतात.

मधाचे आरोग्यदायी फायदे

१) रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ

मधामध्ये अँटिबायोटिक आणि अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म असतात; जे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ करून. आरोग्यास मदत करतात. त्यामुळे शरीर कोणत्या संक्रमणाशी सहजरीत्या लढू शकते.

२) पचनासंबंधित समस्यांवर फायदेशीर

मधामध्ये प्री-बायोटिक गुणधर्म असू शकतात; जे आतड्यांतील चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात. त्यामुळे पचनासंबंधित समस्यांवर मध फायदेशीर ठरतो.

३) जखम लवकर बरी करण्याचे सामर्थ्य

शरीरावरील जखम लवकरात लवकर बरी करण्याचे गुणधर्म मधात आहेत. त्यामुळे फार पूर्वीपासून मधाचा यासाठी उपयोग केला जात आहे. त्यातील अँटिबायोटिक गुणधर्मामुळे जखमांमध्ये होणारा संसर्ग टाळता येतो.

४) खोकल्यापासून आराम

कफ सिरपमध्ये मध हा एक सामान्य घटक आहे. कारण- सर्दी, खोकला आणि घशासंबंधित आजार बरे करण्याच्या दृष्टीने मधातील गुणधर्म उपकारक ठरत असल्याने मध हा त्याबाबत एक रामबाण उपाय आहे.

५) ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण

मधामध्ये विविध अँटिऑक्सिडंट्स असतात; जे पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

हेही वाचा – आत्महत्येच्या विचारांपासून एआर रेहमानला आईने असं केलं दूर, तुमच्या जवळच्यांना तुम्ही कशी कराल मदत? डॉक्टर म्हणाले…

मधुमेहाचे रुग्ण मधाचे सेवन करू शकतात का?

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मधाचे सेवन माफक प्रमाणात करावे. त्यात साखरेपेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. तरीही जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो, असे डॉ. बजाज म्हणाले.

गर्भवती महिलांसाठी मध फायदेशीर आहे का?

गर्भवती महिलांनी मधाचे मध्यम प्रमाणात सेवन करणे सुरक्षित असते. मधातून तुम्हाला नैसर्गिक गोडवा चाखता येतो. त्याशिवाय अनेक आरोग्य समस्यांपासूनही दूर राहणे शक्य होते. गर्भवती महिलांनी कच्चा किंवा पाश्चराइज न केलेला मध खाणे टाळावे.

मधाचे सेवन करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

१) ॲलर्जी : काही व्यक्तींना मधाची ॲलर्जी असू शकते. ॲलर्जीची प्रतिक्रिया सौम्य लक्षणांपासून गंभीर स्थितीपर्यंत असू शकते. त्यामुळे अशा लोकांनी मध खाणे टाळावे.

२) साखरेचे प्रमाण : मधामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेहाचे रुग्ण आणि साखरेचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिलेल्या लोकांनी मधाचे सेवन करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

३) अतिसेवन : मधाच्या अतिसेवनाने कॅलरीज वाढू शकतात आणि मग पर्यायाने वजनही वाढू शकते. त्यामुळे त्याचे प्रमाणातच सेवन करावे,

मधाचे सेवन करण्यासंदर्भातील ‘हे’ गैरसमज करा दूर

१) मधाच्या सेवनाने मधुमेह बरा होऊ शकतो?

मध हा मधुमेहावर उपाय नाही. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्याचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२) मध सर्व आजार टाळू शकतो किंवा तो बरे करू शकतो?

मधाचे आरोग्यदायी फायदे असले तरी त्यामुळे सर्व रोग स्वतःच टाळू किंवा बरे करू शकत नाही. समतोल आहार आणि निरोगी जीवनशैली या दोन बाबी सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nutrition alert honey health benefits heres what a 100 gram serving of honey contains is honey healthy heres what experts say sjr
Show comments