Palm Sugar releases excess body heat during summer: उन्हाळ्याचा तडाखा बसायला सुरूवात झाली की थकवा जाणवू लागतो. तसंच घामाद्वारे शरीराच्या पाण्याची पातळी कमी होऊन आपल्या शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते. उन्हाळ्यात शरीरातील उष्णतादेखील वाढते आणि या सगळ्या त्रासांवर आपण अनेक उपाय शोधत असतो.
आयुर्वेदिक अभ्यासक डॉ श्रीविध्या प्रशांत यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, शरीरातील अतिरिक्त उष्णता त्वरित बाहेर काढण्यासाठी पाम शुगर एक महत्त्वाचा घटक मानला जातो. पाम शुगर नारळाच्या पाण्यात घालून शरीरातील अतिरिक्त उष्णतेपासून त्वरित आराम मिळतो, असंही डॉ श्रीविध्या यांचं म्हणणं आहे.
हेही वाचा… Cancer Risk: उपवास केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर
डॉ श्रीविध्या यांच्या म्हणण्यानुसार, पाम शुगरमुळे हायपर अॅसिडिटी, श्वेतप्रदर (white discharge), लघवीचे संक्रमण (urinary infections) या गोष्टी मॅनेज करण्यास मदत करते. चला तर मग पाम शुगरबद्दल जाणून घेऊ.
पाम शुगर म्हणजे काय? (What is Palm Sugar)
पाम शुगर हा ताडाच्या कोणत्याही जातीपासून मिळणारा एक गोड पदार्थ आहे. ताड या झाडाच्या (Palm Tree) कोणत्याही जातीपासून पाम शुगर तयार केली जाऊ शकते. पालमायरा Borassus (palmyra palm), खजूर, अरेंगा पिनाटा Arenga pinnata, ता़डी (toddy), निपा Nypa आणि नारळाच्या झाडासह विविध प्रकारच्या ताडाच्या झाडांपासून साखर बनविता येते.
पाम शुगर हा प्रभावी उपाय आहे का? (Is it an effective remedy?)
डॉ. अमरीन शेख (प्रमुख आहारतज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल) यांच्या मते, पाम शुगरमध्ये थंडावा असतो आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
डॉ. अमरीन शेख यांच्या मतानुसार, “पाम शुगर हा ताडाच्या विविध प्रजातींच्या रसापासून बनविलेला एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे आणि त्यात लोह, मॅग्नेशियम व पोटॅशियम यांसारख्या पोषक घटकांचा समावेश आहे. ही खनिजे आपल्या घामावाटे निघालेल्या (electrolytes) इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करण्यास मदत करू शकतात आणि एकूण शरीर हायड्रेट राहील यासाठीही योगदान देऊ शकतात.”
विशेष म्हणजे पोटॅशियमची पुरेशा प्रमाणात असलेली पातळी उष्णतेशी संबंधित समस्या; जसे की निर्जलीकरण (Dehydration) आणि उष्माघाताचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. त्यावर क्लिनिकल आहारतज्ज्ञ गरिमा गोयल म्हणाल्या, “शरीरात द्रवपदार्थाचा समतोल राखण्यासाठी विशेषतः उष्ण हवामानात पुरेशा प्रमाणात पोटॅशियमचे सेवन करणे आवश्यक ठरते.”
उन्हाळ्यात पाम शुगरचे काही महत्त्वाचे फायदे: (Some potential benefits of palm sugar in summer)
हायड्रेशन : हायड्रेटेड राहण्यासाठी लिंबूपाणी, हर्बल टी किंवा नारळाच्या पाण्यासारख्या पेयांमध्ये पाम शुगर वापरली जाऊ शकते.
इलेक्ट्रोलाइट्स : पाम शुगरमधील खनिजे इलेक्ट्रोलाइट्स संतुलन राखण्यास मदत करू शकतात. त्यामुळे जेव्हा उष्ण हवामानात घाम येण्याचे प्रमाण जास्त असते तेव्हा ही खनिजे महत्त्वाचा घटक ठरतात.
ऊर्जा : पाम शुगर शरीरात ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते.
हायपर ॲसिडिटी मॅनेज करण्यात पाम शुगरची भूमिका पौष्टिक रचना आणि गुणधर्मांवर आधारित असलेल्या अनेक दृष्टीकोनातून विचारात घेतली जाऊ शकते जसे की:
अल्कधर्मी प्रभाव: पाम शुगरचा शरीरावर सौम्य अल्कधर्मी प्रभाव असतो, असे मानले जाते. हा गुण पोटातील अतिरिक्त अॅसिड शून्य करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. अल्कधर्मी प्रभाव असलेले अन्न पोटातील पीएच पातळी संतुलित करू शकते. त्यामुळे संभाव्यत: अॅसिड रिफ्लक्सची लक्षणे कमी होऊ शकतात.
अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म : खजुराच्या साखरेमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात; ज्यात दाहकविरोधी गुणधर्म असतात. “ॲसिड रिफ्लक्समुळे अन्ननलिकेत होणारी तीव्र जळजळ या अँटिऑक्सिडंट्सद्वारे कमी केली जाऊ शकते”, असं डॉ. गोयल म्हणाल्या.
तज्ज्ञांचे मत
पाम शुगरचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. कारण- जास्त साखर खाणे अयोग्य ठरते.. डॉ. अमरीन शेख म्हणाले, “पाम शुगर ताजेतवाने राहण्यासाठी उन्हाळ्याच्या आहाराचा एक भाग असू शकते. परंतु, सर्वोत्तम परिणामांसाठी इतर थंड पदार्थ आणि पुरेसे पाणी पिणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.”