पिटीरियासिस अल्बा हा एक तसा फार सर्वसाधारण आजार आहे. तो विशेषतः लहान मुलांना होतो. या आजारामध्ये लहान मुलांच्या चेहऱ्यावर व कधीकधी बाकी अंगावरदेखील पांढुरके असे डाग येतात. हा आजार काही महिने राहतो. त्यानंतर तो निघून जातो. पण परत सहा महिने वर्षांनी तो परत येऊ शकतो. जशी मुलं आणखी मोठी होतात व साधारण पंधरा-सोळा वर्षाची होतात, त्यानंतर हा आजार निघून जातो.

आजाराचं कारण: या आजाराचं कारण एकदम शंभर टक्के माहिती नाही. पण हा आजार थंडी किंवा उकाड्यात तसेच हवेत जास्त कोरडेपणा किंवा जास्त  आर्द्रता असल्यास , जास्त सेंटेड साबण वापरला गेला, जास्त घट्ट व खरखरीत कपडे घातले गेले किंवा धुराचा संपर्क आला तर त्यामुळे होण्याची शक्यता जास्त असते. कित्येकदा हा आजार भाज्या व विशेषतः पालेभाज्या कमी खाल्यामुळे होतो असे सांगितले जाते. पण हे त्याचे खरे कारण नाही. अर्थात समतोल आहार हा कधीही चांगलाच. साधारण दोन ते पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. ज्यांना दमा असतो किंवा ज्यांना वारंवार शिंका येतात किंवा वारंवार सर्दी होते किंवा ज्यांना अंगाला खाज येणे किंवा एक्झिमा असा प्रकार असतो किंवा ज्यांची त्वचा मुळातच कोरडी असते, अशा मुलांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. हा आजार म्हणजे कोड नव्हे, तसेच कुष्ठरोगही नव्हे, पण तो खूप दिवस राहिल्यास त्वचारोगतज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. सर्वात महत्वाचे म्हणजे हा आजार संसर्गजन्य नाही.

whitish spots, Malassezia Furfur ,Pityriasis Versicolor
Health Special: शिबे टाळण्यासाठी काय कराल?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
Karuna Sharma Cried
Karuna Sharma : उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने ढसाढसा रडल्या करुणा शर्मा, धनंजय मुंडेंना म्हणाल्या, “तू राक्षस…”
Shivsena shinde candidate list
Shivsena Candidate List : शिंदेंच्या शिवसेनेची तिसरी यादी जाहीर; भाजपाच्या शायना एनसींनाही तिकीट, पाहा विधानसभेसाठीचे नवे शिलेदार
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : भाऊबीजेला अजित पवारांची वाट बघणार का? सुप्रिया सुळेंचं उत्तर, “प्रेम असतं तेव्हा…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

आणखी वाचा: Health Special: सारकोपेनिया म्हणजे काय?

आजाराची लक्षणे

हा आजार चेहऱ्यावर जास्त करून पाहायला मिळतो. गालांवर, कपाळावर, हनुवटी, मानेवर तसेच छाती, पाठ आणि हाता पायाचा वरचा भाग या ठिकाणी हा आजार जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. हे जे पांढुरके डाग असतात ते अस्पष्ट असतात. साधारण  एक  ते पंधरा एवढेही डाग येऊ शकतात. त्यांचे आकार साधारण एक ते चार सेंटीमीटर एवढे असतात व त्याची कडा एकदम स्पष्ट नसते आणि त्यांचा रंग पांढुरका ज्याला आपण व्हाईटीश रंग म्हणावा असा असतो. ते डाग थोडे कोरडे असतात. कधीकधी गालावर थोडी खाज येऊन तिथे नंतर फिकट गुलाबी डाग येतात व नंतर तिथे असे पांढरे डाग पडतात.उन्हाळ्यामध्ये व थंडीत जेव्हा आकाश निरभ्र असतं तेव्हा अधिक स्पष्ट वाटतात पण याचं कारण आजूबाजूची जी त्वचा आहे ती उन्हामुळे जास्त काळवंडते. त्यामुळे हे डाग जास्त स्पष्ट दिसतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चेहऱ्यावर किंवा अंगावर जर सफेद किंवा पांढुरके डाग असतील जे बरेच दिवस तसेच आहेत व हळू हळू वाढत आहेत तर ते कुष्ठरोगाचे तर  नाहीत ना याची त्वचारोगतज्ञाकडे जाऊन खात्री करून घेणे आवश्यक आहे. कोडाची सुरवात, उनाची ऍलर्जी, शिबे इ. आजारातही अस्पष्ट सफेद डाग येतात.

आणखी वाचा: Mental Health Special: स्किझोफ्रेनियाविषयी समज गैरसमज

घरगुती उपचार

तुम्ही घरच्या घरी खालील गोष्टी करू शकता. आंघोळीला फार  गरम पाणी घेऊ नये. अंघोळीसाठी एक तर नॉनसोप क्लीनसर किंवा मॉइश्चरायझिंग साबण  वापरावा उदाहरणार्थ पीयर्स  किंवा डव साबण  किंवा तुमचे डॉक्टर किंवा त्वचारोगतज्ञ तुम्हाला वेगळा साबण लिहून देतील तो वापरावा. आंघोळीनंतर हलक्या हाताने टिपावे.  जेणेकरून त्वचा जास्त  कोरडी होणार नाही. तसेच त्यानंतर व्हॅसलीन पेट्रोलियम जेली किंवा निविया क्रीम किंवा सुगंध नसलेले मॉइश्चरायझर क्रीम संपूर्ण  चेहऱ्याला लावावे.  कडक ऊन टाळावे. तसेच दिवसा सनस्क्रीन वापरावे. सनस्क्रीन हे बाहेर पडण्याच्या अर्धा तास आधी लावणे आवश्यक आहे व जास्त वेळ बाहेर असल्यास तीन तासानंतर ते पुन्हा लावणे आवश्यक असते.
आम्ही त्वचारोग तज्ञ या आजारात चेहऱ्याला लावण्यासाठी मॉइश्चरायझर देतो व फक्त डागांवर लावण्यासाठी ( गरज भासल्यास ) स्टिराईड मलम देतो. पण हे मलम डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व सांगितलेल्या कालावधी पुरतेच लावणे आवश्यक आहे. कारण त्याचेही दुष्परिणाम असतात.

पिटीरियासिस अल्बा हा तसा एक सर्वसामान्य आजार आहे व वर सांगितलेल्या घरगुती उपायांनी तो बऱ्यापैकी कमी होतो. पण तसे न झाल्यास डॉक्टरांकडे, विशेषतः त्वचारोगतज्ञाकडे जाऊन तपासणी करून घेणे कधीही चांगले. 

Story img Loader