लहान मुलांच्या हातात मोबाईल देताना अनेकदा या मोबाईलच्या सवयीचं पुढे काय होईल याचा विचार पालकांनी केलेला नसतो. सुरुवातीला ही पालकांची सोय असते. पण मुलांना एकदा सवय झाली आणि मुलं किशोरवयात आली की पालक अचानक जागे होतात आणि मुलांच्या हातातला फोन काढून घ्यायला बघतात. एव्हाना, फोन सतत जवळ असण्याची सवय मुलांना लागलेली असते. दहाबारा वर्षांची किंवा त्याहीपेक्षा लहान मुलं मोबाईल घेऊन काय करतात? तर गेम्स खेळतात आणि त्यावरच्या वयोगटातली मुलं गेम्सबरोबर व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक यावर वावरायला लागतात. मुलांच्या मोबाईल गेम्सची स्वतंत्र इंडस्ट्री आपल्याकडे उभी राहिली आहे. ते त्यांना माहीत असलेल्या साइट्स बघतात, गुगल करून नवीन साइट्स शोधतात. यूट्युबवर वेगवगळे व्हिडिओज् बघतात. पॉर्न साईट्सवर जातात. नेटवरचा मुलांचा संचार आपल्याला वाटतो त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त आणि वेगवान आहे. भारतीय माणसांचा सर्वसाधारण स्क्रीन टाइम सात ते आठ तासांचा आहे. आणि यात मुलंही आलीच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा