हिवाळा गरमी आणि दमटपणापासून आराम देत असला तरी या हंगामात अनेक आजार डोके वर काढतात. हिवाळ्यात कमी तापमान आणि थंड वाऱ्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि सर्दी, खोकला, ताप आदी आजारांचा त्रास सुरू होतो. यापासून बचाव होण्यासाठी आणि शरीराला उबदार आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे आणि आहारामध्ये काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. पौष्टिक पदार्थांच्या अभावाने केस गळणे, कोरडी त्वचा, अपचन, बद्धकोष्ठता या सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांनी हिवाळ्यामध्ये शरीर उबदार आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी काही अन्न पदार्थ सूचवले आहेत. या पदार्थांच्या सेवनाने, कोरडी त्वचा, अपचन, बद्धकोष्ठता या समस्या टाळण्यात मदत होऊ शकते.

(सुका मेवा भिजवून खायचा की नाही? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात)

1) गोंद

गोंदला एडिबल गम देखील म्हणतात. गोंद भाजी, लाडू किंवा हलवा या स्थानिक पदार्थांमध्ये वापरले जाते. गोंद हे नैसर्गिक रेचक असून ते तुमचे आतडे स्वच्छ करण्यात मदत करतील. गोंद आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करेल. गोंद हाडांना बळकट करते, म्हणून प्रसुतीनंतरच्या सर्व विधींमध्ये गोंदचा वापर होतो. त्याची चवी छान असून ते सहज उपलब्ध आहे, असे रुजुता दिवेकर यांनी सांगितले.

२) हिरवा लूसण

हिरवा लसूण सहसा चटणीमध्ये वापरतात. हिवाळ्यात बनवण्यात येणाऱ्या अनेक भाज्यांमध्ये हिरव्या लसणाचा वापर होतो. लसणात अँटिऑक्सिडेंट्स असतात आणि त्याची चवही छान असते. त्वचा आणि हृदयासाठी आपण अँटिऑक्सिडेंट्सच्या बाटलांवर पैसे खर्च करतो, मात्र हंगामी पाककृतीमधून मिळणाऱ्या अँटिऑक्सिडेंटविषयी आपण फारसे रस घेत नाही. हिरव्या लसणात आढळणाऱ्या अँटिऑक्सिडेंटला एसलिन असे म्हणतात, असे रुजुता यांनी सांगितले. हिवाळ्यात हिरव्या लसणाचे सेवन करण्याचा सल्ला रुजुता यांनी दिला.

(झोप लागत नाही? ‘या’ सवयी असू शकतात जबाबदार)

३) सलगम

सलगम हिवाळी भाजी असून त्याचे सहसा लोणचे बनवल्या जाते. सलगममध्ये भरपूर प्रमाणात फायबर, मॅगनीज आणि सेलेनियम सारखी सूक्ष्म खनिजे असतात. तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तर त्याने डोळ्यावर ताण येतो. सलगममध्ये लेसिथिन नावाचे अँटिऑक्सिडेंट असते आणि जीवनसत्व असतात जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, असे रुजुता दिवेकर यांनी सांगितले.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nutritionist rujuta diwekar suggested foods for winter to keep body healthy ssb