Perfect Sandwich Tip By Chef : लहान मुले असो वा मोठी माणसं सँडविच खायला सर्वांनाच आवडतात. पण, शेफ वेल्टन साल्दान्हा यांनी नवीन टिपद्वारे (Perfect Sandwich Tip) सँडविच बनविण्याच्या कलेला अनपेक्षित वळण दिले आहे. त्यांचे हे अनपेक्षित वळण म्हणजे ‘थ्री फिंगर रूल’ (three-finger rule) होय. सँडविच व्यावहारिक आणि स्वादिष्ट असणे गरजेच आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत शेफ साल्दान्हा सांगतात की, सँडविचची उंची तीन बोटांच्या रुंदीपेक्षा जास्त नसावी. त्यामुळे तुम्ही ते खाताना तोंड उघडण्यासाठी जास्त प्रयत्न करण्याची गरज पडत नाही आणि सँडविच हातातून पडतही नाही.

त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने, सल्लागार, आहारतज्ज्ञ व प्रमाणित मधुमेह शिक्षक, कनिक्का मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, सँडविचच्या उंचीसाठी तीन बोटांचा नियम (Perfect Sandwich Tip) ही एक वेधक संकल्पना असली तरी त्याला समर्थन देण्यासाठी कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. पण, आम्ही या विधानाचे व्यापक अर्गोनॉमिक आणि पौष्टिक दृष्टिकोनातून परीक्षण करू शकतो.

cockroaches how to get rid of cockroaches by using home remedy rice helps to remove cockroaches jugaad
झुरळांचा त्रास आता कायमचा होईल गायब! ‘रात्रीचा भात’ वापरून होईल कमाल, पाहा जुगाडू उपाय
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
bank mitra warn of agitation over low remuneration lack of protection of service
‘बँक मित्रां’चा आंदोलनाचा इशारा; तुटपुंजे मानधन, सेवाशर्तींचे संरक्षण नसल्याने त्रस्त
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Lays Paneer Bites Recipe in marathi easy paneer recipe
१० रुपयांच्या चिप्सपासून बनवा पनीरचा ‘हा’ खास पदार्थ, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल बेस्ट! लगेच वाचा रेसिपी
mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी

अर्गोनॉमिक पैलू (ergonomic aspect) :

जबड्याला आराम (Jaw Comfort) : सँडविच तयार करताना तोंडाचे आरामदायित्व लक्षात घ्या. सँडविच योग्य प्रमाणात तोंडात जाईल आणि ते आरामशीरपणे खाता आले, तर तोंडाचा ताण कमी होतो.

घास घेण्याचा आकार : सँडविच लहान बनवले, तर ते तोंडात पूर्णपणे जाते आणि योग्यरीत्या चघळण्यास आणि पचनास प्रोत्साहन देते (Perfect Sandwich Tip).

पौष्टिक पैलू ( nutritional aspect ) :

सँडविचच्या उंचीचा त्याच्या पौष्टिक मूल्यावर थेट परिणाम होत नसला तरी त्याचा अन्नसेवनावर अप्रत्यक्षरीत्या परिणाम होऊ शकतो.

पोर्शन कंट्रोल : खूप उंच असलेल्या सँडविचचे मोठे घास घ्यावे लागतात आणि त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढवते.

पोषक घटकांचा समतोल : तीन बोटांचा नियम प्रत्येक पोषक घटकाचा समतोल राखण्याची खात्री करून घेऊ शकतो आणि शरीराला कर्बोदके, प्रथिने व चरबी यांचे चांगले मिश्रण सुनिश्चित करून, शरीराला योग्य पोषण मिळू शकते.

हेही वाचा…Breakfast That Spikes Blood Sugar: बटाट्याचे पराठे, एक वाटी पोहे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का? वाचा तज्ज्ञांचे मत आणि उपाय

तीन बोटांचा नियम प्रॅक्टिकल आहे का (Perfect Sandwich Tip) :

कनिक्का मल्होत्रा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, स्वयंपाकाच्या दृष्टिकोनातून, तीन बोटांचा नियम सँडविचसाठी एक प्रॅक्टिकल दृष्टिकोन प्रदान करतो. सँडविचची उंची मर्यादित केल्याने त्याची संरचनात्मक अखंडता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. खूप जास्त थर किंवा फिलिंग्स सँडविचला उभे ठेवण्यास कठीण बनवू शकतात आणि त्यामुळे ते तुटण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे सँडविचची उंची नियंत्रित करून, तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या चवींचा समतोल साधू शकता.

सँडविच बनविण्याचे इतर मार्ग (Perfect Sandwich Tip)

थ्री फिंगर रूल म्हणजेच तीन बोटांचा नियम (three-finger rule) हा सँडविच बनवण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. तुमचे सँडविच ताजे, चवदार ठेवण्याचे आणखीन काही मार्ग मल्होत्रा यांनी सांगितले आहेत ते पाहूया…

१. ब्रेडची निवड :

एक हेल्दी, होल ग्रेन ब्रेड सँडविचसाठी उत्तम आहे. होल ग्रेन ब्रेडमध्ये फायबर असते, जे पचनास मदत करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.

ब्रेड टोस्ट केल्याने कुरकुरीतपणा येऊ शकतो आणि सँडविच ओले होणे टाळता येईल.

२. लेअर :

ब्रेडच्या तुकड्यांवर हम्मसचा पातळ थर लावा. हम्मस हा चणे, तिळाचे तेल, लिंबाचा रस आणि मिरी यांचा वापर करून बनवलेला एक चविष्ट पदार्थ आहे. त्यामुळे ब्रेडवर ओलसरपणा जाणवणार नाही.

तळापासून लेअर बनवायला सुरुवात करा : ग्रील्ड चिकन, टर्की किंवा टोफू असे तयार केलेले पदार्थांचे लेअर करा. आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व फायबरसाठी विविध रंगीबेरंगी भाज्यासुद्धा त्यात घाला.

ओलावा नियंत्रित करा : सँडविचमध्ये ओलेपणा टाळण्यासाठी टोमॅटो आणि काकडीला शेवटच्या लेअरला ठेवा.

हेल्दी फॅट्स : हृदयाच्या आरोग्यदायी चरबीसाठी ॲव्होकॅडो, नट्स किंवा बिया निवडा.

३. कटिंग आणि सर्व्हिंग :

डायगोनल कट : हे सँडविचच्या आतील पदार्थ बाहेर पडण्यापासून रोखू शकतात. सँडविचला लहान भागांमध्ये कापून, कॅलरीजचे सेवन व्यवस्थापित करण्यात साह्यभूत करू शकता.

अर्ध्या भागात कट करा : मोठं सँडविच बनवलं असेल, तर त्याला मधोमध कापून घ्या.

साइड सॅलड : साइड सॅलड तुमच्या जेवणात चिप्स आणि फ्राईजऐवजी अतिरिक्त पोषक आणि फायबर देऊ शकतात.

Story img Loader