How to stay safe In October heat : पावसाळा जसजसा संपू लागतो, तसे आपण सगळेच हिवाळा सुरू होण्याची वाट पाहू लागतो. पण, आता आपण सगळेच ‘ऑक्टोबर हीट’चा सामना करीत आहोत, ज्याला पावसाळ्यानंतरचे हवामान म्हणतात. विशेषतः उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये हे हवामान आढळून येते, जसे की भारत. तर ऑक्टोबर हीट (October heat) आणि उन्हाळ्यातील उष्णता यात काही फरक आहे का?

तर याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने उजाला सायग्नस हॉस्पिटल्सचे वैद्यकीय संचालक डॉक्टर आविद अमीन यांच्याशी चर्चा केली. त्याबद्दल डॉक्टर सांगतात की, उन्हाळ्यातील उष्णता कोरड्या (Dry Heat) वातावरणात असते, तर ऑक्टोबर हीटमध्ये (October heat) पावसाळ्यातून उरलेल्या आर्द्रतेसह उच्च तापमान असते. ऑक्टोबरमध्ये कमी किंवा अगदी न पडलेल्या पावसामुळे वातावरणात आर्द्रता टिकून राहते; ज्यामुळे तापमानातील उष्णता अनुभवायला मिळते. पण, ही उष्णता उन्हाळ्यातील तापमानासारखी कोरडी नसते.

kalyan girl cheated for 10 lakhs
कल्याणमधील तरुणीला अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून १० लाखाला फसवले
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
gold price hike in during Navratri festival
ऐन नवरात्राच्या तोंडावर सोन्याच्या दरात बदल… आता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम…
risk of heart disease is increasing at a young age
कमी वयातच हृदयविकाराचा वाढतोय धोका! तो कसा ओळखावा जाणून घ्या…
car maintenance tips
पावसाळा संपल्यानंतर अशी घ्या कारची विशेष काळजी; ‘या’ पाच महत्त्वाच्या टिप्स लक्षात घ्या
cyclonic air condition developed over North Maharashtra forming low pressure belt to North Bangladesh
पुण्यात बुधवारी पडलेल्या पावसाने २१ सप्टेंबर १९३८ रोजीचा विक्रम मोडला; जाणून घ्या, सप्टेंबर महिन्यांतील आजवरच्या पावसाची आकडेवारी
Masaba Gupta shared what she eats in a day
Masaba Gupta : मसाबा गुप्ताप्रमाणे कोमट पाण्यात बडीशेप, जिरे घालून पिणे फायदेशीर आहे का? वाचा गर्भवती महिलांसाठी आहारतज्ज्ञांनी दिलेला सल्ला…
Mumbai: Leopard Spotted Rolling & Relaxing In Bushes Of Aarey Milk Colony
VIDEO: मुंबईतील ‘आरे’मध्ये दिसला बिबट्या अन्…; मध्यरात्री बिबट्या रस्त्याच्या कडेला काय करत होता पाहा

त्यामुळे विशेषतः उत्तर भारत, महाराष्ट्र, गुजरात यांसारख्या प्रदेशांमध्ये अस्वस्थ करणारे वातावरण निर्माण होते; ज्यामुळे ते कोरड्या उन्हाळ्याच्या उष्णतेपेक्षा वेगळे ठरते. या कालावधीत वारा नसल्यामुळे अस्वस्थता वाढू शकते. कारण- उष्णता, आर्द्रता वातावरणात अडकून राहते, असे डॉक्टर अमीन यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय शहरी भागात उष्णतेच्या बेटाच्या घटनेमुळे एक मिश्रित प्रभाव अनुभवला जातो. या ठिकाणी काँक्रीट, डांबरी पृष्ठभाग उष्णता शोषून घेतात आणि ती टिकवून ठेवतात आणि त्यामुळे शहरे या काळात आणखी गरम होतात.

