Beetroot For Weight Loss: आपल्यापैकी अनेकजण स्नायूंच्या मजबुतीपेक्षा वजन कमी कारण्यासच अधिक महत्त्व देतात. पण लक्षात घ्या मजबूत स्नायू केवळ तुमच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठीच आवश्यक नसतात, तर ते तुम्हाला कॅलरी बर्न करण्यातही मदत करतात. बीटरूटचा रस तुमच्या स्नायूंची ताकद वाढविण्यात आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास चालना देण्यास मदत करू शकतो. आहारातील नायट्रेटवरील संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार, बीटरूटचे सेवन व्यायामापूर्वी केल्यास व्यायामाची क्षमता व स्टॅमिना वाढू शकतो. आहारात विशेषत: बीटरूट ज्यूसचा वापर केल्यास स्टॅमिनामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याची नोंद असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.
यूकेमधील एक्सेटर विद्यापीठ, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड स्टेट्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या संशोधकांना असे आढळून आले की ज्या सहभागींनी नायट्रेटचे सेवन केले होते त्यांच्या तुलनेत स्नायूंची ताकद सात टक्क्यांनी वाढली. यामुळे हृदयविकाराने त्रस्त असलेल्यांसाठी नक्कीच वरदान आहे. बीटरूटचे इतर अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ…
१) नायट्रेट रक्तदाब पातळी कमी करण्यास मदत करते. २०१५ मधील एका अभ्यासात दररोज २५० मिलीलीटर बीटरूटचा रस पिण्याचे परिणाम तपासले आणि असे आढळले की सहभागींनी सेवन केल्यानंतर रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी झाला होता.
२) बीटमध्ये अल्फा-लिपोइक ऍसिड नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे ग्लुकोजची पातळी कमी करण्यास आणि इंसुलिनची संवेदनशीलता वाढविण्यास मदत करते.
३) फायबरमुळे सतत भूक लागणे कमी होते तर रक्तप्रवाहात ग्लुकोज सोडण्यास विलंब होऊ शकतो.
४) बीट हे मॅंगनीजचा एक चांगला स्रोत देखील आहे, जो इंसुलिनची निर्मिती करून आपल्या रक्तातील साखर काढून टाकण्यास मदत करतो.
५) यात जीवनसत्त्वे ए आणि के, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोहासह खनिजे असतात, जे निरोगी त्वचा आणि हाडे विकसित करण्यास मदत करतात.
हे ही वाचा<< अदनान सामीने २३० वरून ७५ किलोवर वजन कसं आणलं? १२० किलो कमी करताना जेवणात वापरले ‘हे’ ४ सिक्रेट
दरम्यान, अति नायट्रेट सेवनाचे संभाव्य धोके सुद्धा आहेत. त्यामुळे आहारात बीटरूटचे प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. पर्याय म्हणूनच याशिवाय पालक, मुळा, टोमॅटोचा रस, गाजराचा रस आणि इतर हिरव्या पालेभाज्याही नायट्रेट-समृद्ध पर्याय आहेत.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)