How To Freeze Fruits & Vegetables For Better Health: निरोगी आरोग्य हवे असेल तर नेहमी ताजी फळे, भाज्या, ताजे शिजवलेल्या अन्नाचेच सेवन करावे असे सांगितले जाते. पण काही वेळा सुविधांचा अभाव किंवा हंगामी फळे व भाज्यांचे सेवन सर्व मोसमात करायचे असल्यास त्यांना स्टोअर करून ठेवणे भाग असते. फ्रीजर मध्ये स्टोअर केलेल्या पदार्थांच्या पोषण मूल्याबाबत अनेकांना काही गोष्टी ठाऊक नसतात त्यामुळे प्रत्येकजण यामुळे नुकसान होऊ शकते असं सांगतो. पण अलीकडेच रितिका समद्दार, प्रादेशिक प्रमुख, पोषण आणि आहारशास्त्र, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दिल्ली, आणि भक्ती सामंत, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथील मुख्य आहारतज्ज्ञ, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला माहिती देताना अन्न फ्रीजरमध्ये ठेवण्याचे काही फायदे व योग्य पद्धत सांगितली आहे.

लक्षात घ्या: सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेल्या पदार्थांचे पोषणमूल्य कमी- जास्त होणे हे सर्व भाजीपाल्याच्या प्रकारावर, कापल्यापासून मूळ वापरापर्यंतचा वेळ आणि गोठवण्याच्या/साठवण्याच्या विशिष्ट पद्धतींवर अवलंबून असते.

article about sahyadri sankalp society information
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा ‘संकल्प’
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
sebi worry about sme ipo
विश्लेषण: ‘एसएमई आयपीओं’तील तेजी खुपणारी का? त्यावर सेबीची चिंता आणि उपाययोजना काय?
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
health experts advise drummers for relief from permanent pain due to drumming
Pain From Drumming : ढोल-ताशावादनामुळे जडतेय कायमचे दुखणे! आरोग्यतज्ज्ञांचा वादकांना काळजी घेण्याचा सल्ला

कोणत्या प्रकारचे फ्रीझिंग हेल्दी आहे? (Which Type Of Freezing is Healthy)

बहुसंख्य घरांमध्ये फ्लॅश फ्रीझिंग ही सामान्य प्रक्रिया वापरली जाते. यामुळे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व, विशेषत: व्हिटॅमिन सीच्या कमीत कमी नुकसानासह सर्व पोषक घटक राखून ठेवता येतात. रितिका समद्दार सांगतात की, शेतातून उत्पादन (फळे आणि भाज्या) काढले की ते मूळ सेवन करेपर्यंत पोषण विरुद्ध वेळ अशी स्पर्धा सुरु असते. जर तुम्ही फळे आणि भाज्या फ्रीजरमध्ये किंवा अतिथंड तापमानात स्टोअर करत असाल आणि त्यांना पुन्हा रूम टेम्परेचर वर आणताच लगेच सेवन करणार असाल तर अशी पद्धत फ्रीजिंग व वापरासाठी सुरक्षित ठरू शकते.

मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील मुख्य आहारतज्ज्ञ भक्ती सामंत म्हणतात, “फ्रोझन भाज्यांचे शेल्फ लाइफ ताज्या भाज्यांपेक्षा जास्त असते. यात तुम्हाला अतिरिक्त मीठ किंवा साखर न घालता, भाज्या स्टोअर करता येतात त्यामुळे अधिक सोडियमचे सेवन किंवा ब्लड शुगरची वाढ अशाही चिंता कमी होतात. वेळ वाचवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे कारण तुम्हाला माहित असतं की तुमच्याकडे कोणत्यावेळी किती सामना उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही स्वयंपाकाचे प्लॅन करू शकता.

पालक व वाटाण्याच्या फ्रीजिंगचे फायदे (Benefits Of Freezing Palak And Peas)

फूड टेक्नॉलॉजीच्या प्रगतीमुळे ताजे अन्न बनवल्यावर काही तासात गोठविले जाते आणि त्यावर प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे बरेच पोषण राखून ठेवता येते. म्हणूनच काहीवेळा नुसताच किचनमध्ये ठेवलेला पालक सात दिवसात १०० टक्के व्हिटॅमिन सी गमावू शकतो तसेच त्याचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होते. पण शेतातून काढल्यावर लगेच गोठवलेला पालक शिजेपर्यंत व्हिटॅमिन टिकवून ठेवतो. पालक शिजवताना सहसा आधी गरम पाण्यात उकळून मग स्टोअर केला जातो त्यामुळे व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, लोह आणि फोलेट यासह त्यातील बहुतेक पोषक घटकांचे संरक्षण होते.

गोठवलेले वाटाणे पिकण्याच्या शेवटच्या टप्प्यात काढले जातात आणि त्वरीत गोठवले जातात. यामुळे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए आणि फायबरसह उच्च पातळीचे पोषकसत्व टिकून राहते. फ्रोझन कॉर्नची (गोठवलेला मका) कापणीनंतर लगेचच स्टोअर केल्याने व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि आहारातील फायबर टिकून राहते.

फ्रोजन आणि कॅन केलेल्या पदार्थांमध्ये काय फरक आहे? (Frozen vs Canned Food)

कॅनिंग मध्य फळे आणि भाजीपाला हवाबंद कंटेनरमध्ये दीर्घकाळ टिकवून ठेवले जातात. ही प्रक्रिया सामान्यतः प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स आणि न विरघळणारी जीवनसत्त्वे कमीत कमी नुकसानासह राखून ठेवते. मात्र व्हिटॅमिन बी आणि सी सारखी पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कमी होऊ शकते. काहीवेळा, रंग आणि पोत सुधारण्यासाठी कॅन पदार्थांमध्ये मीठ, साखर किंवा संरक्षक जोडले जातात. गोठवलेल्या भाज्या आणि फळांमध्ये कॅन केलेला भाज्यांपेक्षा एक फायदा असा आहे की त्यामध्ये जास्त मीठ किंवा साखर नसते कारण गोठवण्याची प्रक्रिया स्वतःच बॅक्टेरियाची वाढ थांबवू शकते.

हे ही वाचा<< बटाटा, भात खाऊनही ब्लड शुगरवर अंकुश कसा ठेवाल? त्यांना रेसिस्टंट स्टार्चमध्ये बदलण्यासाठी काय करावे?

जेव्हा ताजी फळे आणि भाज्यांचा विचार केला जातो, तेव्हा शेतातून तुमच्या घरापर्यंत लागणारा वेळ, तसेच ते किती चांगले साठवले गेले हे महत्त्वाचे असते. पौष्टिक मूल्य वाढवण्यासाठी आणि सूक्ष्मजंतू आणि कीटकनाशकांच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी योग्य पद्धतीने कोणतीही गोष्ट धुणे आणि साठवणे आवश्यक आहे.