पल्लवी सावंत-पटवर्धन, आहारतज्ज्ञ

दिशा- वय वर्ष १५
“ मला भूकच लागत नाही आणि आई उगाचच खायला फोर्स करते. मी तशी बारीक आहे पण आय थिंक आय एम फिट . “पिरियड्स असले की मला खूप गळायला होतं आणि फक्त झोपून राहावंसं वाटतं”.

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
menstrual leave mva provision
मासिक पाळीच्या रजेचा विषय पुन्हा चर्चेत; भारतात काय आहेत नियम? कोणकोणत्या राज्यांत रजेची तरतूद?
Mom delivers baby by herself while riding in the car to the hospital Shocking video
चमत्कारावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारमध्ये महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या अन् पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
sanjay bangar son gender transformation
आर्यन झाला अनाया: क्रिकेटर संजय बांगर यांच्या मुलाने केलेली ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’ची प्रक्रिया कशी होते? त्याचे दुष्परिणाम काय?
MVA demand menstrual leave
Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान दोन दिवसांची सुट्टी देण्याचे मविआचे आश्वासन; संसद ते स्मृती इराणींपर्यंत या विषयाशी निगडित कोणते वाद झाले?

प्रांजल- वय वर्ष २५
मी रोज वर्कआउट करतेय. डाएट कदाचित थोडं बिघडलंय कारण मला इतकं थकल्यासारखं वाटत राहतं. सगळं नीट करून सुद्धा फील व्हेरी लो .
म्हणजे २ वाजताच झोपून जावंसं वाटतं आणि पिरियड पेन म्हणजे डिफरंट गेम . मी फक्त आईस्क्रीम आणि आणि केक्स खाऊन राहू शकते. अगदीच जास्त दुखलं तर एक पेन किलर घेते.

श्वेता- वय वर्ष ३५
आता जाणवतं गं . पाठ दुखते कंबर दुखते आणि रनिंग पण कमी झालंय अलीकडे. सारखं दुखत राहतं आणि अलीकडे पिरियड्स असले की अगदी पहिले २ दिवस माझं सगळं सुरळीत सुरु असतं पण तिसरा दिवस म्हणजे ब्रह्मांड आठवतं. तरी तू सांगितलंय म्हणून सध्या साखर वगैरे बंद आहे. आणि डाएट मॅनेज होतंय तरी मी पुश करते थोडं . ऑफिस मध्ये खूप बसणं होतं. उगाचच वय झाल्याचं फीलिंग येतं.

शालिनी -वय वर्ष ४५
“ माझं हे असं आहे . आता काही हॉर्मोनल पण नाही शरीरात तरी का भूक लागते? बाकी केस वगैरे गळतायत ते पाहायलाच नको. आताशा पायाच दुखणं पण वाढलंय.” अधेमधे कॅल्शिअम घेते मी पण नियमित काहीच होत नाही. मला निरोगी राहण्यासाठी डाएट करायचं आहे. रजोनिवृत्ती सुरु होऊन २ वर्ष झालीयेत.

आणखी वाचा: Health Special: ‘हा’ आहे हॅपी डाएटिंगचा फंडा

मासिक पाळी आणि त्या अनुषंगाने स्त्रियांच्या शरीरात घडणारे बदल विलक्षण आहेत. किशोरवयीन मुलींच्या वाढीनुसार ऊर्जा देणारे पदार्थ खाणे , आहारात तेलबियांचे प्रमाण वाढविणे. त्यानिमित्ताने कॅल्शिअम , मॅग्नेशिअम , स्निग्ध पदार्थ यांचे योग्य प्रमाण राखणे आवश्यक असते . याच वयात अनेक वेगेवेगळ्या पदार्थांची तोंडओळख होते आणि आपल्या सवडीनुसार आवडीदेखील ठरविल्या जातात. यादरम्यान अंगवळणी पडणाऱ्या खाण्याच्या योग्य सवयी वयोमानानुसार उद्भवणाऱ्या अनेक विकारांपासून दूर राहण्यासाठी मदत करू शकतात.

