आतड्यांचे आरोग्य हे तुम्ही काय खाता आणि शरीर ते कसे शोषते यावर अवलंबून असते. आतड्यांचे आरोग्य विकसित होण्यास वेळ लागतो. चांगला आहार आणि जीवनशैलीतील बदल ही प्राथमिक आवश्यकता असली तरी पोषणतज्ज्ञ ख्याती रूपानी यांनी आतड्यांसाठी आवश्यक असलेल्या पाच गोष्टी सांगितल्या आहेत. “जर तुमचे आतड्यांचे आरोग्य खराब असेल तर ते सुधारण्यासाठी काय करावे, यासाठी खालील गोष्टी करण्याची आवश्यकता आहे,” असे रूपानी यांनी म्हटले आहे.

  • ताक : दररोज १० दिवसांसाठी.
  • दररोज रात्रीच्या जेवणाची सुरुवात एका भाजीने करा. नंतर सॅलेड आणि परतलेल्या भाज्या खा.
  • आठवड्यातून दोनदा इडली, दही भात किंवा ढोकळा यासारखे प्रोबायोटिक्स खाण्याचा प्रयत्न करा.
  • दररोज सकाळी मेथी, हळद आणि मिरची पावडर चहा प्या.
  • हिवाळ्यात दररोज आवळा खा. ते प्री आणि प्रोबायोटिक्स आणि रोगप्रतिकारक शक्ती संतुलित करते आणि त्यात व्हिटॅमिन सी असते

आतड्यांचे आरोग्यासाठी या टिप्स खरचं उपयुक्त आहेत का?

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षिका कनिक्का मल्होत्रा यांनी नमूद केले की, “आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी या टिप्स साधारपणे फायदेशीर वाटत असल्या तरी चांगल्या परिणामांसाठी प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यानुसार त्यात बदल करणे आवश्यक आहे.

Protein Digestion
तुमचे शरीर प्रथिने पचवू शकत नाही? तज्ज्ञांनी सांगितली पाच लक्षणे…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
do you eat protein powder daily
तुम्ही नियमित प्रोटीन पावडरचे सेवन करता का? जाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगितलेले दुप्षरिणाम
Should you eat Bottle guard with peel or without the peel health benefits helps for weight management
वजन नियंत्रणात ठेवेल दुधीची साल! पण ती कशाप्रकारे खावी? तज्ज्ञांनी सांगितले…
Zeenat Aman shares her pill swallowing horror story
“औषध घेताना गोळी घशात अडकली अन् माझा श्वास…..”; झीनत अमानने सांगितला भयावह किस्सा; तुमच्याबरोबर असे घडले, तर काय करावे?
Yogi Adityanath News
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य, “सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे, सगळ्यांनी…”
soumendra jena success story
Success Story: १० बाय १० ची खोली ते दुबईतील आलिशान बंगला; १७ वर्षांच्या मेहनतीने बदलले नशीब
Sanitary napkin
परीक्षेला पोहोचताच विद्यार्थीनीला आली मासिक पाळी, तिने सॅनिटरी पॅड मागताच महाविद्यालयाच्या कृतीवर सर्वांनीच व्यक्त केला संताप!

येथे एक वैज्ञानिक विश्लेषण आहे (Here’s a scientific breakdown)

  • दुपारच्या जेवणानंतर ताक (Chaas (buttermilk) after lunch)
    प्रोबायोटिक्सने समृद्ध असलेले ताक पचनास मदत करू शकते आणि आतड्यांतील वनस्पतींना आधार देऊ शकते. “पण, लॅक्टोज अॅलर्जी किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) असलेल्या व्यक्तींना त्यातील दुग्धजन्य पदार्थांमुळे अस्वस्थता जाणवू शकते.
  • जेवणाची सुरुवात भाजी किंवा रस्सा भाजीपासून करा (Starting meals with a sabzi or curry)
    सर्वप्रथम भाज्या खाल्ल्याने फायबर आणि आवश्यक पोषक तत्वे मिळतात, ज्यामुळे तृप्तता आणि ग्लायसेमिक प्रतिक्रिया सुधारण्याची शक्यता असते. तरीही मल्होत्रा यांच्या मते, दाहक आतड्यांचा आजार (inflammatory bowel disease -IBD) असलेल्या व्यक्तींसाठी काही उच्च फायबर भाज्या प्रत्यक्षात लक्षणे वाढवू शकतात.
  • आठवड्यातून दोनदा प्रोबायोटिक्सचा समावेश करणे(Incorporating probiotics twice a week) –
    आतड्यातील मायक्रोबायोटा म्हणजेच सूक्ष्मजीवांचा समुदाय राखण्यासाठी आंबवलेले अन्न उत्तम आहे. “तथापि, ज्यांना लहान आतड्यांमध्ये बॅक्टेरियाची अतिवृद्धी (small intestinal bacterial overgrowth -SIBO) समस्या होत आहे किंवा आंबवलेल्या अन्नांमुळे त्रास होत आहे, त्यांनी हे काळजीपूर्वक घ्यावे,” असे मल्होत्रा म्हणाले.
  • दररोज सकाळी मेथी-हळदीचा चहा पिणे (Drinking methi-haldi tea every morning) –
    मेथी आणि हळद त्यांच्या दाहक-विरोधी आणि आतड्यांना शांत करणारे गुणधर्म म्हणून ओळखले जातात. तरीही जास्त प्रमाणात सेवन केल्याने संवेदनशील व्यक्तींमध्ये जठरांचा त्रास होऊ शकतो.
  • दररोज एक आवळा खाणे (Eating one amla daily)
    आवळा हे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचे एक पॉवरहाऊस आहे, जे पचन आणि रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देते. “काहींसाठी आवळ्याचे आम्लयुक्त स्वरूप आधीच अस्तित्वात असलेल्या आतड्यांसंबंधी आजारांना त्रासदायक ठरू शकते,” असे मल्होत्रा म्हणाले.
  • .

या सामान्य टिप्स अनेकांच्या आतड्यांचे आरोग्य सुधारू शकतात, परंतु IBD, IBS किंवा SIBO सारख्या आजार असलेल्या व्यक्तींना ते योग्य नसतील. वैयक्तिकृत आहार सल्ला महत्त्वाचा आहे; आहारात महत्त्वाचे बदल करण्यापूर्वी नेहमीच पात्र तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची शिफारस केली जाते.

टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. आहारात किंवा दिनचर्येत कोणतेही बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Story img Loader