डॉ. जाहनवी केदारे

‘किती आज्ञाधारक आहे गं मुलगा तुझा’? किंवा ‘फार हट्ट करतो हा, कधी ऐकायला लागणार हा आपले’? अशी अनेक विधाने मुलांच्या बाबतीत केली जातात. त्याच्या बरोबरीनेच ‘याच्या आईवडिलांनी काही शिस्त लावली नाही का’? किंवा ‘अगदी आदर्श अशी आई मुलीची जोडी आहे हो’! अशी टिप्पणीही ऐकायला मिळते.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
building unauthorized Check Dombivli, Kalyan Dombivli Municipal corporation,
पालिकेच्या संकेतस्थळावर इमारत अधिकृत की अनधिकृत याची खात्री करा, कल्याण डोंबिवली पालिकेचे आवाहन
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर

प्रत्येक आईला आणि वडिलांना असे वाटत असते की आपण उत्तम प्रकारे आपल्या मुलाला वाढवावे, आपण एक आदर्श पालक व्हावे. ‘मातृत्त्व म्हणजे काय?’ ‘उत्तम पालक कसे व्हावे?’ अशी माहिती गोळा करायला भावी पालक सुरुवात करतात. आपण पालक व्हायला उत्सुक असतो आणि एके दिवशी आपण आपल्या मुलाचे किंवा मुलीचे आई बाप होतो. लहानपणापासून आपल्यासमोर आपल्या आईवडिलांचे वागणे असते, त्यांच्या आपल्याशी वागण्याच्या पद्धतीचा आपल्याला अनुभव असतो. आपल्या आजूबाजूच्या म्हणजे आपल्या नातेवाईकांच्या, शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या आपल्या मुलांशी वागण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा आपल्यासमोर असतात.

हेही वाचा >>> Health Special : बसणं सोडा, ‘या’ गोष्टी करा आणि ठेवा स्वत:ला क्रियाशील

“आपल्या घरातले हे संस्कार आहेत बरं!” “आपल्याकडे असे वागलेले चालत नाही” पासून “आमचा मामा म्हणजे त्याच्या मुलांचा सख्खा मित्र सुद्धा होता! माझा दादा त्याला त्याच्या गर्लफ्रेंड विषयीदेखील बिनधास्त सांगू शकत असे!” असे आई वडील आणि मुले यांच्यामधल्या नात्याचे अनेक नमुने आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतात.

आपला स्वभाव, आपले आई वडील आपल्याशी कसे वागले, आपल्या कुटुंबातले, समाजातले काही प्रचलित नियम, अपेक्षा, मापदंड, आपले शिक्षक (ज्यांचा आपल्यावर कायम प्रभाव असायचा) आणि अर्थात पालक होताना केलेले वाचन, मिळवलेली माहिती या सगळ्या गोष्टींचा आपल्या पालकत्वाच्या पद्धतीवर परिणाम होतो, प्रभाव पडतो.

काही पालक शिस्तीचे भोक्ते असतात. ते आपल्या मुलांवर सतत बराच अधिकार गाजवतात (authoritarian). त्यांनी घालून दिलेल्या नियमांनुसारच वागावे लागते. जर घालून दिलेल्या शिस्तीचे पालन नाही केले तर ते आपल्या मुलांना शिक्षा करतात. मुलांनी मते मांडायला, चर्चा करायला वावच नसतो. “सांगितले तसे कर, उगाच स्वतःचे ज्ञान पाजळायची  गरज  नाही” अशी संवादाची पद्धत असते. “आईच्या शब्दाबाहेर नाही हा..” असे कौतुकाने म्हणताना कधी कधी असे लक्षात येत नाही की हा मुलगा आईच्या शब्दाबाहेर गेला तर त्याला परिणाम भोगावे लागतील, शिक्षा होईल. कदाचित यामुळेच त्याची निर्णय क्षमताही चांगली नाही. त्याचा आत्मविश्वास कमी आहे आणि तो स्वतःला फार कमी लेखतो. मनात कदाचित राग साठून राहिला आहे आणि तो व्यक्त करता येत नाही आहे. असा ‘आज्ञाधारक’ मुलगा किंवा मुलगी पुढे जाऊन अधिकारी व्यक्तीशी वागताना बंडखोर वृत्ती दाखवतो.

