Alcohol Addiction And Treatment : ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्टने दारूच्या व्यसनाबाबत एक भलीमोठी पोस्ट केली आहे. दारूच्या व्यसनापासून दूर राहून आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने ही पोस्ट केली आहे. ‘डॅडी’, ‘दिल है की मानता नही’ व ‘सडक’ यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयामुळे प्रसिद्ध झालेल्या पूजा भट्टने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर तिच्या आयुष्याशी संबंधित ही माहिती शेअर केली आहे.

पूजा भट्टने इन्स्टाग्रामवर एक सेल्फी फोटो शेअर करीत लिहिले, “मला दारूचे व्यसन सोडवून आता आठ वर्षे झाली आहेत.” धन्यवाद, दयाळूपणा, कर्म.” या पोस्टमध्ये तिने स्कॉटिश लेखक जोहान हॅरीचे उदाहरण देत लिहिले, ‘तू एकटा नाहीस. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.’ या भावनेने आपण व्यसनाधीन व्यक्तींशी सामाजिक, राजकीय व वैयक्तिकरीत्या वागले पाहिजे.

justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?

पूजा भट्ट पुढे लिहिले, “आम्ही व्यसनाधीन लोकांविषयी १०० वर्षांपासून द्वेषाची गाणी गात आलो आहोत. मला वाटते की, आपण अशा लोकांसाठी नेहमीच प्रेमगीते गायली पाहिजेत. कारण- अमली पदार्थांच्या व्यसनाचा विपरीत अर्थ वर्ज्य नसून, व्यसनाचा उलटा संबंध आहे – जोहान हॅरी..”

५२ वर्षीय अभिनेत्रीने तिच्या व्यसनाबद्दल अनेक वेळा सांगितले होते की, ती दारूच्या व्यसनाच्या जाळ्यात अडकली होती आणि त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग स्वीकारला तो म्हणजे स्वतःचा स्वीकार करा, असा विचार करून तिने दारू पिणे बंद केले.

पण दारू पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे हे माहीत असूनही अनेकांना दारू पिण्याचं व्यसन जडतं. अशा वेळी दारूच्या व्यसनापासून सुटका करून घेण्यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलचे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ.सुधीर कुमार यांनी काही उपाय सांगितले आहेत.

दारूचे व्यसन सोडवायचेय? मग हे चार उपाय नक्की वाचा, होईल फायदा!

१) दारूचे व्यसन सोडण्याची इच्छाशक्ती आणि प्रेरणा ठेवा.

२) तुम्ही नियमितपणे दारू पिण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ- नोकरीसंबंधित तणाव, आर्थिक समस्या, नातेसंबंधातील समस्या इ.

३) तुमचे दारू पिण्याचे व्यसन आणि ते सोडण्यासाठी तुम्ही करीत असलेल्या प्रयत्नांबाबत डॉक्टरांशी चर्चा करा.

४) दारू पिण्याची सवय हळूहळू कमी करा. कारण- ही सवय लगेच कमी करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला काही लक्षणं जाणवू शकतात. त्यामध्ये अस्वस्थता, चक्कर येणे, मळमळणे ही लक्षणं दिसू शकतात.

दारूच्या व्यसनावर थेरेपी आणि समुपदेशन गरजेचे

याबाबत तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. कारण- दारूच्या व्यसनावर थेरेपी आणि समुपदेशन हे खूप उपयुक्त ठरू शकते. यावर दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मिरा रोडमधील वोक्हार्ट हॉस्पिटलचे कन्सल्टंट इंटर्नल मेडिसिन डॉ. अनिकेत मुळे यांनी नमूद केले की, अशा परिस्थितीचा सामना करीत असलेल्या महिलांच्या सपोर्ट ग्रुप्सशी संपर्क साधा. कारण- हा एक चांगला उपयोगी पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्हाला दारूचे व्यसन सोडविण्यास मूदत होईल.

१) मानसोपचार तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्या. काही प्रकरणांमध्ये दारूच्या व्यसनापासून मुक्ती मिळविण्याच्या प्रक्रियेदरम्यान औषधे आवश्यक असतात.

हेही वाचा – लैंगिक संबंधांमुळे खरंच चांगली झोप लागते का? यावर डॉक्टरांचे काय मत आहे? जाणून घेऊ…

यात नाल्ट्रेक्सोन (Naltrexone) हे औषध दारू प्यायल्यानंतर निर्माण होणाऱ्या भावनांना रोखते आणि त्यामुळे पुन्हा दार पिण्याची इच्छा कमी होऊ शकते. डिसल्फिरामसारख्या औषधाच्या सेवनाने दारू प्यायल्यानंतर आजारी असल्यासारखे वाटते, असेही डॉ. कुमार म्हणाले.

३) दारूच्या व्यसनापासून मुक्ती मिळविण्यासाठी तुम्ही तुमचे आवडते छंद जोपासू शकता. कारण- तुमच्या आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवल्यास तुम्हीचे लक्ष इतर गोष्टींकडे तितके जाणार नाही.

४) चांगले मित्र-मैत्रिणी आणि नातेसंबंध जोपासा; ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक वाटू शकते.

Story img Loader