Olive Oil Beneficial For Snoring: त्वचेसाठी ऑलिव्ह ऑईलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण, ऑलिव्ह ऑईल केवळ त्वचेसाठीच नव्हे, तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. अनेक शारीरिक समस्या दूर करण्यासाठीही याचा वापर केला जातो. प्रत्येक कुटुंबात एक तरी व्यक्ती अशी असते, की जिच्या घोरण्यामुळे इतरांची झोपमोड होते. काही हेल्थ एक्स्पर्ट्सच्या मते, ऑलिव्ह ऑईल घोरण्याची समस्या दूर करण्यासाठीही खूप गुणकारी आहे. पण खरंच हे फायदेशीर आहे का?

ऑलिव्ह ऑईल घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर?

खाली दिलेल्या या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये डॉ. स्टीव्हन गुंड्री सांगतात, “ऑलिव्ह ऑईलच्या वापराने झोपेत निर्माण होणारी घोरणे ही श्वासोच्छवासाची समस्या दूर करण्यास मदत होते. त्यासाठी झोपण्यापूर्वी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचे सेवन करा.”

Different types of oils and their uses in marathi
Oils for Health: बाळंतपण, मासिक पाळी ते स्थूलपणा कमी करण्यासाठी एकच उपाय; घरगुती तेलं कशी ठरत आहेत फायदेशीर?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ramphal health benefits In Marathi
Ramphal : रोज रामफळ खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो? डॉक्टरांची माहिती वाचून व्हाल खूश
penaut oil for diabetis patients?
शेंगदाण्याचं तेल डायबेटिस असणाऱ्यांनी वापरावं का?
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?
Should You Cook Everything In Ghee? Pros And Cons You Need To Know
जेवणात तेल वापरावे की तूप? हा प्रश्न पडलाय; महिलांनो जाणून घ्या उत्तर
cardamom water benefits
वेलचीचे अशाप्रकारे सेवन केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ आश्चर्यकारक बदल, तज्ज्ञांनी सांगितले जबरदस्त फायदे
what happens when you keep a pillow between your legs while sleeping
तुम्ही देखील झोपताना पायामध्ये उशी ठेवता का? ‘ही’ झोपण्याची योग्य पद्धत आहे का? तज्ज्ञांनी केला खुलासा…

पण. त्यांचा हा दावा कितपत खरा आहे याबाबत डॉ. शिवकुमार के. (एमडी व बर्ड्स क्लिनिकचे सल्लागार) सांगतात, “घशाचे स्नायू शिथिल होणे किंवा श्वासनलिकेतील शारीरिक अडथळ्यांमुळे घोरण्याची समस्या उदभवते. ऑलिव्ह ऑईल खूप बहुगुणी आहे; पण ते घोरणे कमी करण्यासाठी खूप प्रभावी काम करेलच, असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही.”

डॉ. मुरारजी घाडगे (सल्लागार व ईएनटी सर्जन) हेदेखील डॉ. शिवकुमार यांच्याशी सहमत आहेत. त्यांच्या मते, “ऑलिव्ह ऑइल श्वसनमार्गावर पूर्णपणे परिणाम करून घोरणे कमी करील याची शाश्वती देता येत नाही.”

डॉक्टरांच्या निर्ष्कषानुसार, “घोरणे कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर तुम्ही प्रथमोपचार म्हणून करू शकता. परंतु, यामुळे घोरण्याची समस्य पूर्णपणे दूर होत नाही.”

हेही वाचा : यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत

घोरण्यावर उपचार

डॉ. शिवकुमार सांगतात की, घोरणे कमी करण्यासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल करावेत किंवा हेल्थ एक्सपर्ट्सचा सल्ला घेऊन, त्यानुसार यावर उपचार करावा.

बऱ्याचदा वजन वाढल्याने विशेषत: मानेभोवती चरबी वाढल्यास झोपेत घोरण्याची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा; जेणेकरून मानेभोवतीची चरबी कमी होऊन, घोरणे कमी होण्यास मदत होते.

तसेच अल्कोहोल, तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावे. झोपण्यापूर्वी शक्यतो या पदार्थांचे सेवन करू नये.

Story img Loader