Why do we get headaches if we are on an empty stomach for too long? तुम्हाला वारंवार जेवण वगळण्याची, वेळेवर जेवण न करण्याची आणि उपाशी राहण्याची सवय आहे का? रिकाम्या पोटी थोडा वेळ राहिल्यावर तुम्हालाही अनेकदा डोकेदुखीचा त्रास होतो का? हो, सगळ्यांनाच होतो. आपण अनेकदा सकाळचा नाश्ता केला नाही तर शरीरावर काय परिणाम होतो याबद्दल बोललो आहोत, पण तुम्हाला माहितीये का? नियमित जेवण केलं नाही किंवा जेवण वगळल्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण याचा थेट परिणाम मेंदूवर होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. शीतल गोयल, यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. शीतल गोयल सांगतात की, मेंदू त्याचा प्राथमिक ऊर्जा स्त्रोत म्हणून ग्लुकोजवर अवलंबून असतो. “जेव्हा आपण जेवण वगळतो, तेव्हा ग्लुकोजची पातळी कमी होते आणि मेंदूला चांगल्या प्रकारे कार्य करण्यास त्रास होऊ शकतो. यामुळे एकाग्रता कमी होते, स्मरणशक्ती कमी होते आणि मूड बदलू शकतो.” डॉक्टरांच्या मते, दीर्घकाळापर्यंत ग्लुकोजच्या कमतरतेमुळे कॉर्टिसोलसारख्या तणावाचे प्रमाण वाढते, संज्ञानात्मक कार्य आणखी बिघडते आणि चिडचिड किंवा चिंता वाढते.

जर आपण जास्त वेळ रिकाम्या पोटी राहिलो तर आपल्याला डोकेदुखी का होते?

रिकाम्या पोटी डोकेदुखी बहुतेकदा कमी रक्तातील साखरेमुळे होते, ज्यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. “ग्लुकोजच्या कमतरतेमुळे कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालाईनसारख्या तणाव संप्रेरक प्रवृत्त होतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात; ज्यामुळे डोकेदुखी होते.” पुढे त्या सांगतात की, निर्जलीकरण आणि भुकेमुळे स्नायूंचा ताण वाढल्याने अस्वस्थता वाढू शकते. रक्तातील साखरेतील बदलांबद्दल मेंदूची संवेदनशीलता या लक्षणांना विशेषतः असुरक्षित बनवते.

हेही वाचा >> हिवाळा ठरू शकतो आरोग्यासाठी त्रासदायक! ‘अशा’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी

डोकेदुखी टाळण्यासाठी किती तासांनी जेवण केलं पाहिजे?

डोकेदुखी टाळण्यासाठी दिवसभरात दर चार ते सहा तासांनी खाण्याची शिफारस केली जाते. ही कालमर्यादा रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते आणि शरीराला इंधन पुरवते. डॉ. गोयल म्हणाल्या की, अन्नाशिवाय सहा तासांपेक्षा जास्त वेळ गेल्याने रक्तातील साखर कमी होऊ शकते, ज्यामुळे भुकेमुळे डोकेदुखी होऊ शकते. यावेळी उपाशी न राहता प्रथिने आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्ससह संतुलित जेवण आणि स्नॅक्स खाण्यावर त्यांनी भर दिला, ज्यामुळे ऊर्जा टिकून राहते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On empty stomach for a while neurologist reveals what happens to the brain when you skip meals srk