Health Benefits of Papaya in Marathi: आपल्या आहारात इतर पदार्थांबरोबरच फळांचाही समावेश करायला हवा, असं आहारतज्ज्ञ नेहमी सांगत असतात. फळं ही आपल्या शरीराला शक्ती देतात आणि पचायलाही सोपी असतात. पपई हे फळ सगळीकडे उपलब्ध आहे. पपई आवडत नाही असे फार कमी लोक असतील, कारण त्याची चवच तितकी मधुर असते. पपई स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी आणि सहज पचणारे फळ आहे. पपई भूक आणि शक्ती वाढविते. पपई खाण्याचे खूप फायदे आहेत.

पपई एक असे फळ आहे, जे सर्व हंगामात उपलब्ध होते आणि मुख्य म्हणजे जीवनसत्त्वांनी अगदी परिपूर्ण असते. पपईमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात, जे जळजळ कमी करण्यास, इतर अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात. कच्च्या पपईच्या फळाचा बाहेरचा रंग हिरवा असतो, तर पिकल्यानंतर केशरी रंगात बदलतो. आहारतज्ज्ञ नेहमी पपईला आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला का देतात, याचविषयी अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना माहिती दिली आहे.

harbhara farming
लोकशिवार: किफायतशीर हरभरा!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
do patti
अळणी रंजकता
coriander juice beneficial for weight loss
Coriander Juice : खरंच कोथिंबिरीचा रस प्यायल्याने वजन कमी होते? जाणून घ्या, हा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर?
Eggs and height: We find out if there is any link what do you do for increasing height
आहारात नियमित अंडी खाल्ल्याने उंची वाढते का? डॉक्टरांनी दिलेली माहिती एकदा वाचा
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
ambani family drinks milk of this cow breed everyday
अंबानी कुटुंबीय ‘या’ गायीच्या दुधाचं करतात सेवन, मुंबई नव्हे तर ‘या’ भागातून मागवलं जातं दूध, किंमत किती?
The election commission announced the schedule of campaign expenses
शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२०, पोहे, शिरा, उपमा १५, तर चहा ८ रुपये; निवडणूक आयोगाकडून प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर

डॉक्टर सांगतात, पपई हे फळ अनेक औषधी गुणधर्म आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी पोषक घटक आढळतात; ज्याचा आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदा होतो. पपईचे सेवन केल्याने शरीराचे वजन नियंत्रणात राहते आणि हृदय व्यवस्थित काम करते. पपई आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. पपई प्रत्येक ऋतूत खाऊ शकतो. पपई केवळ पचनशक्ती चांगली ठेवत नाही, तर हे फळ हृदयासाठीसुद्धा चांगलं मानलं जातं. अशा परिस्थितीत, तज्ज्ञदेखील आहारात पपई समाविष्ट करण्याचा सल्ला देतात, असे त्या सांगतात.

हृदय निरोगी

पपईच्या सेवनाने एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. अनेक पोषक तत्वांनी समृद्ध पपईमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. अशावेळी त्याचा वापर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते आणि आरोग्यही निरोगी राहते. हिवाळ्यात पपई खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. पपई खाल्ल्याने आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते.

(हे ही वाचा: कॅफिनयुक्त पेय तुमच्या शरीरासाठी किती सुरक्षित आहेत? जाणून घ्या डाॅक्टरांचे मत…)

कोलेस्ट्रॉल नियंत्रित 

पपईमध्ये फायबर, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्ससह अनेक जीवनसत्त्वे असतात. यामध्ये असलेले उच्च फायबर कोलेस्ट्रॉलदेखील नियंत्रित करते. खरंतर पपईच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते. कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यामुळे कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास मदत

वजन कमी करण्यास पपई हे उपयुक्त फळ आहे. पपईमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप कमी आहे. या कारणास्तव वजन कमी करण्याच्या आहारात याचा समावेश करण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. विशेष म्हणजे, पपई खाल्ल्याने बराच वेळ आपले पोट भरल्यासारखे वाटते आणि आपल्याला भूकदेखील लागत नाही.

डाॅक्टर सांगतात, आपण आपल्या आहारात पपईचा समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या शरीराला भरपूर फायदे मिळत असतात. पपई खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. म्हणून दररोजच्या आहारात पपईचा समावेश केला पाहिजे. पपई हा आरोग्यासाठी पोषक गुणधर्मांचा खजिना आहे. यामुळे पपई हे एक फळ असले तरी त्याचे शरीरासाठी फायदे अनेक आहेत.