Indian Breakfast Ideas: भारतीय ब्रेकफास्ट हा मुख्यतः कार्बोहायड्रेट युक्त असतो. आता कार्ब्स ही समस्या आहेच पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या आहारात प्रोटिन्स व अन्य पोषक सत्व कमी किंवा नगण्य प्रमाणात असतात त्यामुळेच आहारात संतुलन येत नाही. आपल्या आहारात विशेषतः ब्रेकफास्टमध्ये काही गोष्टी मिसळल्यास तुम्हाला सकस आहाराचे पोषण मिळू शकते. आज आपण कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथील मुख्य आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांच्याकडून पोहे, उपमा, डोसा, ढोकळा अशा पदार्थांमधील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१] पोहे बनवताना त्यात वाफवलेले मूग (स्प्राऊट्स) आणि भाज्या टाकून बनवल्यास प्रोटीन मिळण्यास मदत होऊ शकते. डाळीतील प्रथिने तृप्ति देतात आणि पचनाचा कालावधी त्यामुळे वारंवार भूक लागणे कमी होते. शिवाय भाज्यांतील फायबर हे पचनाचा वेग सुरळीत राखण्यास मदत करतात. एकत्रितपणे यामुळे जेवणानंतर रक्तदाब वाढणे टाळता येते.

२] उपमा/दलिया/शेवई उपमा/ओट्स उपमा पाण्याऐवजी ताक घालून बनवता येईल. सर्व तृणधान्यांमधील कार्बोहायड्रेट्स हे प्रथिने समृद्ध असलेल्या ताकामध्ये शिजवल्यास, मॅक्रोन्यूट्रिएंट्सचे चांगले संतुलन प्रदान करतात, यामुळे पोटाची तृप्ति आणि पचन सुधारते.

3] तुम्ही इडली किंवा डोसा पीठ तयार करत असताना तांदूळ आणि उडीद डाळ 3:1/4:1 ऐवजी 1:1/2:1 च्या प्रमाणात मिसळा.यामुळे तांदूळातील कर्बोदकांमधे आणि डाळीतील प्रथिने यांच्यात चांगले संतुलन निर्माण होईल.

४] पराठा बनवताना त्यात भरपूर भाज्या आणि डाळीचे पीठ घाला जे प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यास मदत करते.

5] चिला किंवा आंबोळ्या/पॅनकेक बनवण्यासाठी डाळीचे पीठ वापरा. यातून मुबलक प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स मिळू शकतात.

६] रवा ढोकळा बनवताना त्यात पाण्याऐवजी दही किंवा ताक वापरावे. रव्यात कार्बोहायड्रेट्स अधिक असतात, जे प्रथिने समृद्ध असलेल्या ताकमध्ये शिजवल्यास मॅक्रोन्युट्रिएंट्सचे चांगले संतुलन मिळते.

संशोधनात असे दिसून आले आहे की प्रथिनेयुक्त ब्रेकफास्ट (ज्यामध्ये निदान ३५ ग्रॅम प्रथिने असतील) तुम्हाला सतत भूक लागण्याचे प्रमाण कमी करू शकतात. यामुळे विशेषतः संध्याकाळच्या वेळी सुद्धा अशा प्रकारचा नाष्टा तुमच्या पोटाला तृप्ती देऊ शकतो. तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करणार असाल तर याचा फायदा होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poha dosa upma can be protein rich with these little changes can control diabetes hyper tension help to weight loss svs