Best Time To Eat Dinner: रात्रीच्या जेवणासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी, आपण करत असलेल्या काही चुका समजून घेणे आणि त्यावर पर्यायी उत्तर शोधणे हे आवश्यक आहे. पोषणतज्ज्ञ लीमा महाजन यांनी अलीकडेच आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका रीलमध्ये रात्रीच्या जेवनाबाबत सामान्यतः होणाऱ्या चुकांविषयी माहिती दिली आहे. अनेकजण रात्री पोटभर जेवूनही काहींना स्नॅकिंगची सवय असते म्हणजे सतत काही ना काही खात राहायचं तर काही जण अगदी याउलट रात्री फक्त स्नॅकिंग करतात म्हणजे नीट न जेवता कोरडा खाऊ खाऊन पोट भरतात. या दोन्ही गोष्टी घातक आहेत. शिवाय जेवणानंतर लगेचच अंथरुणावर पडणे ही तर अत्यंत मोठी चूक ठरते. या चुका व त्यावरील उपाय हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोषणतज्ज्ञ महाजन यांनी सांगितले की, वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात काहीजण कर्बोदके टाळतात. पण जर तुम्हाला कॅलरीजचे सेवन कमी करायचे असेल तर तुम्ही कधी सेवन करताय इतकंच महत्त्व तुम्ही किती प्रमाणात सेवन करताय याला आहे. तुम्ही रात्री, दुपारी किंवा दिवसभरातील सगळ्या जेवणांमधून थोड्या थोड्या प्रमाणात कार्ब्स वगळून सुद्धा आहाराचं नियोजन करू शकता ज्यामुळे सतत वाढत्या कॅलरीज किंवा फॅट्सची चिंता करावी लागणार नाही.

डॉक्टरांनी काय सांगितले?

आहारतज्ज्ञ राशी तांतिया, मेट्रो हॉस्पिटल, फरिदाबादच्या मुख्य पोषणतज्ज्ञ यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “रात्रीचे जेवण करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे झोपायच्या दोन ते तीन तास आधी. गॅस होणे, करपट ढेकर, ऍसिडिटी असे त्रास तसेच गॅस्ट्रिक रिफ्लक्स म्हणजे अशी स्थिती जेथे पोटातील ऍसिड अन्ननलिकेत परत जाते, ज्यामुळे अस्वस्थता आणि समस्या निर्माण होतात ते टाळण्यासाठी जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळेत २ ते ३ तासाचा अवधी आवश्य असावा असे.

जेवणाची व झोपण्याची वेळ किती असावी?

अनेक देशांमध्ये , लोक रात्री १०-११ च्या दरम्यान झोपतात. हे लक्षात घेता, रात्रीच्या जेवणाची वेळ ६ ते ८ च्या आसपास असावी अशी शिफारस केली जाते. “ही वेळ शरीराच्या नैसर्गिक लयांशी जुळवून घेते आणि झोपायच्या आधी पचनासाठी पुरेसा वेळ देते. पचनाची प्रक्रिया समजून घेतल्याने ही वेळ महत्त्वाची का आहे हे लक्षात येते. आपल्या पचनसंस्थेमध्ये अन्नाचा एक मोठा प्रवास होतो, ज्या क्षणापासून ते आपल्या तोंडात अन्न प्रवेश करते तेव्हापासून ते पोटात पोहोचेपर्यंत आणि अखेरीस लहान आतड्यात शोषले जाण्यापर्यंत अनेक पायऱ्या हे अन्न ओलांडत असते. डॉ राशी यांच्या मते, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अंदाजे दीड ते दोन तास लागतात.

हे ही वाचा << पोटातील गॅसने विमानात झाला गोंधळ! सहप्रवासी भडकताच ‘तो’ उर्मटपणाने म्हणतो, “आता अजून सुगंधित..”, नेमकं घडलं काय?

झोपेच्या दोन ते तीन तास आधी जेवण घेतल्याने पचनसंस्थेला काम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक वेळ मिळतो. जेव्हा जेवल्यावर आपण पटकन झोपता तेव्हा शरीराला पचन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, ज्यामुळे अपचन, अस्वस्थता किंवा झोपेमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता असते. शिवाय, अपूर्ण पचनामुळे आपण खात असलेल्या अन्नातून पोषक तत्वांचे योग्य शोषण होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Perfect time to eat dinner if you sleep by 10 or 11 pm dietician explains weight loss digestion funda for body should you skip dinner svs