आरतीचे रोज डोके दुखायचे. सकाळी उठताना बरी असायची, जसजसा दिवस मध्यावर येई तिची डोकेदुखी सुरू व्हायची. संध्याकाळपर्यंत ती डोकेदुखीने त्रास व्हायची आणि तिला काहीकारू नये असे वाटायचे. कसेबसे घरातले आटोपून ती झोपायची. अनेक तपासण्या करून झाल्या. कशातही काही अॅबनॉर्मल सापडले नाही. सी.टी. स॒कॅन, एम. आर. आय., विविध रक्ताच्या तपासण्या सगळे झाले. डॉक्टर म्हणाले, ‘काहीतरी मानसिक आहे’.

माधव एक यशस्वी मध्यमवयीन उद्योजक. सहा महिन्यांपूर्वी त्याला हार्ट अॅटॅक आला. आपण इतकी आरोग्याची काळजी घेणारे, नियमित व्यायाम करणारे, कसलीही व्यसने नाहीत, तरी आपल्याला हार्ट अॅटॅक कसा आला असा त्याला धक्का बसला. आठवड्यातून दोन तीनदा तरी त्याला छातीत दुखते आहे असे वाटायचे. मध्येच धडधडायला लागायचे, घाम फुटायचा आणि तो ताबडतोब डॉक्टरांकडे जायचा. परत त्याच्या सगळ्या तपासण्या केल्या. डॉक्टर म्हणाले, ‘काहीही नाही. सगळे व्यवस्थित आहे. तुम्ही टेन्शन घेता आहात’.

आणखी वाचा: Health Special: सगळं संपवून टाकावं वाटतं तेव्हा काय विचार …
शलाका कॉलेजमध्ये जाणारी मुलगी. तिला गेल्या तीन महिन्यात तीन वेळा तरी रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्ये आणावे लागले. घरात तिचा समोर तिचा भाऊ आणि वडील यांचा काहीतरी वादविवाद सुरू असायचा. अचानक शलाका बेशुद्ध पडायची, त्या आधी काही मिनिटे जोरजोरात श्वासोच्छवास करायची, हात पाय वाकडे व्हायचे. घाई घाईने तिला हॉस्पिटलमध्ये आणायचे. तिच्या सुद्धा सगळ्या तपासण्या नॉर्मल. डॉक्टर म्हणाले, ‘ तिला काहीही शारीरिक आजार नाही, सगळे मानसिक आहे.’

तीन वेगळी उदाहरणे. पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये लक्षण शारीरिक, पण कोणत्याही शारीरिक आजाराचे निदान नाही. दुसऱ्या उदाहरणामध्ये शारीरिक आजार, पण लक्षण मानसिक. डोकेदुखीच्या कारणाचे अजून निदान झाले नसेल, त्याला मानसिक का म्हणायचे? शलाकाची लक्षणे कशामुळे आहेत ते अजून डॉक्टरांच्या लक्षात आले नसेल! माधवची लक्षणे तर हृदयाशी संबंधितच आहेत ना! मग तरी डॉक्टर असे कसे काय म्हणाले की, ही लक्षणे मानसिक आहेत? असे प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होऊ शकतात.

आणखी वाचा: Health Special: ‘मुलांच्या मोबाइलचं व्यसन सोडवायला हवं का?’ त्याआधी हे नक्की वाचा
शरीर आणि मन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अनेक शारीरिक आजारांमध्ये मानसिक विकार आढळतात. साधारण २० ते ६७% शारीरिक विकारांमध्ये मानसिक त्रास दिसून येतो. दिप्रेशांसारखा मानसिक विकार हृदयरोगाचे कारण असू शकते आणि तसेच हृदयरोग झाल्यावरसुद्धा डिप्रेशन येऊ शकते. बायपाससर्जरी नंतरही डिप्रेशन आढळून येते. अर्धांगवायूचा झटका येऊन गेल्यावर अनेकांना डिप्रेशनचा त्रास होतो. पार्किन्सनच्या आजारातही चिंता, उदासपणा आणि संशय अशी अनेक लक्षणे दिसतात.

शरीरिक व्याधी आणि मानसिक लक्षणे किंवा यांचा असा जवळचा संबंध दिसून येतो. डीमेंशिया सारख्या विकारामध्ये अनेक मानसिक लक्षणे दिसून येतात, उदा. संशय घेणे, आक्रमकता इ. अनेक वेळा शारीरिक व्याधीच्या स्वरूपाचा, तीव्रतेचा मनावर खोल परिणाम होतो. कर्करोगाचे निदान हे असे असते. आपल्याला कर्करोग झाला आहे, हे कळल्यानेच मनात भीती निर्माण होऊ शकते. आता काय काय उपाय करावे लागतील, मी बरा/बरी होईन का, किती दिवस आता आपल्या हाताशी आहेत असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात आणि मनाला पोखरू लागतात. किमोथेरपीसुरू करण्याआधी बऱ्याच वेळा संभाव्य दुष्परिणामांमुळे मनात अतिचिंता निर्माण होते.म्हणजे, एखाद्या शारीरिक विकाराचा स्वीकार करताना मानसिक संघर्ष होऊ शकतो.

अनेक शारीरिक व्याधी अशा आहेत की त्यांच्यवर मानसिक घटकांचा परिणाम होतो. मानसिक अस्वस्थता, मानसिक संघर्ष, मानसिक ताणतणाव आणि मानसिक विकार यांमुळे काही शारीरिक व्याधी सुरू होऊ शकतात, उदा. ब्लड प्रेशर(hypertension). मानसिक घटकांचा परिणाम होऊन पेशंट इलाज नीट घेत नाहीत, नियमितपणे औषधे गोळ्या घेत नाहीत आणि शारीरिक व्याधींची तीव्रता वाढते. उदा. मधुमेह. मग मधुमेह नियंत्रणात राहत नाही आणि त्याचे शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम होतात. काही वेळेस मानसिक ताणतणावामुळे शारीरिक आजार बळावतो आणि हॉस्पिटलमध्ये भारती करावे लागते, उपचारांना प्रतिसाद कमी होतो आणि आजारात गुंतागुंत (complications)निर्माण होऊ शकते.

मानसिक घटकांमुळे मानसिक विकार होतात जे शारीरिक लक्षणांद्वारे प्रकट होतात. जसे शलाकाचे उदाहरण. मानसिक विकार असलेली व्यक्तीही शारीरिक आजाराने ग्रस्त असू शकते. प्रत्येक लक्षण मानसिक नसते हे ही लक्षात ठेवावे लागते. त्यामुळे स्किझोफ्रेनियाच्या पेशंटला किडनीचा विकार होऊ शकतो, किंवा आधीपासून डिप्रेशन असलेल्या व्यक्तीचा डायबिटीसही तितकाच महत्त्वाचा असतो.

असा शरीर आणि मन यांचा आंतरसंबंध! अधिक माहिती पुढील लेखात.

Story img Loader