Weight Loss : निरोगी आयुष्य जगण्यासाठी पौष्टिक आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चांगल्या आरोग्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये, याचा आपण बऱ्याचदा विचार करतो. दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे वजनवाढीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात अनेक जण वजन कमी करण्यासाठी कर्बोदकयुक्त पदार्थ खाणे टाळतात. जरी कर्बोदकांमुळे वजन वाढत असले तरी संतुलित आहार घेणे आरोग्यासाठी चांगले असते, हे विसरू नये. तुमचा आवडता पदार्थ खातानासुद्धा त्यातील पौष्टिक घटक जाणून घेणे गरजेचे आहे.

तुम्ही वजन कमी करण्यासाठी पावभाजी खाणे टाळता का? पण तुम्ही पावभाजीमध्ये पौष्टिक घटकांचा समावेश केला, तर वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. न्युट्रिशन कोच ऋची शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर याविषयी सांगितले आहे.

Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
yoga poses to relieve gas
Health Special: पोटातील गॅसवर योगासनांचा जालीम उपाय; नेमके काय कराल? – भाग २
What is the Leidenfrost effect
Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल
Aloo Bhujia Recipe
आलू भुजिया बनवण्याची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर
Diwali faral recipe garlic sev lasun shev recipe in marathi lasun shev easy recipe
२ कप बेसन वापरून सोप्प्या पद्धतीने बनवा कुरकुरीत लसूणी शेव; फराळाची मजा वाढवेल ‘लसूण शेव’

अनेक लोकांना पावभाजी खूप आवडते. हे एक लोकप्रिय ‘स्ट्रीट फूड’ आहे; ज्यामध्ये भरपूर भाज्या आणि लोणी असते. ऋची शर्मा सांगतात, “जेव्हा तुम्ही पौष्टिक अन्न खाण्याचा विचार करता तेव्हा आहारात जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. आपल्या देशात कर्बोदकांचे सेवन खूप जास्त प्रमाणात केले जाते. जर तुम्ही कर्बोदके खाणे सोडले, तर तुम्ही पोळी, भात, भाकरी, इडली, डोसा हे काहीही खाऊ शकणार नाही.”

चांगल्या आरोग्यासाठी आहारात पोषक घटक असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे चांगले पौष्टिक जेवण करण्याचा प्रयत्न करा; ज्यामुळे तुम्ही संतुलित आहार घेऊ शकाल. तुम्ही पावभाजीमध्ये सॅलड आणि मोड आलेले मूगसुद्धा खाऊ शकता.

हेही वाचा : पोटभर जेवल्यानंतर अनेकदा भूक लागते का? अशा वेळी काय करावे? डॉक्टरांनी सांगितले उपाय

तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी आहारात पावभाजीचा समावेश करणे अवघड असू शकते; पण अशक्य नाही. उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉ. एकता सिंघवाल सांगतात, “पावभाजी हे लोकप्रिय ‘स्ट्रीट फूड’ आहे. त्यामध्ये सर्व बारीक केलेल्या भाज्या मसाले टाकून शिजवल्या जातात आणि पावाबरोबर खातात. पाव आणि लोणीमध्ये कॅलरी आणि कर्बोदके जास्त असतात. त्यामुळे वजन वाढण्याची भीती असते; पण तुम्ही या पावभाजीच्या रेसिपीमध्ये बदल केला, तर वजन कमी करण्यासाठी पावभाजी फायदेशीर ठरू शकते.”

फरीदाबाद येथील मेट्रो हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉ. राशी तांटिया सांगतात, “पौष्टिक पावभाजी तुम्ही घरी बनवू शकता. त्यात भरपूर हिरव्या भाज्यांचा समावेश करावा; ज्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पौष्टिक घटक आहेत. मटार, गाजर, फ्लॉवर यांसारख्या हिरव्या भाज्या आणि कांदे, ढोबळी मिरची, टोमॅटो व बीटरूट्सचा समावेश करावा. गव्हाच्या पिठापासून तयार केलेले पाव वापरावेत. हे पाव कमी लोण्याचा वापर करून भाजावेत किंवा लोण्याऐवजी ऑलिव्ह तेलाचा वापर करावा.”

आहारतज्ज्ञ डॉ. एकता सिंघवाल यांनी पौष्टिक पावभाजी तयार करण्यासाठी सांगितलेल्या टिप्स खालीलप्रमाणे :


पावभाजीसाठी नेहमी गव्हाचा पाव निवडावा. गव्हामध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि पोषक घटक असतात; ज्यामुळे तुम्हाला एकदा खाल्ले की वारंवार भूक लागत नाही आणि हे गव्हाचे पाव पचायला सोपे असतात.

पावभाजी करताना लोणीचा वापर कमी करा. लोणीमुळे चव येते; पण त्याचबरोबर कॅलरी आणि फॅट्स वाढण्याची शक्यता असते. त्याऐवजी ऑलिव्ह ऑइल किंवा तूप हे चांगले पर्याय निवडा.

पावभाजी तयार करताना टोमॅटो, फ्लॉवर, मटार, गाजर इत्यादी भाज्यांचा जास्तीत जास्त वापर करा. कारण- भाज्यांमध्ये कॅलरी कमी आणि पोषक घटक जास्त असतात. त्यामुळे वजन कमी करणे सोपे जाते.

आपण किती प्रमाणात खातो हे सद्धा वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे. पावभाजी खाताना योग्य प्रमाणात खा. पावभाजीबरोबर सॅलड खा; ज्यामुळे तुम्हाला पौष्टिक आहार घेता येईल.

जर तुम्ही पावभाजीमध्ये दही, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करीत असाल, तर कमी फॅट असलेले दुग्धजन्य पदार्थ निवडा.

पावभाजी मसाला तयार करताना त्यात साखरेचे प्रमाण लक्षात घ्या. अतिप्रमाणात साखर खाल्ल्यामुळे वजन वाढू शकते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करीत असाल, तर आहारात साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा.