पल्लवी सावंत पटवर्धन
ऑस्ट्रेलियाच्या चौफेर क्षेत्ररक्षणामुळे आपल्या हातून विश्वचषक निसटला आणि त्यानिमित्ताने क्रीडा पोषणतज्ज्ञ म्हणून खेळाडूंच्या आहाराबाबत आणखी थोडीशी माहिती सगळ्यांनाच पाहायला हवी याबाबतची जाणीव झाली. मुळात क्रिकेटसारखा खेळ ज्याला आपण मिश्र खेळ म्हणतो यामध्ये ताकद, वेग, चपळता यांचा देखील समावेश असतो. आपले बरेचसे क्रिकेटपटू हे विशेषतः आत्ताचे. आपला उत्कृष्ट संघ होता. आपले क्षेत्ररक्षण, आपले फलंदाज गोलंदाज या तिन्ही बाबतीमध्ये आपण उजवे होतो मात्र ज्यावेळी ऑस्ट्रेलियच्या क्षेत्ररक्षणाची आणि आपल्या क्षेत्ररक्षणामधील फरकाची आपण तुलना करतो त्यावेळी आपल्याला हे लक्षात येईल की ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची चपळता आपल्या खेळाडूंपेक्षा जास्त होती.

क्रिकेटपटूंचा सामन्यांपेक्षा जास्त वेळ हा ट्रेनिंग मध्ये असतो. त्यांच्या ट्रेनिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती करून घेतल्या जातात, म्हणजेच क्षेत्ररक्षण फलंदाजी गोलंदाजी या तिन्ही आघाड्यांवर उपयुक्त अशा प्रकारचे ट्रेनिंग क्रिकेटरपटूंना दिले जाते. ट्रेनिंगच्या आधीच आहार हा देखील तितकाच महत्वाचा असतो. अनेकदा ट्रेनिंगच्या आधी दोन तास आधी पूर्ण जेवण किंवा फळे किंवा स्मूदी अशा प्रकारचा आहार दिला जातो. काही क्रिकेटपटू अशा वेळेला स्नॅक बार किंवा नट्स बार किंवा दही आणि म्युसली अशा प्रकारचा आहार देखील घेतात.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा

काहीजण हलक्या तेलामध्ये परतलेल्या भाज्या किंवा मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचा समावेश त्यांच्या ट्रेनिंगच्या आधीच्या आहारात करतात. वातावरणाचादेखील परिणाम क्रिकेटपटूंच्या सरावावर होत असतो. एखादा क्रिकेटपटू समशीतोष्ण हवामानामध्ये खेळत असतो त्यावेळी समशीतोष्ण हवामानानुसार त्यांची हाइड्रेशन स्ट्रॅटेजी म्हणजे शरीरातील आर्द्रता राखण्यासाठी प्यायला जाणारे पाणी किंवा रस यांचे प्रमाण ठरवण्यासाठी देखील आवश्यक ठरते. आपण पाहिले असेल की क्रिकेट सामन्यात जे ब्रेक असतात याला ड्रिंक्स ब्रेक असे म्हटले जाते. अनेकदा खेळाडू वेगळ्या प्रकारची द्रव्ये या दरम्यान पिताना आढळतात. हायड्रेशन म्हणजे शरीरातील आर्द्रता राखणे हा त्यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. आपण विश्वचषकाच्या दरम्यान पाहिलेच असतील की खेळाडू अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे पाणी पिताना आपल्याला दिसतात. या प्रकारचे पाणी आहारात ठेवताना ते ठराविक प्रमाणात प्यायले जावे याची काळजी घेतली जाते. अनेकदा क्रिकेटपटू मैदानी खेळासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोडियम पोटॅशियम क्लोराइड साखर यांचे प्रमाण असणारी द्रव्ये खेळाडूंना दिली जातात याला हायपर टॉनिक आयसोटोनिक किंवा हायपोटोनिक ड्रिंक्स असे म्हटले जाते. या द्रव्यातील सोडियम , क्षार आणि पाणी मात्रेवर या द्रव्यांचा प्रकार ठरवला जातो.

