पंकज त्रिपाठी यांची अभिनयाची शैली तर वेगळी आहेच, पण त्यांची चहा बनवण्याची पद्धतही वेगळी आहे. स्त्री २ अभिनेता, ज्याला त्याच्या मसाला चहाबरोबर पोहे खायला आवडतात. पॉडकास्टर प्राजक्ता कोळीला Netflix वरील शोदरम्यान त्यांनी सांगितले, “माझा चहा खास आहे… मी माझा मसाला चहा एका खास पद्धतीने बनवतो. मी त्यात तमालपत्र घालतो. तमालपत्र असलेला हा चहा खरोखर छान आहे. मला माझ्या चहाबरोबर पोहे आवडतात.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा –हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी विसाव्या वर्षापासून प्रत्येक महिलेने कराव्यात ‘या’ चार चाचण्या; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

पंकज त्रिपाठी यांची मसाला चहाची रेसिपी

तमालपत्र वगळून सर्व मसाले (वेलची, काळी वेलची, लवंग, बडीशेप, काळी मिरी आणि दालचिनी) एकत्र करा, मिक्सरमध्ये अथवा खलबत्त्यात बारीक वाटून घ्या.
पाणी उकळायला लागले की तमालपत्रासह वाटलेला चहाचा मसाला टाका
चवीनुसार साखर आणि दूध घाला.

हेही वाचा – वयाच्या पन्नाशीतही तजेलदार त्वचा असणाऱ्या ऐश्वर्या रायने सांगितले सौंदर्याचे रहस्य? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या…

तुम्ही तुमच्या चहामध्ये तमालपत्र घालावे का? चहामध्ये तमालपत्र टाकण्याचे फायदे

मसाला चहामध्ये तमालपत्र टाकणे सुरक्षित आहे आणि त्यामुळे पचन आणि प्रतिकारशक्तीला फायदा होऊ शकतो. “तमालपत्रामध्ये सिनोल आणि युजेनॉल यांसारखी आवश्यक तेले आणि संयुगे असतात, ज्यात अँटिऑक्सिडेंट, दाहकविरोधी आणि पाचक गुणधर्म असतात. चहामध्ये टाकल्यानंतर तमालपत्र ही संयुगे त्यात सोडतात, ज्यामुळे चहाची चव वाढते आणि आरोग्यदायी फायदेही मिळतात,” असे हैदराबादचे एलबी नगर, येथील ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटल, मुख्य आहार तज्ज्ञ डॉ. बिराली स्वेथा म्हणाले.

याबाबत जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुषमा पीएस यांनी सहमती दर्शवली आणि सांगितले की, “तमालपत्र पचन आणि गॅस कमी करण्यास मदत करते. उकळताना पाण्यात एक किंवा दोन तमालपत्र टाका. सर्व्ह करण्यापूर्वी त्यांना काढून टाका,” असे सुषमा म्हणाल्या.

तमालपत्र गॅस्ट्रिक एंजाइमला उत्तेजित करून पचनास समर्थन देते, जे जेवणानंतर सूज येणे किंवा अस्वस्थता टाळण्यास मदत करते. पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्सदेखील असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास मदत करतात आणि रोगप्रतिकारक कार्यास समर्थन देतात. याव्यतिरिक्त, तमालपत्र पारंपरिकपणे त्यांच्या सौम्य दाहक-विरोधी प्रभावांसाठी (mild anti-inflammatory effects) वापरले जाते. ज्यांना सांध्यांमध्ये सौम्य अस्वस्थता (mild joint discomfort) किंवा दाहकता (inflammation) जाणवते, त्यांना संभाव्यतः फायदा होतो,” असे डॉ. बिराली म्हणाले.

याव्यतिरिक्त, तमालपत्र हे जीवनसत्त्वे ए, बी ६ आणि सीचे चांगले स्त्रोत आहेत, जे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देतात. “तमालपत्राचा उपयोग हंगामी आजारांवर उपाय म्हणून केला जात आहे,” असे सुषमा यांनी सांगितले.

तमालपत्राचा वापर कमी प्रमाणात करण्याचा सल्ला दिला जातो, कारण जास्त प्रमाणात वापरल्यास त्याची तीव्र चव चहाच्या चवीवर सहजपणे मात करू शकते. “साधारणपणे एक किंवा दोन पाने चहाच्या चवीमध्ये फारसा बदल न करता सूक्ष्मपणे फायदे वाढवण्यासाठी पुरेशी असतात,” असे डॉ. बिराली यांनी सांगितले

तमालपत्र हे मसाला चहाची चव आणि आरोग्य या दोन्हींसाठी चांगला पर्याय आहे. विशेषत: जर तुम्हाला वेगळा सुगंध आणि चव आवडत असेल तर. सर्व मसाल्यांप्रमाणेच, चव आणि फायद्यांच्या सर्वोत्तम संतुलनासाठी संयम महत्त्वाचा आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaj tripathi add bay leaf or tej patta in special masala chai why should you add bay leaves to tea learn the benefits from experts snk