हेही वाचा >>> टॅटू काढायचा आहे पण भीती वाटते का? टॅटू काढणे खरंच सुरक्षित आहे का? टॅटूमुळे आरोग्याला काही धोका आहे का?

काही पालक आपल्या मुलांना शिस्त लावायचा किंवा नियम लादण्याचा विशेष प्रयत्न करत नाहीत. आपल्या मुलांचे प्रेमाने, मायेने पालनपोषण करणारे जरी  असले तरी अनेक विषयांत अनेक गोष्टी, विशेषतः निर्णय ते मुलांवरच सोडतात. मुलांच्याकडून ते काही विशेष अपेक्षाच ठेवत नाहीत. आपल्या मुलांचे ते मित्र होतात पण त्यांना शिस्त लावत नाहीत (permissive). अशा पालकांचे त्यांच्या मुलांच्या वागण्यावर पुरेसे नियंत्रण राहत नाही. यातून मुलांमध्ये चुकीच्या सवयी लागू शकतात. उदा. सतत बाहेरचे, तळलेले खाणे, त्यामुळे वजन वाढणे, स्थूलपणा येणे इ. किती वेळ टीव्ही बघावा, किती वेळ मोबाइल फोन वापरावा, किती वाजता झोपावे अशा अनेक गोष्टी ठरवण्याचे या मुलांना स्वातंत्र्य असते. या सगळ्याचा त्यांच्या वागण्यावर, स्वभावावर विपरीत परिणाम होतो. ही मुले हट्टी, उतावळी, काहीशी स्वार्थी, स्वतःच्या वागण्यावर नियंत्रण नसलेली अशी होतात.

या दोन्ही प्रकारांपेक्षा अधिक संतुलित असे जे पालक असतात ते आपला अधिकार आणि मैत्रीपूर्ण वागणे याचा योग्य समतोल साधतात. मुलांशी संवाद साधतात. निर्णय घेताना मुलांशी चर्चा करतात. आपले मत मांडायला त्यांना प्रोत्साहित करतात. योग्य प्रमाणात स्वातंत्र्य देतात, पण ते काही नियमांच्या परिघात. एक तास खेळायला गेलेली आपली मुलगी दोन-अडीच तासांनी आली, तर तिला जो वेळ गेला त्याचे काय परिणाम होतील, उदा. गृहपाठ पूर्ण होऊ शकणार नाही, झोपायला उशीर होईल अशी जाणीव करून दिल्यावर विषय तिथेच सोडून देत नाहीत. हे सगळे तिला सांगताना अंगावर ओरडण्याची त्यांना गरज वाटत नाही. ते समजावतात, पण उशीरा आल्याबद्दल टीव्ही वरचा आवडता कार्यक्रम त्या दिवशी पाहता येणार नाही असे सांगितल्यावर ऐकावे मात्र लागते! अतिशय प्रेमळ, नेहमी आपल्या पाठीशी आपले आईवडील असतील असा विश्वास संवादामधून निर्माण होतो. ही मुले पुढे जाऊन जबाबदार बनतात, त्यांच्यात आत्मविश्वास असतो, चांगली स्वभावना(self-esteem) असते. त्यांचे आपल्या भावनांवर चांगले नियंत्रण असते, समाजात व्यवरण्याची क्षमता निर्माण होते. आपल्या ध्येयापर्यंत जाणे या मुलांना शक्य होते.

याचे दुसरे टोक म्हणजे असे पालक जे आपल्या मुलांच्या संगोपनात काहीही रस घेत नाहीत. आपल्या मुलांना अन्न वस्त्र निवारा पुरवला की आपली जबाबदारी संपली असे मानणारे हे पालक. या मुलांना नातेसंबंध निर्माण करणे, ते टिकवणे कठीण जाते, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही. काही प्रमाणात ही मुले आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात पटाईत होतात आणि स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिकतात. पालक कशा  पध्दतीने आपल्या मुलांशी वागतात, आपल्या मुलांना कशा प्रकारे वाढवतात याचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम होतो. आपली मुले मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम, सुदृढ व्हावीत असे वाटत असेल तर आपण कशा प्रकारचे पालक झालं पाहिजे ते पुढील लेखात पाहू.

Story img Loader