Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिंपिक २०२४ मधील स्पर्धक नादा हाफेजची सध्या जगभर चर्चा सुरू आहे. यामागचं कारण म्हणजे सात महिन्यांची गर्भवती असतानाही ती नुकतीच पॅरिस ऑलिंपिकमध्ये खेळली आहे. २६ वर्षीय अॅथलीट नादा हाफेज फेन्सिंग म्हणजे तलवारबाजी करते. पोटातल्या बाळासह तिनं ऑलिम्पिकमध्ये सुरुवातीच्या स्पर्धांमध्ये विजयी सलामीही दिली आणि अंतिम १६ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. मात्र, त्यानंतर तिला पराभवाचा सामना करावा लागला.

विशेष म्हणजे तिची मॅच झाल्यानंतर तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली, जी वाचल्यानंतर नादा गर्भवती असल्याचे सर्वांना समजलं आणि सर्वच अवाक् झाले. तिनं या पोस्टमध्ये लिहिलं की, सात महिन्यांची गरोदर ऑलिंपियन… तुम्हाला मंचावर खेळताना दोन खेळाडू दिसल्या असतील; पण तिथे प्रत्यक्षात आम्ही तिघं होतो. मी, माझी प्रतिस्पर्धी आणि माझ्या पोटात वाढणारं बाळ.

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
pregnant woman died at Korambitola health center due to lack of proper treatment
गोंदिया : गर्भवती महिला दगावल्याने आंदोलन, वैद्यकीय अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा…
Twin fetuses, placenta, bipolar cord occlusion, growth,
एकच नाळ असलले जुळे गर्भ… एकाची वाढ खंडित… अखेर डॉक्टरांनी घेतला बायपोलर कॉर्ड ऑक्लुजनचा निर्णय
Pregnant Women Delivery, Hinjewadi Women Traffic Police, Women Traffic Police Help, Pregnant Women Delivery news pune,
पुणे : महिला पोलिसांमुळे महिलेची सुखरूप प्रसूती; अचानक पोट दुखायला लागलं अन… नेमकं काय घडलं?
World Championship Chess Tournament Ding and Dommaraju Gukesh draw sports news
पाचव्या डावातही बरोबरी; गुकेशच्या चुकीचा फायदा करून घेण्यात डिंग अपयशी

”माझ्या आणि माझ्या बाळासमोर अनेक आव्हानं होती. ती आव्हानं शारीरिक आणि भावनिक, अशा दोन्ही प्रकारची होती. गरोदपण हे एरवीही तारेवरची कसरत असतं. परंतु, जीवन आणि खेळ यांचा समतोल राखण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हे कितीही कठीण असलं तरी ते समाधानकारकही होतं. अंतिम १६ जणांमध्ये स्थान मिळवता आलं याचा मला अभिमान वाटतो हे सांगण्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे”, असंही नादानं म्हटलं आहे. (paris olympics 2024)

Read More News On Health : Alkaline Diet मुळे खरंच संधिवाताच्या वेदनांपासून आराम मिळतो? वाचा आरोग्य तज्ज्ञांचे मत

“मी नशीबवान आहे की, या प्रवासात नवरा इब्राहिम इलहाबनं माझ्यावर विश्वास ठेवला आणि कुटुंबानंही साथ दिली. मी तिसऱ्यांदा ऑलिंपिक खेळत आहे. यात यंदा एका छोट्या ऑलिंपियनची साथ मिळाली आहे.”

गर्भधारणेदरम्यान असे धाडसी खेळ खेळणं कितपत सुरक्षित आहे? (egyptian fencer nada hafez competes 7 months pregnant paris olympic 2024)

दरम्यान, तलवारबाज नादा हाफेजच्या या धाडसाचं एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र गर्भधारणेदरम्यान असे धाडसी खेळ खेळणं कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच विषयावर दी इंडियन एक्स्प्रेसनं काही तज्ज्ञ डॉक्टरांची मतं जाणून घेतली. ती आपण पाहू…

या विषयावर दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील (आर), प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या सल्लागार डॉ. प्रियंका सुहाग म्हणाल्या की, गरोदरपणात तलवारबाजीसारखे लढाऊ खेळ खेळल्यानं आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उदभवू शकतात. त्यात मुख्यत: पोटदुखीचा त्रास अधिक प्रमाणात जाणवण्याची शक्यता असते; ज्यामुळे प्लेसेंटल अॅबडॉमिनल, अकाली प्रसूती किंवा गर्भाला इजा होण्याचा धोका अधिक असतो.

जलद हालचालींमुळे पडणे किंवा चक्कर येण्यासारख्या समस्या जाणवू शकतात. अशा वेळी काही महत्त्वाच्या सुरक्षेची खबरदारी घेतली पाहिजे.

अशा वेळी आरोग्य आणि गर्भधारणा यांच्या स्थितीबाबतची काळजी घेण्यासाठी प्रसूतीतज्ज्ञांचा नियमितपणे सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. जोखीम कमी करण्यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जसे की, कठोर परिश्रम आणि शारीरिक हालचाली टाळणे गरजेचे आहे, असे सांगून, डॉ. सुहाग म्हणाल्या की, आई आणि गर्भ अशा दोघांचेही आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घ्या आणि पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

डॉ. सुहाग यांच्या म्हणण्यानुसार, पोटाचे रक्षण करण्यासाठी संरक्षणाात्मक कपडे परिधान केले पाहिजेत. वेदना, चक्कर येणे किंवा आकुंचन होण्याच्या कोणत्याही लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवणेही महत्त्वाचे आहे.

गर्भधारणेदरम्यान काही शारीरिक क्रियाकलाप उपयुक्त ठरू शकतात; परंतु लढाऊ खेळांशी संबंधित धोके फायद्यांपेक्षा जास्त असतात. आई आणि मुलाच्या सुरक्षिततेसाठी, सुरक्षित पर्यायांचा विचार करणे उचित आहे, असेही डॉ. सुहाग यांनी स्पष्ट केले.

Story img Loader