Plastic Water bottle increase heart attack risk : तुमच्यापैकी बरेच जण ऑफिस, वर्कआऊटला जाताना प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी घेऊन जात असतील. इतकेच नाही तर शाळा, कॉलेजमध्ये जाणारी मुलंही पाणी पिण्यासाठी विविध स्टाइलच्या प्लास्टिकच्या बाटल्या वापरतात. पण, प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे तुमच्या ह्रदयासाठी धोकादायक ठरत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. इतकेच नाही तर क्लिंग फिल्ममध्ये गुंडाळलेल्या भाज्या, ऑनलाइन मागवलेले मासेदेखील तुमच्या ह्रदयासाठी हानिकारक ठरत असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे. प्लास्टिकची बाटली किंवा क्लिंग फिल्ममधील मायक्रोप्लास्टिक्स तुमच्या रक्तप्रवाहात तरंगते, ज्यामुळे ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका ४.५ पटीने वाढू शकतो, असेही या संशोधनातून समोर आले आहे.

इटलीच्या कॅम्पानिया विद्यापीठाच्या एका नवीन अभ्यासात आणि न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन (NEJM) मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, व्यक्तींच्या धमन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळून आले आहे. पाच मिलिमीटरपेक्षा कमी असेही प्लास्टिकचे तुकडे सापडले आहेत. डॉक्टरांनी ३०४ रुग्णांच्या धमन्यांमध्ये चरबी जमा होण्याचे प्रमाण तपासले, यावेळी ३०४ रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांच्या रक्तात मायक्रोप्लास्टिक्स आढळले. हे मायक्रोप्लास्टिक्स व्यक्तीच्या कॅरोटीड धमन्यांमध्ये आणि मुख्य रक्तवाहिन्यांत जमा होते; ज्यातून मान, चेहरा आणि मेंदूला रक्त पुरवठा होतो. इतकेच नाही तर या मायक्रोप्लास्टिक्समुळे तीन वर्षांत ब्लॉकेज आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!
New Spider Species Baner Hill, Baner Hill,
कोळ्याच्या नवीन प्रजातीचा बाणेर टेकडी येथे शोध, काय आहे वेगळेपण?

निष्कर्ष महत्त्वपूर्ण आहेत, कारण यातून स्पष्ट झाले की, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी मायक्रोप्लास्टिक हे अतिरिक्त जोखीम घटक आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे आपण खात असलेल्या प्रत्येक गोष्टीमधून नकळतपणे मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जात आहे.

मायक्रोप्लास्टिकमुळे शरीरावर काय परिणाम होतात?

एकदा का मायक्रोप्लास्टिक्स तुमच्या धमन्यांमध्ये गेले की, तेव्हा ते रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करण्यास सुरुवात करते. यामुळे दीर्घकाळ जळजळ होऊ शकते, ज्यामुळे कालांतराने रक्तवाहिन्यांच्या अस्तरांना नुकसान होते. यामुळे डोळ्यातून पाणी येऊ शकते, ह्रदयात ब्लॉकेज निर्माण होऊ शकतात. धमन्या संकुचित होतात. रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि ठराविक कालावधीनंतर हृदयविकाराच्या झटक्याचाही धोका संभवतो.

प्राण्यांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, शरीरात जमा झालेल्या मायक्रोप्लास्टिक्समुळे हृदयाच्या गतीत बदल होतो. यामुळे हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.

अलीकडील अभ्यासानुसार, एक लिटर प्लास्टिकच्या बाटलीत सात प्रकारच्या प्लास्टिकचे सरासरी २,४०,००० कण असतात. अशाप्रकारे २० लिटर पाण्याच्या कॅनमध्ये किती असतील, याचा विचार करा.

मायक्रोप्लास्टिक्स आपल्या शरीरात किती सहज प्रवेश करू शकतात?

जेव्हा आपण क्लिंग फिल्ममध्ये गुंडाळलेली फळे आणि भाज्या खातो आणि प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पितो, तेव्हा आपण नकळतपणे अनेकदा मायक्रोप्लास्टिक्स गिळत असतो. मायक्रोप्लास्टिक्स शरीरात पोहचवण्याचा पाणी हा सर्वात सोपा वाहक आहे. कारण ते गिळल्यानंतर पोटात जाते, यावेळी प्रक्रियेत त्याचे आणखी तुकडे होतात. याशिवाय सरोवरे, नद्या आणि समुद्रातील मासे, विशेषत: शेलफिश प्लास्टिक खातात, यानंतर जेव्हा आपण हेच मासे शिजवून खातो तेव्हा नकळतपणे प्लास्टिक आपल्या शरीरात जाते. अशाप्रकारे नकळतपणे आपण चुकून रोज प्लास्टिक गिळतो.

मायक्रोप्लास्टिक्सपासून दूर कसे राहता येईल?

सध्याच्या काळात मायक्रोप्लास्टिक्स पूर्णपणे काढून टाकणे कठीण असू शकते, परंतु इतर लोकसंख्येच्या तुलनेत गेल्या एक वर्षापासून हृदयविकाराचा धोका असलेल्या भारतीयांनी खाण्याच्या सवयीत काही बदल करणे आवश्यक आहे. नैसर्गिकरित्या पॅकेजिंग केलेल्या वस्तू निवडा, विश्वसनीय वॉटर फिल्टर वापरा, भाजीपाला थेट ऑफलाइन खरेदी करा, प्लास्टिकच्या वस्तूंपेक्षा काच, स्टील किंवा अगदी सिलिकॉनसारख्या वस्तूंचा वापर करा. प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये अन्न मायक्रोवेव्ह करू नका. पॉलिथिलीन (पीई) किंवा पॉलीप्रॉपिलीन (पीपी) सारख्या मायक्रोप्लास्टिक्स असलेल्या प्रोडक्टचे लेबलिंग तपासा.