Plant Milk Vs Cow Milk For Digestion:वनस्पती आधारित दूध हे गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. दुग्धजन्य पदार्थ सोडून सोया आणि बदामाचे दूध यांसारख्या ट्रेंडी पर्यायांकडे तरुण वळत आहेत. पण, वनस्पती आधारित दूधाचे दिर्घकाळ सेवन करणाऱ्यांपैकी काहींना पोटफुगीसारख्या आतड्यांसंबंधी समस्यांचा त्रास होत आहे असे समोर आले आहे.
“आतड्याच्या आरोग्याचा विचार केला तर काही लोकांना वनस्पतीच्या दुधाचाही त्रास होतो. प्राण्यांच्या दुधाबाबत काही लोकांना होणारी लॅक्टोज इंटॉलरन्सची समस्या असली तरी इतरांसाठी हे दूध जास्त आरोग्यदायी आहे”, असे फरीदाबाद येथील मेट्रो हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी संचालक डॉ. विशाल खुराणा सांगतात.
प्राण्यांचे दूध वनस्पती दुधापेक्षा कसे चांगले आहे? (How does animal milk score over plant milk?)
प्राण्यांचे दूध, विशेषतः गाईचे दूध, नैसर्गिकरित्या प्रथिने आणि कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि आयोडीनसारख्या प्रमुख पोषक तत्त्वांनी समृद्ध असते. प्रथिने आतड्यांमधील पेशींच्या वाढीस आणि दुरुस्तीस मदत करतात, कॅल्शियम पचनसंस्थेतील स्नायूंच्या आकुंचनाचे नियमन करण्यास मदत करते, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुरळीत होते. व्हिटॅमिन डी आतड्यांमधील रोगप्रतिकारक शक्तीचे नियमन करते, दाहकता रोखते आणि आतड्याच्या अस्तराच्या अखंडतेला समर्थन देते. आयोडीन थायरॉईडच्या कार्यात योगदान देते, जे अप्रत्यक्षपणे पचन आणि चयापचयावर परिणाम करते.
याउलट, वनस्पती आधारित दुधाला या पोषक पातळीशी जुळण्यासाठी अनेकदा फोर्टिफिकेशनची आवश्यकता असते आणि सर्व ब्रँड ते पुरेसे प्रमाण देत नाहीत.
लॅक्टोज मित्र आहे की शत्रू?
लॅक्टोज इंटॉलरन्समुळे प्राण्यांच्या दुधातील नैसर्गिक साखर (लॅक्टोज) याकडे बहुतेकदा नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते, परंतु जे लोक ते पचवू शकतात त्यांच्यासाठी, लॅक्टोज फायदेशीर असू शकते. जेव्हा लॅक्टोज आतड्यात न पचता पोहोचते तेव्हा ते आतड्यातील बॅक्टेरियाद्वारे किण्वनासाठी सब्सट्रेट म्हणून काम करते. सब्सट्रेट हा आतड्यातील बॅक्टेरियांना खाण्यासाठी “अन्न स्रोत” आहे. या किण्वन प्रक्रियेत ब्युटायरेट (butyrate), एसीटेट (acetate) आणि प्रोपियोनेट (propionate) सारखे शॉर्ट-चेन फॅटी अॅसिड (SCFAs) तयार होतात, जे दाहकता कमी करतात आणि चांगल्या बॅक्टेरियाचे संतुलन राखतात.
प्राण्यांच्या दुधात अद्वितीय बायोअॅक्टिव्ह संयुगे असतात, जे आतड्याच्या आरोग्यास समर्थन देतात. दुधाच्या ऑलिगोसॅकराइड्ससारखे (oligosaccharides) संयुगे प्रीबायोटिक्स म्हणून काम करतात, निवडकपणे फायदेशीर बॅक्टेरियांना आहार देतात, जे निरोगी आतड्यांचे वातावरण राखण्यास मदत करतात. मिल्क फॅट ग्लोब्युल मेम्ब्रेन (MFGM) आतड्यातील अडथळा मजबूत करते, हानिकारक पदार्थ रक्तप्रवाहात प्रवेश करण्यापासून रोखते. या स्थितीला ‘“leaky gut’ म्हणून ओळखले जाते.
वनस्पती आधारित दुधात लॅक्टोजची कमतरता असते, म्हणजेच प्राण्यांच्या दुधासारखे संभाव्य फायदे देऊ शकत नाही, विशेषतः लॅक्टोजचे प्रीबायोटिक प्रभाव देऊ शकत नाही.
वनस्पतींचे दूध खरेदी करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे? (What should we watch out for while buying plant milk?)
अतिरिक्त साखर टाळावी. अनेक व्यावसायिक वनस्पती आधारित दुधात चव सुधारण्यासाठी साखरेचा समावेश केला जातो. जास्त साखर आतड्यांमध्ये हानिकारक बॅक्टेरियांना पोसते आणि दाहकता आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) सारख्या आजारांचा धोका वाढवते.
मलईदार पोत आणि जास्त काळ टिकण्यासाठी, वनस्पती आधारित दुधात अनेकदा कॅरेजेनन (carrageenan ) किंवा पॉलिसॉर्बेट्ससारखे (polysorbates) अॅडिटीव्ह आणि इमल्सीफायर (emulsifiers ) असतात. हे आतड्याच्या श्लेष्मल थराला (mucous layer ) त्रास देऊ शकतात. आतड्याचे आवरण अधिक सच्छिद्र किंवा गळणारे बनते, ज्यामुळे विषारी पदार्थ, न पचलेले अन्न कण किंवा इतर पदार्थ आतड्याच्या आवरणातून रक्तप्रवाहात जातात, ज्यामुळे दाहकता होण्याचा धोका वाढतो. (च्यूइंग गम किंवा स्टार्चसारखे आतड्याच्या गतिशीलतेत बदल करू शकतात, ज्यामुळे पोटफुगी किंवा अस्वस्थता जाणवते. प्रिझर्व्हेटिव्हदेखील आतड्यातील बॅक्टेरियाचे संतुलन बिघडू शकतात, ज्यामुळे डिस्बिओसिस होतो.
प्राण्यांचे दूध, अधिक नैसर्गिक उत्पादन असल्याने, कमी अॅडिटीव्ह आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जची आवश्यकता असते, ज्यामुळे बहुतेक लोकांसाठी ते आतड्यांवर सौम्य होते.
ज्यांना अॅलर्जी आहे किंवा नैतिक कारणांमुळे वनस्पती आधारित दूध चांगले पर्याय आहे, त्यांच्यात प्राण्यांच्या दुधात असलेले अद्वितीय पोषक घटक आणि जैविकदृष्ट्या सक्रिय संयुगे नसतात, जे थेट आतड्यांच्या आरोग्यास समर्थन देतात. जर तुम्ही वनस्पती आधारित दूध निवडत असाल, तर तुमच्या आतड्यांच्या आरोग्यास चांगले समर्थन देण्यासाठी कमीत कमी प्रक्रिया केलेले प्रकार निवडा.ष्ट्या सक्रिय संयुगे नसतात जे थेट आतड्यांच्या आरोग्यास समर्थन देतात. जर तुम्ही वनस्पती-आधारित दूध निवडत असाल, तर तुमच्या आतड्यांच्या आरोग्यास चांगले समर्थन देण्यासाठी कमीत कमी प्रक्रिया केलेले प्रकार निवडा.