भेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अनेक जण भेंडीची भाजी आवडीने खातात. भेंडीचा आहारात समावेश केल्याने फक्त जेवणात विविधताच येत नाही, तर अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात. पण, आठवड्यातून भेंडीचे किती वेळा सेवन केले पाहिजे. त्याचे आरोग्यदायी फायदे कोणते याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेऊ. डॉ. विधी चावला, फिसिको डाएट, ॲस्थेटिक क्लिनिक आणि वनस्पती शास्त्र व मानवी आरोग्य या विषयातील तज्ज्ञ डॉ. डॅनगुबरल यांनी याबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

डॉ. डॅनगुबलर हे वनस्पतींचे नैसर्गिक रेणू मानवी आरोग्यामध्ये कशी सुधारणा करू शकतात या विषयावर अभ्यास करणारे तज्ज्ञ आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर भेंडीच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यात त्यांनी म्हटले की, जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल, तर त्याने रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आणि इन्सुलिनची संवेदनशीलता उलट करण्यासाठी भेंडी फायदेशीर ठरते. भेंडीमध्ये क्वेर्सेटिन ग्लुकोसाइड्स नावाचे फायटोन्युट्रिएंट्स असतात; जे रक्तातील साखरेची पातळी, इन्सुलिनची पातळी आणि एकूणच चयापचय आरोग्य सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे आठवड्यातून दोन वेळी भेंडी खायला हवी.

milk with salt being harmful for health is this true
Milk With Salt : दुधात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्यास चेहऱ्याला खाज सुटते का? हा दावा खरा की खोटा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
indian concept religion laws Constitution of India Rashtradharma granth
धर्मानुसार वर्तनाला कायद्याची परवानगी, पण म्हणून वाट्टेल ते खपवून घेतले जाणार नाही!
Best time for Job Hunting
Best time for Job Hunting : कोणत्या महिन्यांमध्ये नोकरी शोधावी? जाणून घ्या, नोकरी शोधण्याची सर्वोत्तम वेळ
kalyan dombivli municipal corporation marathi news
कल्याण डोंबिवली पालिकेतील दोन अभियंत्यांना आयुक्तांची कारणे दाखवा नोटिस, मलवाहिन्या सफाई कामातील ठेकेदाराच्या कामात त्रुटींकडे दुर्लक्ष
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
Women who are part of the crowd need self-awareness
हे आत्मभान कधी येईल?
Loksatta anvyarth Bombay High Court decision Ganesha idol Immersion Ganeshotsav
अन्वयार्थ: राज्य कायद्याचे की अस्मिताकारणाचे?

या संदर्भात डीटी विधी चावला, फिसिको डाएट व ॲस्थेटिक क्लिनिक यांनी डॉ. डॅनगुबलर यांच्या मताशी सहमती दर्शवत म्हटले की, अनेक आरोग्यविषयक कारणांमुळे आणि पौष्टिक घटकांमुळे आठवड्यातून किमान दोनदा तुमच्या आहारात भेंडीचा समावेश असला पाहिजे. त्यातील प्रभावी पौष्टिक घटकांमुळे वजन नियंत्रणात ठेवता येते, तसेच हृदय आणि आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवता येते. त्यामुळे भेंडी पौष्टिक घटकांची एक पॉवर पॅक आहे.

१) पोषक तत्त्वांचे पॉवरहाऊस

भेंडीची भाजी ही पोषक तत्त्वांची एक पॉवरहाऊस आहे. ती आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण आहे. भेंडी ही व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के व फोलेटची समृद्ध स्रोत आहे. त्यामुळे भेंडी संपूर्ण आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

२) फायबरने समृद्ध

भेंडी हाय फायबरने समृद्ध मानली जाते. हे फायबर पचनास मदत करते, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते आणि भुकेची भावना कमी करते; ज्यामुळे तुम्हाला वजन नियंत्रित ठेवता येते.

३) कॅलरीजचे प्रमाण कमी

शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी करण्यासाठी भेंडी हा एक स्मार्ट पर्याय आहे. भेंडीच्या सेवनाने दैनंदिन कॅलरीजचे प्रमाण कमी करीत भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे प्रदान करते; त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी भेंडी फायदेशीर ठरते.

४) रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण

भेंडीमध्ये आढळणारे विरघळणारे फायबर पचन संस्थेत साखरेचे शोषण कमी करते. हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करू शकते; ज्यामुळे भेंडी मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या आहारातील एक फायदेशीर घटक ठरतो.

५) हृदयाचे आरोग्य सुधारते

भेंडीतील अँटिऑक्सिडंटस् LDL कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन रोखून हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. त्यात पोटॅशियमदेखील असते; जे निरोगी रक्तदाब पातळीला समर्थन देते.

६) आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगली

भेंडी आतड्यांतील चांगल्या जीवणूंच्या वाढीस प्रोत्साहन देऊन, आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवते. एक संतुलित आतडे मायक्रोबायोमयोग्य पचन आणि संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

७) वजन व्यवस्थापन

भेंडीतील उच्च फायबर घटकांमुळे भुकेची भावना मंदावते आणि जास्त खाण्याची शक्यता कमी करते. त्यामुळे वजन व्यवस्थापनात भेंडी हा एक गुणकारी उपाय आहे.

८) डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली

भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए असते; जे निरोगी दृष्टी राखण्यासाठी आवश्यक असते. भेंडीच्या नियमित सेवनाने डोळ्यांशी संबंधित समस्यांपासून संरक्षण आणि दृष्टी चांगली ठेवण्यास मदत मिळू शकते.

९) त्वचेसाठी फायदेशीर

भेंडीमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स घटक असतात; जे त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यास हातभार लावतात. ते कोलेजन उत्पादनास समर्थन देतात आणि ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करतात. त्यामुळे त्वचेचा टोन आणि रंग उजळतो.

१0) रुचकर जेवणाचा आनंद घेता येतो

भेंडीची सौम्य चव स्वयंपाकातील एक बहुमुखी घटक बनते. तुम्ही त्याचा वापर गुम्बो, स्ट्राय-फ्रायपासून ते सॅलड्स आणि सूपपर्यंत विविध प्रकारच्या डिशेसमध्ये करू शकता; ज्यामुळे तुमच्या जेवणात आनंददायी ट्विस्ट येईल.