मागच्या लेखात आपण सेंट्रल सेंसिटायझेशन ची लक्षणं बघितली पण याव्यक्तिरिक्त काही अशी लक्षणं आहेत जे आपल्याला पेशंट ला जाणवणारी वेदना सेंट्रल सेंसिटायझेशनशी निगडीत आहे असा संकेत देतात, ही लक्षणं ओळखण पेशंटच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. म्हणूनच ही लक्षणं सेंट्रल सेंसिटायझेशन ची हॉलमार्क लक्षणं म्हणून ओळखली जातात.

आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात गरम पाण्याचा शेक का घ्यावा?

Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

१.अवास्तव, अंदाज न घेता येणारी, बर्‍याचवेळा कुठल्याही उत्तेजनाशिवाय होणारी वेदना.

२.कोणत्याही ठोसकरणांशीवाय वाढणारी किंवा कमी होणारी वेदना

३.शरीराच्या नॅच्युरल हिलिंग कालावधीच्यापुढे लांबलेली वेदना

४. झालेल्या इजेच्या कितीतरी पट अधिक जाणवणारी वेदना

५. शरीराच्या एका भागात उत्पन्न होऊन इतर भागात पसरणारी वेदना.

६.विविध औषधउपचार आणि इतर उपायांना प्रतिसाद न देणारी वेदना

७. मानसिक स्थितीने आणि भोवतालच्या वातावरणाने प्रभावित होणारी वेदना, नकारात्मक विचार, पसिव उपायोजनांवर अवलंबित्व, निराशावादी विचार, नातेसंबंधांमधील तणाव, कामाच्या ठिकाणी वाढता तणाव.

८.वेदनाशामक औषधना धीमा प्रतिसाद किंवा शून्य प्रतिसाद पण काही अॅंटी डेप्रेस्संट्सना चांगला प्रतिसाद देणारी वेदना.

९.दैनंदिन आयुष्यातील अक्टीवितीज म्हणजेच क्रिया आणि कम्युनिटी पार्टीसिपेशन म्हणजेच सामाजिक सहभागावर अति प्रमाणात मर्यादा आणणारी वेदना

१०.दिवसापेक्षा रात्री अधिक तीव्रतेने जाणवणारी आणि झोपेचा वेळ आणि गुणवत्ता कमी करणारी वेदना

आणखी वाचा: Health Special: पावसाळा, अशुद्ध पाणी आणि आजारांची मालिका

सेंट्रल सेंसिटायझेशन: रिस्क फॅक्टर्स

काही घटकांमुळे सेंट्रल सेंसिटायझेशन विकसित होण्याची शक्यता वाढू शकते,

१.संधिवात, कंबरदुखी, सारखे जुनाट आजार

२.काही विशिष्ट ऑटो इम्यून आजार जिथे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या पेशींवर हल्ला करते

३. काही अनुवंशिक घटक- कुटुंबातील मानसिक आजार

४. मानसिक आजार- नैराश्य, मूड डिसोर्देर्स

५. काही विशिष्ट आजारांची वर्षानुवर्ष चालणारी ट्रीटमेंट आणि सततचा हॉस्पिटल स्टे

सेंट्रल सेंसिटायझेशन: निदान

१.सेंट्रल सेन्सिटायझेशन हे अनेक वेगवेगळ्या क्रॉनिक पेन सिंड्रोमचे स्पष्टीकरण देण्यासाठी एक गृहितक आहे, औपचारिक वैद्यकीय निदान नाही.

२.सध्या उपलब्ध असलेला कोणताही स्त्रोत किंवा कोणतीही वैद्यकीय चाचणी एखाद्या व्यक्तीला ही स्थिती आहे हे निर्णायकपणे ठरवू शकत नाही.

३.याचं निदान हे बहुतकरून रुलिंग आउट तत्वावर केलं जातं- क्ष-किरणांसारख्या इमेजिंग चाचण्यांद्वारे स्नायू, सांधे किंवा हाडांच्या दुखापतींची तपासणी करून डॉक्टर सहसा इतर कारणे नाकारतात.

४. संधिवात सारख्या तीव्र वेदना होऊ शकणारे इन्फ्लमेट्री आजार रुल आउट करण्यासाठी काही रक्त चाचण्या देखील सांगितल्या जातात.

५. इतर कंडिशन्स रुल आउट केल्यानंतर, डीटेल हिस्टरी घेतली जाते, वर दिलेले हॉलमार्क फित्चर्स काळजीपूर्वक रित्या तपासले जातात.

शिवाय आधीच्या लेखात दिलेली अलोडायनिआ, हयपेरल्गेसीया, हायपरपाथिया ही लक्षणं तपासली जातात

सेंट्रल सेंसिटायझेशन: उपाय

१.सेंट्रल सेंसिटायझेशन वर उपाय करण्यासाठी ज्या आजारमुळे ते होतं आहे त्यावर इलाज करण आवश्यक ठरतं.

२. फिजिओथेरपी: योग्य प्रमाण, तीव्रता, कालावधी चे व्यायाम, जीवनशैलीतील बदल, वेदना कमी करण्यसाठीची काही उपकरण आणि सगळ्यात महत्वाचं पेन
एड्युकेशन

३. संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी (CBT) वेदना सह जगण्याच्या भावनिक पैलूंना सामोरे जाण्यासाठी ही थेरपी मदत करते

Story img Loader