शहरांमध्ये ‘हीट फेनॉमेनॉन’ नावाच्या घटनेमुळे तापमान आणखी वाढते. त्यामध्ये काँक्रीट, डांबराच्या पृष्ठभागांमुळे उष्णता शोषली जाते आणि ती टिकवून ठेवली जाते. त्यामुळे शहरांमध्ये तापमान अधिक उष्ण होते. यामुळे ऑक्टोबरमध्ये (October heat) शहरांमध्ये थोडी अधिक ऊन लागते. कारण- या पृष्ठभागांमुळे वातावरणात उष्णता राहते.

हेही वाचा…Suniel Shetty : सुनील शेट्टीने सांगितला आरोग्याचा मंत्र; ‘या’ तीन पदार्थांपासून तो राहतो नेहमी दूर; पण तज्ज्ञांचे मत काय?

यामुळे कोणते आरोग्य धोके उद्भवू शकतात?

‘ऑक्टोबर हीट’चे (October heat) आरोग्य धोके सांगताना डॉक्टर अमीन म्हणाले की, ऑक्टोबर हीट शरीराच्या नैसर्गिक कूलिंग यंत्रणेवर म्हणजेच शरीरातील ज्या काही प्रक्रिया आपल्याला उष्णता कमी करण्यास मदत करतात, त्यांच्यावर ताण आणू शकते. त्यामुळे उष्णतेचा थकवा (heat exhaustion) म्हणजेच उष्णतेमुळे शरीराला थकवा येतो. तुमचे शरीर जास्त तापमान किंवा उष्णतेत खूप वेळ राहते, तेव्हा तुम्हाला हा थकवा जाणवू शकतो. त्याचबरोबर निर्जलीकरण, श्वसनाच्या समस्या आदी आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

उच्च आर्द्रतेमुळे शरीराचे तापमान नियंत्रित करणे कठीण होऊन अस्थमा, श्वसनाचे इतर आजार यांसारख्या परिस्थिती वाढ होऊ शकते. वृद्ध, मुले, गर्भवती महिला, घराबाहेरील कामगार, विद्यमान वैद्यकीय परिस्थिती असलेले लोक आदी लोकांना या उष्णतेचा जास्त धोका असू शकतो. या उष्णतेच्या संपर्कामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते, ज्यावर लक्ष देणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉक्टर अमीन यांनी दिला आहे.

या वातावरणात सुरक्षित कसे राहायचे?

ऑक्टोबर हीटमध्ये (October heat) सुरक्षित राहण्यासाठी आणि शरीराला हायड्रेशन मिळवून देण्यासाठी “दिवसभर भरपूर पाणी प्या. शरीर थंड राहण्यासाठी सौम्य रंगाचे अन् सैलसर कपडे घाला. सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान खूप ऊन असेल त्यावेळी बाहेर जाणे टाळण्याचा प्रयत्न करा. पंखे, वातानुकूलन यंत्र यांद्वारे तुमच्या घरातील वातावरण थंड ठेवा. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी वारंवार थंड शॉवर, स्पंज बाथ घ्या फळे, भाज्या भरपूर असलेल्या हलक्या जेवणाचे सेवन करा. त्यामुळे शरीरातील उष्णता न वाढता, तुमची ऊर्जा टिकून राहते आदी उपाय सुचवले आहेत. त्याचबरोबर कॅफिन, अल्कोहोल टाळण्याचा प्रयत्न करा. कारण- यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. त्याचप्रमाणे या वातावरणात वृद्ध, लहान मुले आदी व्यक्तींची तपासणी करणेदेखील महत्त्वाचे आहे. कारण- ते उष्णतेच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे तुमच्या अन् त्यांच्या शरीराकडे लक्ष द्या. तुम्हाला चक्कर येणे, थकवा येणे किंवा डोकेदुखी जाणवू लागल्यास, उष्णतेशी संबंधित हे आजार टाळण्यासाठी वैद्यकीय मदत घ्या,” असे डॉक्टर अमीन म्हणाले.