आजच्या काळात लोकांना प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिण्याची सवय लागली आहे. आपण बाहेर गेल्यावर कायम प्लास्टिकची पाण्याची बाटली सोबत ठेवतो किंवा विकत घेतो. पण, अशा प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी कितपत चांगलं असतं, याचा आपण फारसा विचार करत नाही. प्लास्टिक निसर्ग आणि आरोग्य या दोन्हींसाठी हानिकारक आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने शरीराला अनेक आजार होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता नुकत्याच समोर आलेल्या अभ्यासातून असे आढळून आले की, एक लिटर पाण्याच्या बाटलीमध्ये सुमारे दोन लाख ४० हजार इतके नॅनो प्लास्टिकचे तुकडे असतात, जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. हे कण इतके लहान आहेत की, ते मानवी रक्तातही प्रवेश करू शकतात. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि रटजर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासकांनी अमेरिकेत विक्रीस असणाऱ्या लोकप्रिय कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याविषयी अभ्यास केल्यानंतर हे पाणी आरोग्यास अपायकारक असल्याचे समोर आले. दरम्यान, एक लिटर प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीचा तुमच्या आतडे आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का? याच विषयावर दिल्ली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सचे डॉ. आलोकित गुलाटी यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

(हे ही वाचा : मनोज बाजपेयी रोज रात्री उपाशी का झोपतात? रात्रीचं जेवण वगळल्याने झपाट्याने वजन कमी होते? वाचा तज्ज्ञांचा सल्ला… )

डाॅक्टर सांगतात, “बाजारात वेगवेगळ्या रंगांच्या आणि डिझाइन्सच्या अनेक प्रकारच्या बाटल्या उपलब्ध आहेत, ज्याचा लोकं सतत आणि सर्रास वापर करत आहेत. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ठेवलेले पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. आजकाल आपल्याला मुख्यत्वे प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी मिळते आणि त्यात असलेले आरोग्यघटक वाढविण्यासाठी उत्पादक खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी त्यात जीवनसत्त्वे असल्याचे सांगतात. परंतु, हे अधिक हानिकारक आहे.”

संशोधकांनी असे सुचवले आहे की, आपण प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिऊ नये. जर तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल, तर मायक्रो प्लास्टिकमुळे तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो. बीपीए रसायने प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी पिऊन रक्तप्रवाहात प्रवेश करतात. अशा परिस्थितीत ते हृदय कमकुवत करते. याचा परिणाम शरीरातील रक्ताभिसरणांवरही होतो, असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. अंतर्ग्रहित सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक्स आतड्यात सहजपणे शोषले जातात. ते यकृतात नेले जातात, जिथे ते जमा होतात. हे कण यकृताच्या पेशी किंवा यकृताच्या पेशींना जळजळ आणि पेशींचा मृत्यू करतात. त्यामुळे फुफ्फुसात ते रक्तवाहिन्या आणि ऊतींचे नुकसान करू शकतात.

विविध अभ्यासकांनी हृदयाच्या आरोग्यावर अभ्यास केला आहे. अलीकडील अभ्यासात, हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी १५ रुग्णांच्या नमुन्यातून मिळालेल्या हृदयाच्या ऊतींमध्ये मायक्रोप्लास्टिकचे नमुने आढळले. वेगवेगळ्या हृदयाच्या ऊतींमध्ये नऊ प्रकारचे मायक्रोप्लास्टिक ओळखले गेले, ज्याचा आकार ४६९ मिमी व्यासापर्यंत पोहोचला. हे हृदयाच्या पेशींमध्ये (मायोकार्डिटिस) जळजळ उत्तेजित करतात आणि हृदयाचे आवरण घट्ट करतात, त्यामुळे ते हृदय गती आणि हृदयाच्या असामान्य लयीमध्ये बदल घडवून आणू शकतात. मायक्रोप्लास्टिक्स रक्तवाहिन्यांच्या एंडोथेलियमचे नुकसान करू शकतात, ज्यामुळे अडथळे येऊ शकतात. हे कण रक्तपेशींच्या क्रियाकलापात बदल करतात, ज्यामुळे गुठळ्या होण्याची प्रवृत्ती वाढू शकते, असे डाॅक्टरांनी नमूद केले.

त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. ही सवय आजपासूनच सोडा, अन्यथा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plastic in mineral water can a litre of plastic water bottle impact your gut and heart health pdb