How To Choose & Clean Perfect Pillow: आजवर आपण हे जाणून असाल की तुमच्या उशीची निवड तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते, पण यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती, मानसिक आरोग्य आणि एकूणच ऊर्जा प्रभावित होते हे तुम्हाला माहित आहे का? तुमची उशी तुम्हाला थेट आजारी बनवत नसली तरी उशीमुळे शारीरिक अस्वस्थता आणि अन्य समस्यांची तीव्रता वाढू शकते. उशीमुळे नेमका आरोग्यावर काय प्रभाव होऊ शकतो हे जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ आर एच चौहान, ऑर्थोपेडिक सर्जन, भाटिया हॉस्पिटल मुंबई यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकाने योग्य उशीचा वापर न केल्यास, डोक्याला व मानेला योग्य आधार मिळत नाही त्यामुळे मानदुखी, चक्कर येणे आणि खांदे व शरीराच्या वरील भागात वेदना आणि सुन्नपणा जाणवणे असे त्रास होऊ शकतात.

जर तुम्ही पाठीवर झोपत असाल तर (सर्व्हीकल स्पाईन) गर्भाशयाच्या स्नायूंची नैसर्गिक वक्रता राखण्यासाठी उशी वापरणे महत्वाचे आहे. मात्र जास्त जाड उशा वापरल्याने अस्वस्थता, मानदुखी आणि वरच्या अंगात सुन्नपणा आणि अशक्तपणा येऊ शकतो. यामुळे एकंदरीत आराम आणि आरोग्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो.

डॉ श्वेतल गाढवी, वरिष्ठ सल्लागार, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, एचसीजी हॉस्पिटल्स, अहमदाबाद यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, योग्य व स्वच्छ उशी न वापरल्यास त्यात धुळीचे कण, बुरशी देखील जमा होऊ शकते. ज्यामुळे ऍलर्जी, दमा किंवा श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात, परिणामी वारंवार आजारी पडण्याची शक्यता असते.

उशीमुळे होऊ शकता आजारी, योग्य उशी कशी निवडावी?

डॉ. गढवी यांनी सांगितले की, तुमच्या शरीराच्या नैसर्गिक आकारानुसार (पोश्चर) नुसार मान व मणक्याला आधार देऊ शकणारी उशी निवडायला हवी. मेमरी फोम, लॅटेक्स, फेदर हे उशीच्या कापडांचे पर्याय सर्वोत्तम ठरतात. खरेदी करण्यापूर्वी उशीची चाचणी आवर्जून घ्या.

केवळ उशी निवडणेच नाही तर ती वेळोवेळी स्वच्छ करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. किमान १ ते २ आठवड्यांनी उशी कडक उन्हात वाळवायला हवी तसेच उशीच्या वापराच्या वारंवारतेनुसार निदान तीन- सहा महिन्यांनी उशी धुवून सुकवणे सुद्धा आवश्यक आहे.

हे ही वाचा<< धूम चित्रपटाच्या दिग्दर्शकांचा मॉर्निंग वॉकवेळी हार्ट अटॅकने मृत्यू; लक्षणे, जोखीम घटक व काय काळजी घ्यावी, वाचा

उशीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी उत्पादकांनी दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा. काही उश्या या मशीनमध्ये धुण्यायोग्य असतात तर काहींना स्पॉट क्लिनिंग म्हणजेच जिथे डाग पडले आहेत तेवढ्याच जागेवर गरम पाण्याने धुणे पुरेसे असते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pillow can make you sick cause pain and numbness in top body perfect way to choose and clean pillow how to clean takiya svs
Show comments