शक्यतो क्रिकेटसारख्या जास्त वेळ चालणारा सामन्यांमध्ये बऱ्यापैकी शरीरातले पाणी कमी होत असते अशावेळी योग्य वेळी योग्य प्रमाणात सोडियम आणि क्षारांचे प्रमाण शरीरात राखले जाणे अत्यंत आवश्यक असते. आपण या वेळेला भारतीय क्रिकेटपटूंच्या अनेक मुलाखती ऐकल्या आहेत. विराट कोहलीने अनेक वेळा त्याने त्याचा आहार शाकाहारी ठेवला आहे किंवा त्याच्या आहारामध्ये हळूहळू बदल केले आहेत हे वारंवार सांगितलं आहे. त्याचप्रमाणे नवोदित खेळाडूंमध्ये देखील अनेक खेळाडू असे आहेत जे त्यांच्या आहाराबाबत अत्यंत सजग आहेत.

रोहित शर्माचे गेल्या काही वर्षातील ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच त्याच्यात खेळाडू म्हणून झालेला बदल आपण पाहिलेला आहे. खाण्यामध्ये असणारे पदार्थ त्या पदार्थातील पोषणतत्वे हादेखील तितकाच महत्वाचा भाग असतो. क्रिकेटपटूंना सर्वाधिक आवश्यकता कशाची असेल तर ती म्हणजे प्रथिने आणि द्रव्य प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने योग्य प्रमाणात आहारात असणे. त्यांच्या नियमित आहाराचा भाग असते. साधारण दोन हजार ते तीन हजारपर्यंत ऊर्जेची त्यांना नियमितपणे आवश्यकता असते आणि इतक्या कॅलरीज आहारातून घेताना त्याचा अतिरेक होणार नाही यासाठी देखील कॅलरीचे संतुलन राखणे तितकेच महत्त्वाचे असते त्यामुळे क्रिकेटपटपटूंच्या आहारामध्ये संपूर्ण पोषकत्वे असणारा उत्तम कॅलरीचा आहार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो जसजसे सामने जवळ येत जातात तस तसा ट्रेनिंग मध्ये होणारा बदल आणि आहारात कधी कधी वाढत जाणारे कर्बोदकांचे प्रमाण हा क्रिकेटरपटूंच्या आहारातील सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो ज्याला शास्त्रीय भाषेत किंवा आहार शास्त्राच्या भाषेत कार्बोहायड्रेच लोडिंग असे देखील म्हटले जाते.

ट्रेनिंग नुसार कर्बोदके आणि प्रथिने यांचे प्रमाण बदलत असताना खेळाडूच्या मनावरील ताण हा देखील तितकाच महत्त्वाचा भाग असतो. शारीरिक आणि मानसिक ताणाचे संयोजन योग्य प्रकारे करणे, आहारातील पोषण घटकांचे संयोजन योग्य प्रकारे करणे आणि एक संतुलित आहार क्रिकेटपटूला अत्यंत चांगला खेळाडू बनवू शकतो. चपळता वाढवणे, ताकद वाढवणे त्यांच्या क्रिकेटमधील वैशिष्ट्यानुसार म्हणजे फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण यासारख्या मुख्य कामानुसार त्यांच्या आहारात बदल करून आवश्यक ते आवश्यक ती शरीरयष्टी तयार करून घेणे यासारखे महत्त्वाचे कार्य योग्य आहारामुळे होऊ शकते. सुदैवाने अलीकडे भारतीय क्रिकेटमध्ये देखील फिटनेस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यानुसार क्रिकेटपटू आपल्या आहारात बदल करत आहेत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. या वर्ल्डकपमध्ये आपण सलग १० सामने जिंकलेले आहेत हेच आपल्या क्रिकेटपटूंच्या उत्तम आहाराचं, दिनचर्येचं आणि फिटनेसचं प्रमाण समजू शकतो.