तुम्ही वारंवार तुमचा फोन चेक करता का? किंवा वारंवार हात धुता किंवा वारंवार एखादी गोष्ट साफ करता का? तुमच्या मनात सतत अपघात होईल किंवा काहीतरी वाईट होईल, अशी भीती असते का? तुम्ही खूप टाळण्याचा प्रयत्न करूनही तुमच्या विचारांना तुम्हाला नियंत्रणात ठेवता येत नसेल किंवा खूप प्रयत्न करूनही तुम्ही पुन्हा पुन्हा एकच कृती पुन्हा पुन्हा करत असाल, तर कदाचित तुम्हाला OCD असू शकतो. OCD हा एक मानसिक आजार आहे, ज्याबाबत तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. OCD म्हणजे काय? एखाद्याला OCD झालाय कसे ओळखावे? OCD बरा होऊ शकतो का? त्यासाठी काय करावे? याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी आम्ही मानसोपचारतज्ज्ञांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

OCD म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रश्मी जोशी-शेट्टी यांनी लोकसत्ताला माहिती देताना खालील काही उदाहरणे दिली आहेत.

पहिले प्रकरण:
“कोमल (नाव बदलले आहे) ही पेशाने डॉक्टर आहे, पण तिला कुठेही स्पर्श करताना अस्वच्छ असल्यासारखे वाटत असे, त्यामुळे तिला वैद्यकीय प्रॅक्टिसदेखील पूर्ण करता येत नव्हती. जेव्हा ती मानसोपचारतज्ज्ञांना भेटली, तेव्हा तिला OCD (Obsessive-compulsive disorder) हा आजार असल्याचे निदान झाले. त्यानंतर मानसोपचारतज्ज्ञांनी तिच्यावर योग्य उपचार केले आणि आता ती या आजारातून पूर्णपणे बरी झाली आहे. आज ती स्वत:चे क्लिनिक चालवते आहे.”

दुसरे प्रकरण :
सौम्या (नाव बदलले आहे) ही सीए आहे. जेव्हा सौम्या परीक्षेची तयारी करत असे, तेव्हा तिला वारंवार मोबाइलवर कोणाचा तरी मेसेज येत आहे असे वाटत होते आणि ती वारंवार फोन चेक करत असे. ती आपण कितीवेळा वारंवार फोन चेक करत आहोत हे देखील मोजत असे. यामुळे अभ्यासामध्ये तिला लक्ष केंद्रित करता येत नव्हते आणि ती अंतिम परीक्षा देऊ शकली नाही. वारंवार एखादा विचार येणे हेदेखील ओसीडी आजाराचे लक्षण असते. सौम्याने जेव्हा मानसोपचारतज्ज्ञांकडे जाऊन यासाठी उपचार घेतले, त्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली. आज ती एक सीए म्हणून तिच्या कार्यक्षेत्रात काम करत आहे.

हेही वाचा – नवरा सतत टोमणे मारतो, प्रेयसी सतत पैशावरून बोलते…तुमचा भावनिक छळ होतोय हे कसे ओळखाल? सुटकेसाठी काय करावे?

OCD ची चिन्हे आणि लक्षणे (Signs and symptoms of OCD)

“ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD) ही एक मानसिक आरोग्याची स्थिती आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये ऑब्सेशन (obsessions) आणि कंप्लशन (compulsions) ही लक्षणे दिसून येतात,” असे डॉ. रश्मी जोशी यांनी सांगितले. ऑब्सेशन म्हणजे परत परत येणारे विचार आणि कंपलशन म्हणजे परत परत होणारी कृती, ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. OCD असलेल्या व्यक्तीला विशिष्ट विचार किंवा शंका मनात वारंवार येत असते, ज्यामुळे तीव्र चिंता आणि अस्वस्थता निर्माण होते. यामध्ये निरर्थक, काहीही तर्क नसलेले किंवा नको असलेले विचार अचानकपणे मनात येतात. हे विचार अत्यंत त्रासदायक असू शकतात आणि त्यांना नियंत्रित करणे कठीण असते. ते टाळण्यासाठी रुग्ण एकच कृती पुन्हा पुन्हा करत राहतो. अनेकदा या स्थितीचा रोजच्या आयुष्यावर परिणाम होतो. “OCD असणाऱ्या रुग्णांना जाणवते की, त्यांना काहीतरी त्रास होत आहे”, असे डॉ. जोशी सांगतात.

