सणासुदीच्या दिवसांत किती प्रयत्न करूनही मिठाई, बिस्किट्स आणि इतर तेलकट, तिखट स्वादिष्ट पदार्थ खाण्यापासून स्वत:ला रोखता येत नाही. अंगवळणी पडलेल्या या सवयीमुळे तुमच्यापैकी बरेच जण या दिवसांत कसलाही विचार न करता, आवडती मिठाई प्रमाणापेक्षा जास्त खातात. त्यामुळे या काळात वजन पटकन वाढते. पण, तरीही आपण तेलकट, तूपकट पदार्थ, मिठाया, चिप्स, चिवडा ,लाडू असे मनाला तृप्त करणारे पदार्थ खाणे थांबवत नाही; ज्याचा परिणाम त्यावेळी दिसत नसला तरी काही दिवसांनी दिसून येतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात वाढलेले वजन कमी करण्यासाठी काय करता येईल याबाबत ”द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना आहारतज्ज्ञ डॉ. सिद्धांत भार्गव यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. भार्गव यांनी सांगितलेय की, खूप खाण्याची सवय असल्याने तुम्ही फॅड डाएट फॉलो केला किंवा कोणतेही उपाय केलेत तरी तुम्ही वजन कमी करू शकत नाही. उलट याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच एकदम खाण्याच्या सवयी बदलल्यास म्हणजे स्ट्रिक्ट डाएट फॉलो केल्यासही तुम्हाला अशक्तपणा, अॅनिमिया, कुपोषण, स्नायुदुखी यांसारखे त्रास जाणवू शकतात

त्यामुळे डिटॉक्स डाएट फॉलो करताना ते कमी, मध्यम व अधिक या क्रमाने केले पाहिजेत. त्यावर आहारतज्ज्ञांनी सणांमध्ये वाढलेल्या वजनाचा सामना करण्यासाठी तीन प्रभावी उपाय सुचवले आहेत.

१) साखरेचा वापर टाळा

वजन कमी करण्याचा प्रभावी उपाय म्हणजे साखरेचा वापर कमी करणे. कारण- साखर लठ्ठपणास कारणीभूत ठरणारा सर्वांत मोठा घटक आहे. आहारातून साखर काढून टाकल्यास वजन आणि रक्तातील साखरेची पातळीदेखील नियंत्रित राहते. आहारातून साखर कमी केल्यामुळे काही दिवस पदार्थ चवदार लागत नाही; परंतु त्यानंतर शरीर जुळवून घेऊ लागते. अशा परिस्थतीत तज्ज्ञ फायबर असलेली फळे आणि भाज्यांसारख्या नैसर्गिक साखर असलेल्या गोष्टींची निवड करण्याचा सल्ला देतात.

२) प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा

सणानंतर तेलाचे प्रमाण जास्त असलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कारण- त्यामुळे शरीरात चरबीच्या पेशी निर्माण होतात आणि एकूणच शरीरास पाण्याची गरज भासू लागते. अशा वेळी तुम्ही कर्ली केल, कोलार्ड ग्रीन, पालक यांसारख्या पालेभाज्यांचेही सेवन करू शकता; ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल. कारण- या फळ आणि भाज्यांमध्ये मॅग्नेशियम व लोह यांसारख्या पोषक घटकांचा समावेश असतो; ज्यामुळे संपूर्ण शरीराला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो.

कडधान्ये हा देखील प्रथिने, फायबर व कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचाही चांगला स्रोत आहे. त्यातील प्रथिने स्नायूंच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात.

३) हायड्रेटेड राहा

पुरेशा प्रमाणात पाणी पिऊन हायड्रेटेड राहणे आणि आतड्यांचे निरोगी ठेवण्यासाठी दह्यासारख्या प्रो-बायोटिक्सचे सेवन करा. त्यामुळे तुम्हाला शरीर प्रभावीपणे डिटॉक्स करण्यास आणि वजन कमी करण्याही मदत मिळू शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Post festival detox tips festive season nutritionist suggests mindful eating top ways to detox lose the weight gained during the festival season sjr