अनेकांना हिवाळ्यात खूप थंडी जाणवते. कोमट पाणी आणि चहा-कॉपी पिणे, आरामदायक हिवाळ्यातील कपडे घालणे या गोष्टी अशा वेळी फायदेशीर ठरतात. एकात्मिक पोषणतज्ज्ञ (integrative nutritionist ) नेहा रंगलानी यांनी एक उपाय सुचविला आहे, तो अशा स्थितीत नेहमी फायदेशीर ठरतो; तो म्हणजे काळी वेलची खाणे. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी दावा केला की, “काळी वेलची किंवा मोठी इलायची नेहमी आपल्याजवळ ठेवा. या वेलचीमध्ये काही संयुगे असतात, जी आपल्या शरीरात उष्णता निर्माण करण्यास उत्तेजित करतात आणि आपल्याला उबदार ठेवतात. हे रक्ताभिसरण आणि रक्त प्रवाहदेखील सुधारते, जेणेकरून उष्णता समान रीतीने वितरीत केली जाईल. हे शरीरातील कफ आणि वात दोषदेखील संतुलित करते, जे हिवाळ्यात जाणवणाऱ्या थंडीशी संबंधित आहे. म्हणून घराबाहेर जाताना काळी वेलची बरोबर घेण्यास विसरू नका आणि हिवाळ्याचा आनंद लुटा.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिवाळ्यात काळी वेलची खाणे प्रभावी आहे का? (Is it effective?)

काळी वेलची शरीरातील फिनोलिक संयुगांनी समृद्ध असते, जी रक्ताभिसरणासाठी चांगली असते. खरं तर, धुरकट आणि तिखट चव (smoky and pungent flavour) असलेली मोठी वेलची ही थर्मोजेनिक मानली जाते. सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षक असलेल्या कनिका मल्होत्रा यांनी याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना पुष्टी केली की, “काळी वेलची खरोखर थर्मोजेनिक आहे, याचा अर्थ ती शरीरात उष्णता उत्पादन वाढवू शकते.”

हेही वाचा –अंकुरलेले नारळ म्हणजे काय? ते खाणे योग्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…

“याच्या परिणामाचे श्रेय वेलचीमधील बायोॲक्टिव्ह संयुगे, जसे की सिनेओल, टेरपिनेन आणि कापूर (camphor) यांना दिले जाऊ शकते, जे चयापचय उत्तेजित करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी ओळखले जातात. ही संयुगे थर्मोजेनेसिस वाढवू शकतात. थर्मोजेनेसिस ही एक प्रक्रिया आहे, जिथे शरीर उष्णता निर्माण करते,” असे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.

याव्यतिरिक्त, काळ्या वेलचीमध्ये पोटफुगी दूर करणारे सुगंधी औषध-कार्मिनेटिव (carminative) आणि पाचक गुणधर्म आहेत, जे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल फंक्शन म्हणजेच जठराचे कार्य सुधारू शकतात आणि चयापचय प्रक्रिया उत्तेजित करू शकतात, जे अप्रत्यक्षपणे तापमानवाढीच्या संवेदनामध्ये योगदान देतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ २०१५ च्या अभ्यासानुसार, काळी वेलची मेटाबॉलिक सिंड्रोमची चिन्हे प्रभावीपणे उलट करते. “काळ्या वेलचीमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढवतात आणि हा घटक गॅस्ट्रोइंटेस्टाइनल फंक्शन सुधारू शकतो, कारण आहारातील फायबर लठ्ठपणा कमी करतो,” असे त्यात लिहिले आहे.

हेही वाचा – तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडूमध्ये बीफ टॅलो वापरल्याचा दावा! भेसळयुक्त तूप खाल्ल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो?

विशेषतः त्याचे थर्मोजेनिक प्रभाव मोजणारे वैज्ञानिक अभ्यास दुर्मीळ आहेत असे सांगत मल्होत्रा ​​यांनी नमूद केले की, “अत्यंत थंडीचा सामना करण्यासाठी काळी वेलची चघळण्याचा परिणाम वैयक्तिक शरीरशास्त्रानुसार (प्रत्येक व्यक्तीनुसार) बदलू शकतो.”

अस्वीकरण : हा लेख सार्वजनिक डोमेन आणि/किंवा तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. कोणतीही दिनचर्या सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या आरोग्य चिकित्सकाचा सल्ला घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nutritionist recommends having black cardamom when you feel extreme cold we find out why snk