ऑब्सेशनची स्थिती आणि लक्षणे (Obsession conditions and symptoms)

सामान्यत: रुग्णांना जाणवणारे ऑब्सेशन हे तीन प्रकारचे असते. पहिले Obsession of contamination म्हणजे सतत संसर्ग होण्याची भीती वाटणे. या स्थितीमध्ये कोणताही नको असलेला विचार व्यक्तीच्या मनात वारंवार येतो. काही रुग्णांना देवी-देवतांचा अनादर होण्याची भीती जाणवते, काही रुग्णांना विशिष्ट संख्येशी संबंधित तीव्र भीती जाणवते. त्याबरोबरच स्वत:ला किंवा इतरांना इजा करण्याचे किंवा अपघात घडण्याचे विचार मनात येतात. अनेकदा त्रासदायक लैंगिक विचार येतात. दुसरा Obsession of symmetry म्हणजे सतत प्रत्येक गोष्ट विशिष्ट क्रमाने किंवा पद्धतीनेच ठेवणे. एखादी वस्तू जरी इकडे तिकडे झाली तरी सहन होत नाही; तिसरे म्हणजे Obsession of doubt सतत स्वत:च्या कामावर शंका घेणे, ते वारंवार केलेले काम नीट आहे का तपासतात. या सर्व लक्षणांमुळे रुग्णांच्या मनात सतत चिंता किंवा अस्वस्थता निर्माण होते.

कंपलशनची स्थिती आणि लक्षणे (Compulsive conditions and symptoms)

ही चिंता किंवा अस्वस्थता दूर करण्यासाठी रुग्ण एकच कृती पुन्हा पुन्हा करत राहतो, ज्याला कंप्लशन म्हणतात. ऑब्सेशन कमी करण्यासाठी ही स्थिती निर्माण होते. या अवस्थेत व्यक्ती वारंवार हात किंवा भांडी अथवा कपडे धुणे किंवा पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट साफ करते (वारंवार ओटा पुसणे). काही रुग्ण विशिष्ट पद्धतीने वस्तूंची सतत मांडणी करत राहतात किंवा सतत प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात, मग ती स्वत:च्या घरात असो की दुसऱ्यांच्या. असे रुग्ण स्वत:ला त्याच अवस्थेत सतत गुंतवून ठेवतात. मनात येणारे वाईट विचार टाळण्यासाठी सतत एखाद्या शारीरिक किंवा मानसिक क्रियेमध्ये (उदा. सतत देवाच्या पाया पडणे, माफी मागणे) स्वत:ला गुंतवतात. अनेकदा रुग्ण एखादा अंक पुन्हा पुन्हा मोजतात किंवा एखादी गोष्ट, शब्द किंवा संख्या वारंवार बोलत राहतात. ही सर्व कंपलशनची लक्षणे आहेत.

तात्पुरता दिलासा मिळवण्यासाठी व्यक्ती कंपलशनच्या दुष्टचक्रात अडकते आणि वारंवार एकच गोष्ट करत राहते. ऑब्सेशन आणि कंप्लशनचे दुष्टचक्र चालूच राहते, ज्यामुळे दैनंदिन कामावर गंभीर परिणाम होतो. एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे काम, नाते आणि एकूणच सर्व गोष्टींवर परिणाम होतो. वारंवार एखादी कृती करत राहिल्यास वेळ वाया जातो आणि कामावर लक्ष केंद्रित होत नाही. व्यक्तीच्या सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्यात समस्या निर्माण होतात, कारण अशा व्यक्ती ऑब्सेशन आणि कंप्लशनची स्थिती निर्माण करणारी कारणे टाळण्यासाठी आसपासच्या लोकांना किंवा परिस्थितीला किंवा संवाद साधणे टाळू लागतात.

