वर्षभर उपलब्ध न होणाऱ्या काही भाज्या हिवाळ्यात सर्वत्र उपलब्ध होतात, त्यातीलच एक भाजी म्हणजे वाटाणा. वाटाणा बहुतांश सर्वांना आवडतो. कमी अधिक प्रमाणात वाटाणा वर्षभर उपलब्ध असतो, पण हिवाळ्यात मात्र मोठ्या प्रमाणात बाजारात वाटाण्याची हजेरी असते. त्यामुळे हिवाळ्यात प्रामुख्याने वाटाणा असणारे पदार्थ बनवले जातात. पण बऱ्याच जणांना ही भाजी खाणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरते हे माहित नसते. या भाजीमध्ये कोणती पोषकतत्त्व आढळतात आणि त्यामुळे आरोग्याला कसा फायदा होतो जाणून घ्या.
वाटाण्यांमुळे शरीराला मिळतात हे फायदे
शरीरासाठी चांगला असणारा कोलेस्ट्रॉल वाढतो
वाटाण्यांमध्ये नियासिन आढळते ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन शरीरासाठी चांगला असणारा कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
वाटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते, यामुळे पोट खूप वेळासाठी भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. यामुळे वाटाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
संधिवातासाठी फायदेशीर
वाटाण्यांना सेलेनियम नावाचे पोषकतत्त्व आढळते. तज्ञांच्या मतानुसार संधिवातापासून सुटका मिळवण्यासाठी हे पोषकतत्व फायदेशीर ठरते. त्यामुळे संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी जेवणात वाटाण्यांचा समावेश करावा.
दृष्टीसाठी फायदेशीर
वाटण्यांमध्ये जेक्सेथिन आणि ल्युटिन ही पोषकतत्त्व आढळतात. ही पोषकतत्त्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी, दृष्टीसाठी फायदेशीर मानले जातात.
त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर
वाटाणे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. कारण यामध्ये आढळणारे विटामिन सी, विटामिन बी आणि फॉलेट हे त्वचा निरोगी ठेवण्यात मदत करतात. तसेच वाटण्यांमध्ये आढळणारे फ्लेवोनॉइड, कैरोटेनॉइड आणि अल्फा कैरोटीन अँटी एजिंगचे काम करतात.