Pear in Pregnancy: नाशपती हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. या फळामध्ये खनिजे, जीवनसत्व आणि सेंद्रिय घटक असतात. हे फळ प्राचीन काळापासून एक औषध म्हणून वापरले जात आहे. निरोगी राहण्यासाठी नाशपतीचाही आहारात समावेश केला जाऊ शकतो. नाशपती हे गोड लगदा असलेले फळ आहे. पौष्टिकतेने समृद्ध नाशपती फळ आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या दूर ठेवण्यास मदत करू शकतात. पण, गर्भवती महिलेने नाशपती हे गोड फळ खाणं योग्य की अयोग्य? याच विषयावर नवी दिल्ली येथील मदर्स लॅप आयव्हीएफ केंद्रातील वैद्यकीय संचालक, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शोभा गुप्ता यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

गरोदरपणाचा काळ हा कोणत्याही स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात स्त्रीने चांगला आहार घेणे अत्यंत गरजेचे असते. कारण हा आहाराच स्त्रीला सुदृढ आणि निरोगी ठेवतो. या आहारात फळांचा समावेश आवर्जून करण्याचा सल्ला अनेक जण देतात. कारण फळांमध्ये अशी पौष्टिक तत्त्वे असतात, जी गरोदर स्त्रीच्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात. फळं आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. पण, फळांमधील नाशपती हे फळ गर्भवती महिलेसाठी चांगलं आहे का, असे अनेक प्रश्न गर्भवती महिलांना पडत असतील.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण

डॉक्टर सांगतात, “निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात फळांचा समावेश असणं आवश्यक असतं. तसे तर प्रत्येक जण प्रत्येक प्रकारचे फळ खाऊ शकतो. मात्र, काही आजारांमध्ये लोकांना फळं डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि कमी प्रमाणात खावी लागतात. गर्भवती महिलेनेही या काळात आपल्या आहारात कोणत्याही गोष्टींचा समावेश करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. खरंतर, नाशपती हे निश्चितच चांगले फळ आहे. यामध्ये सफरचंदापेक्षा जास्त पाणी असते. हे गोड, उच्च फायबर असलेले फळ आहे. यामध्ये अनेक पोषक तत्वही असतात.”

(हे ही वाचा : रेड वाईन प्यायल्याने खरंच हृदयविकाराचा धोका कमी होतो? आरोग्याला फायदे होतात? डाॅक्टर काय सांगतात पाहा…)

“नाशपतीत असलेले कमी प्रमाणातील कॅलरीज वजन कमी करण्यास मदत करतात, तर नाशपातीने फायबरचे प्रमाण शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करून हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. नाशपातीमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. अशा परिस्थितीत ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते, त्यांना हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी नाशपती फायदेशीर ठरु शकते. तसेच नाशपाती हे फ्लेव्होनॉइड्सचे समृद्ध स्त्रोत आहेत, जे शरीरासाठी अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के शरीरातील जळजळ दूर करण्यास मदत करतात.”

“नाशपती खाण्याचे अनेक फायदे शरीराला मिळतात. गर्भवती महिलांसाठी नाशपाती एक निरोगी आणि पौष्टिक पर्याय असू शकतो. नाशपाती आवश्यक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. नाशपती खाल्ल्याने मधुमेह, बद्धकोष्ठतेचा धोका कमी होतो. त्यात पोटॅशियमदेखील असते, जे गरोदरपणात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते”, असे त्यांनी स्पष्टच सांगितले. त्यामुळे नाशपती हे फळ गर्भवती महिलेसाठी चांगलं आहे, हे यावरून समजून येते.

प्रत्येक गर्भवती महिलेने गरोदरपणात पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. गरोदर महिलेच्या आरोग्यासोबतच बाळालादेखील पुरेसं पोषण मिळण्यासाठी अगदी गरोदरपणातील सुरुवातीच्या काळापासूनच हेल्दी डाएट असणं गरजेचं आहे, असे त्या नमूद करतात.