हेही वाचा – “मुलांना नव्हे, आधी स्वत:ला शिस्त लावा”; आजच्या पिढीच्या पालकांचे नक्की चुकतंय कुठे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

इंडियन एक्स्प्रेसला ओसीडी बाबत माहिती देताना मुंबई कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे सल्लागार, मानसोपचारतज्ज्ञ डॉ शौनक अजिंक्य यांनी सांगितले की, संशोधनात असे दिसून आले आहे की, “OCD या आजार होण्याच्या कारणांमध्ये न्यूरोबायोलॉजिकल, आनुवंशिक आणि पर्यावरणीय घटकांचा समावेश आहे. बालपणी झालेले संसर्ग आणि आयुष्यातील तणावपूर्ण स्थिती किंवा एखादा मानसिक आघात OCD च्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. एखाद्या व्यक्तीला OCD असेल तर नात्यातील लोकांना OCD होण्याचा धोका जास्त असतो.” याबाबत डॉ. रश्मी जोशी-शेट्टी सहमती दर्शवतात.

OCD हा आजार बरा होऊ शकतो

“योग्य उपचार घेतल्यास OCD हा आजार बरा होऊ शकतो”, असे डॉ. रश्मी जोशी-शेट्टी यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, “वेळीच उपचार न घेतल्यास, OCD तीव्र होऊ शकते, ज्यामुळे तीव्र चिंता आणि आत्मघाती नैराश्य (suicidal depression) येऊ शकते. परंतु, ही उपचार करण्यायोग्य स्थिती आहे आणि यासाठी प्रभावी उपचारात्मक पद्धतीदेखील उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात उपचार घेतल्यास लवकर सुधारणा होण्यास मदत होते. या उपचारादरम्यान रुग्णाला औषध दिले जाते, त्याचबरोबर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला समुपदेशनही केले जाते. ऑब्सेशन आणि कंप्लशन टाळण्यासाठी काही सोप्या ट्रिक सांगितल्या जातात, ज्या रुग्णांना आपल्या विचारांवर आणि कृतीवर नियंत्रण कसे ठेवावे हे शिकवले जाते.”

OCDवरील औषधे आणि उपचार पद्धती

इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना, डॉ शौनक अजिंक्य यांनी OCD वर उपचार करण्याच्या काही प्रभावी औषधे आणि उपचार पद्धतींबाबत सांगितले.
CBT (कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी) OCD साठी सर्वात प्रभावी उपचारांपैकी एक आहे. ऑब्सेशननिर्माण करणाऱ्या विचार पद्धतींना आव्हान देण्यास आणि बदलण्यास मदत करते.
ERP (एक्सपोजर अँड रिस्पॉन्स प्रिव्हेंशन) ही पद्धत विशिष्ट प्रकारची कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी आहे, जी रुग्णाला कंप्लशनचा प्रतिकार करण्यास मदत करते.
SSR (सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर) सारखी Anti-OCD औषधे सहसा मध्यम ते गंभीर OCD ची लक्षणे नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी वापरली जातात.

OCD चा सामना कसा करावा?

१) सर्वप्रथम OCD बद्दल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. त्याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.
२) OCD ची लक्षणे रुग्णांना जाणवतात, त्यामुळे ही लक्षणे जाणवत असतील तर ते मान्य करा.
३) OCD हा आजार बरा होऊ शकतो हे लक्षात ठेवा. OCD आजाराचे निदान करण्यासाठी किंवा उपचार घेण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
४) ऑब्सेशन किंवा कंप्लशनची लक्षणे कमी करण्यासाठी औषधांसह दीर्घ श्वासोच्छ्वास घेणे, योग, ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे चिंता किंवा अस्वस्थता प्रभावीपणे कमी करण्यास मदत होते.
५) तणाव कमी करणार्‍या आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पुरेशी झोप घ्या, निरोगी आहार घ्या, रोज व्यायाम करा, छंद जोपासा आणि प्रिय व्यक्तींसह वेळ घालवा. व्यसनांपासून दूर राहा, कारण धूम्रपान, मद्यपान, ड्रग्ज यामुळे OCD ची लक्षणे वाढतात.
६) OCD रुग्णांच्या गटांमध्ये सहभागी व्हा. त्यांच्याशी संवाद साधा. ऑनलाइन असे समुदाय शोधू शकता, जेणेकरून इतरांचे अनुभव ऐकून तुम्हाला एकटेपणाची भावना कमी होईल आणि बरे झालेल्या रुग्णांचे अनुभव ऐकून प्रेरणा मिळेल.
७) OCD असलेल्या रुग्णांनी स्वत:ला दोष देणे टाळावे. OCD ही एक वैद्यकीय स्थिती आहे आणि त्यात तुमचा काहीही दोष नाही, हे स्वत:ला सांगावे.

OCD असलेल्या रुग्णांना कुटुंबीयांनी कसा द्यावा आधार?

OCD असलेल्या व्यक्तीबरोबर राहणे अवघड जाते, कारण त्यांच्या वागण्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो. वारंवार समजावूनही रुग्ण पुन्हा त्याच गोष्टी करतात, ज्यामुळे कुटुंबीयांबरोबर वाद होतात. OCD बाबत रुग्णांना किंवा कुटुंबीयांना अनेकदा माहीत नसल्यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. रुग्णासह कुटुंबीयांनाही या आजाराबाबत माहीत असणे आवश्यक आहे. OCD आजारातून बरे होण्यासाठी कुटुंबीयांचा आधार अत्यंत महत्त्वाचा असून रुग्णांचे मनोबल वाढवण्यास मदत मिळते. अशा रुग्णासह कुटुंबीयांना समुपदेशन केले जाते.

जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला OCD ची लक्षणे जाणवत असतील, तर तज्ज्ञांची वेळीच मदत घेणे महत्त्वाचे आहे. लवकर निदान झाल्यास योग्य उपचार OCD च्या नियंत्रणावर करता येऊ शकतो आणि रुग्णाच्या वागण्यात लक्षणीय सुधारणा होते, ज्यामुळे रुग्ण आपले आयुष्य आनंदाने जगू शकतो.

OCD असललेल्या रुग्णांना कुटुंबियांनी कसा द्यावा आधार?

OCD असलेल्या व्यक्तीबरोबर राहणे अवघड जाते कारण त्यांच्या वागण्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो. वारंवार समजावूनही रुग्ण पुन्हा त्याच गोष्टी करतात ज्यामुळे कुटुंबियांबरोबर वाद होतात. OCD बाबत रुग्णांना किंवा कुटुंबियांना अनेकदा माहित नसल्यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. रुग्णासह कुटुंबियांनाही या आजाराबाबत माहित असणे आवश्यक आहे. OCD आजारातून बरे होण्यासाठी कुटुंबियाचा आधार अत्यंत महत्त्वाचा असून रुग्णांचे मनोबल वाढवण्यास मदत मिळते. अशा रुग्णासह कुटुंबियांना समुपदेशन केले जाते.

जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला OCD ची लक्षणे जाणवत असतील, तर तज्ज्ञांची वेळीच मदत घेणे महत्त्वाचे आहे. लवकर निदान झाल्यास योग्य उपचार OCD च्या नियंत्रण करता येऊ शकतो आणि रुग्णाच्या वागण्यात लक्षणीय सुधारणा होते ज्यामुळे रुग्ण आपले आयुष्य आनंदाने जगू शकतो.