मासिक पाळीच्या वेळी अनेक जणी जेवणाचे प्रमाण कमी करतात आणि क्रेविंग होतंय (लाडीक खाण्यापायी ) म्हणून दिवसभर अतिरिक्त गोड़ पदार्थ खातात. मासिक पाळी सुरु असताना शक्य तितके ताजे अन्नपदार्थ, मुबलक पाणी , योग्य प्रमाणात प्रथिने आणि उत्तम झोप ही किमान पथ्ये पाळल्यास क्रेविंग खात्रीशीरपणे कमी होते.

आणखी वाचा: Health Special: नैसर्गिक वातावरण, भावना आणि मन:स्थिती यांचा खरंच काही संबंध असतो?

वय वर्ष २० ते ४० मधील महिलांनी शरीरातील कॅल्शिअम, जीवनसत्त्व ब , संप्रेरकांचे प्रमाण किमान सहा महिन्यातून एकदा रक्त तपासणी करून पाहणे आवश्यक आहे. खाण्याच्या बाबतीत शक्य असल्यास आहारतज्ज्ञांची मदत जरूर घ्यावी . याच वयोगटामध्ये आहारनियमनाचे प्रकार (दुर्दैवाने बहुतांश वेळा भलावण करणारे ), ट्रेंड्स यांचीदेखील तोंडओळख होत असते. अतिरिक्त उपास, फॅड म्हणून खाल्ले जाणारे कुपोषित पदार्थ, अतिव्यायाम किंवा कमी व्यायाम यामुळेखील शरीरातील संप्रेरकांवर परिणाम होऊन पोषक तत्त्वाचे प्रमाण कमी जास्त होत असते.

घरातील आहाराकडे लक्ष देणारा पण स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करणारा सगळ्यात मोठा वर्ग या वयोगटातील स्त्रियांचा आहे. योग्य धान्यांचे, तृणधान्यांचे सेवन करणे. वेगवेगळ्या भाज्यांचे प्रमाण योग्य प्रमाणात राखणे, लोह किंवा जीवनसत्त्वांचे प्रमाण कमी असल्यास ,योग्य फळे ,भाज्या यांचा आहारात समावेश करून त्यावर मात करणे, आहारातील प्रथिनांचे योग्य प्रमाण राखणे गरजेचे आहे.

चाळिशीनंतर शरीरात होणाऱ्या संप्रेरकांतील बदलांबद्दल योग्य माहिती करून घेणे. त्यासाठी योग्य रक्त तपासणी करून स्त्री-रोग तज्ञाकडून योग्य तपासणी करून घेणे आणि सल्ला घेणे आवश्यक आहे. आहाराबरोबर आवश्यक असल्यास योग्य पोषकतत्त्वे योग्य सल्ल्याने घेणेदेखील जरुरी आहे. रजोनिवृत्तीबरोबर हाडांची झीज होणे , मधुमेह , रक्तदाब यासारखे विकार होण्याची शक्यता वाढते. खरं तर याच वयोगटातील महिलांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण योग्य प्रमाणात राखणे आवश्यक आहे. याच दरम्यान कर्बोदकांचे किमान प्रमाण शरीरस्वास्थ्य वाढवू शकते . चाळिशीआधी नियमितपणे व्यायाम केल्यास रजोनिवृत्ती सुखकर होऊ शकते.

महिलांच्या आहारामध्ये जितकं महत्व पोषकतत्त्वाचं आहे तितकंच महत्त्व पाण्यालादेखील आहे. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर शरीरातील आर्द्रता राखत पोषक आहार घेणे महत्वाचे आहे.

मासिक पाळी सोपी करण्यासाठी काही मूलभूत सवयी अंगीकारणे आवश्यक आहे.

  • सकाळी उठल्यावर मनुका / केशर भिजवलेले पाणी पिणे.
  • तेलबियांचे नियमित सेवन करणे.
  • दिवसातून किमान एक वेळा बडीशेप किंवा सुंठ यांचे पाणी पिणे.
  • कॅमोमाइल किंवा जास्वदांचे फूल पाण्यात उकळून पाणी पिणे.
  • दिवसभरात किमान १ चमचा तुपाचे सेवन करणे.
  • किमान २ फळे नियमितपणे खाणे.