Fruits for Piles: मूळव्याध हा एक असा आजार आहे जो बहुतांश वेळा अवघड जागेचं दुखणं म्हणून ओळखला जातो. पण लाजेने किंवा फक्त निष्काळजीपणामुळे मुळव्याधाकडे दुर्लक्ष केल्यास नंतर याचा गंभीर त्रास जाणवू शकतो. मुळव्याधाचे मुख्य कारण ठरते बिघडती जीवनशैली. आहार व व्यायाम याचा योग्य तो ताळमेळ न बसल्यास पचनाच्या समस्या उद्भवतात व यातूनच मूळव्याध सुरु होतो. आहारात अधिक तळलेल्या व प्रक्रिया केलेल्या अन्नाचा समावेश असल्यास पचनाची समस्या आणखीन वाढू शकते व यामुळे मूळव्याधही गंभीर होऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामान्यत: गुदमार्गात तीन मोठ्या रक्तवाहिन्या असतात यांना वैद्यकीय भाषेत Hemorrhoidal Veins म्हणतात. या घड्याळ्याच्या काट्यानुसार ३,७ आणि ११ वाजल्याप्रमाणे स्थित असतात. अपचन, बद्धकोष्ठ यामुळे रक्तवाहिन्यांना सूज येऊ लागते व त्या फुगतात. यालाच मुळव्याध असे म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर रक्तवाहिन्यांना आलेली सूज आणि त्यामुळे तयार होणारा फुगवटा यालाच मूळव्याध अथवा पाइल्स म्हटलं जातं. मुळव्याधावर उपाय म्हणून थंडीच्या एक फळ अगदी रामबाण उपाय ठरू शकतो.

मुळव्याधावर पेरू कशी करतो मदत?

साओल हार्ट सेंटरचे संस्थापक व संचालकडॉ विमल झांझर यांच्या माहितीनीसार पेरूमध्ये अत्यंत कमी कॅलरीज असल्याने अतिवजन असणाऱ्या मंडळी सुद्धा याचे बिनधास्त सेवन करू शकतात. गुलाबी पेरूमध्ये अँटिऑक्सिडंट्स सत्व असतात ज्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास बराच कमी होतो. फायबरयुक्त पेरूने पचनप्रक्रिया सुरळीत होते. पेरूमधील व्हिटॅमिन ई हे डायबिटीजवर सुद्धा गुणकारी ठरू शकते. पेरूतील व्हिटॅमिन सी आतड्यांना स्वच्छ करण्यात मदत करते तसेच यामुळे विष्ठा शरीरातून बाहेर फेकताना होणारा त्रास सुद्धा कमी होतो.

हे ही वाचा<< Heart Attack: हार्ट अटॅकपासून करायचा आहे स्वतःचा बचाव? ‘ही’ औषधाची गोळी नेहमी जवळ ठेवा

आयुर्वेदाच्या माहितीनुसार, पेरू हा मुळव्याधावर प्रभावी उपाय आहे. पेरूमध्ये कॅलरीज खूप कमी असतात व फायबर मुबलक प्रमाणात असतात. फायबरमुळे पचनप्रक्रिया सुरळीत होते परिणामी मुळव्याधावर हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. पेरूचे सेवन सुद्धा विविध प्रकारे केले जाऊ शकते. अनेकांना माहित नसेल पण पेरूची चटणी, मुरंबा हे सुद्धा पदार्थ अगदी प्रसिद्ध आहेत.

( टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Piles can be cured with these fruits how to detox body faster in a day constipation and acidity svs