Post Meal Regime Before Sleeping: तुम्ही जेव्हा घरी मिक्सर वापरता, तेव्हा कधी वस्तूंनी काठोकाठ मिक्सरचं भांडं भरलं आणि अजिबात पाणी टाकलं नाही तर वाटण वाटायला वेळ लागतो. बरोबर ना? हेच जर तुम्ही भांड्यात वाटायचे पदार्थ घालून थोडी जागा ठेवली की वाटण पटकन बारीक होतं. हीच अगदी अशीच काहीशी अवस्था आपल्या पोटाची सुद्धा असते. जेव्हा तुम्ही पोटभर जेवताना १०० टक्के काठोकाठ पोट भरून टाकता तेव्हा पोटाला पाचनप्रक्रिया करण्यासाठी पुरेशी जागाच शिल्लक राहत नाही. आणि परिणामी पचन मंदावतं आणि मग त्याला जोडून येणारे त्रास आपल्यालाही माहित असतीलच. यामुळेच अनेक तज्ज्ञ सांगतात की आपल्याला पोटाच्या क्षमतेच्या किमान ५० ते ६० टक्के व कमाल ८० टक्के अन्नच ग्रहण करायला हवे.

शिवाय जेवणात तुम्ही किणत्या पदार्थांचा समावेश करता हे सुद्धा महत्त्वाचे आहे. प्रोटीन असो किंवा कार्ब्स कोणत्याही एकाच पोषक सत्वावर भर दिल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त होण्याचा धोका असतो. त्याऐवजी जर आपण फळे, भाजीपाला (फायबर), डाळी-शेंगा (प्रोटीन), भात- गहू (फायबर + कार्ब्स) असा चौरस आहार घेतला तर पोट भरल्यासारखे वाटते. सतत भूक लागतात नाही व मुख्य म्हणजे विनाकारण अतिखाणे टाळता येते. आता जेवताना काय काळजी घ्यावी, हे तर आपल्या लक्षात आले असेल. मग आता आपण डॉ मिकी मेहता यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, जेवल्यावर काय केल्याने तुम्हाला पाचनप्रक्रियेचा वेग वाढवता येईल हे सुद्धा आपण जाणून घेऊया ..

Arjun Bijlanis Wife Neha Swami make 14 kg Weight Loss
Arjun Bijlani’s Wife : पत्नी नेहा स्वामीने १४ किलो वजन कसे कमी केले? अर्जुन बिजलानीने सांगितले सीक्रेट; म्हणाला, “तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करत असाल…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!

जेवणानंतर ‘या’ सात चुका कधीही करू नका (Avoid 7 Mistakes Post Meal)

१) दिवसभर हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे परंतु जेवण करताना जास्त द्रव पिणे टाळा कारण ते पाचन स्राव पातळ करते. तसेच, तुमचा शेवटचा घास खाल्ल्यावर सुद्धा लगेच थंड पाणी पिऊ नये. यामुळे अन्न दीर्घकाळ पचत नाही आणि पोटाच्या/ आतड्यांच्या कानाकोपऱ्यात अडकून विषारी द्रव्ये वाढतात. जेवणानंतर किमान दोन तास पाणी न पिणे चांगले. हाच नियम चहा आणि कॉफीसाठी लागू होतो, या गोष्टींचे त्वरित सेवन आपल्या पचनामध्ये व्यत्यय आणू शकते. बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की गरम पेये अन्न चांगल्या प्रकारे खाली ढकलतात आणि आतड्यांना स्वच्छ करतात, परंतु जेव्हा ते जेवणानंतर लगेच सेवन केले जाते तेव्हा ते अधिक हानिकारक असू शकते.

२) दुसरी मोठी चूक म्हणजे जेवणानंतर भरपूर गोड खाणे. तुम्हाला गोड खाण्याची कितीही इच्छा होत असली तरी लक्षात ठेवा यामुळे पचन अत्यंत गुंतागुंतीचे होते.

३) रात्री उशिरा जेवण टाळा. झोपायच्या आधी किमान दोन तास, (शक्यतो तीन तास) जेवण उरकून घ्यावे. रात्री उशिरा जड जेवण किंवा अगदी स्नॅकिंगमुळे झोपेत व्यत्यय, अपचन आणि वजन वाढू शकते. झोपायच्या काही तास आधी हलके जेवण योग्य ठरते.

४) जेवल्यानंतर लगेच आडवे पडल्याने पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जेवणानंतर किमान ३० मिनिटे सरळ राहा किंवा हलक्या हालचाली करा. यासाठीच आहारशास्त्राच्या शतपावलीचा नियम नमूद करण्यात आला आहे.

५) रात्रीच्या जेवणानंतर चालण्यासाठी किंवा कोणत्याही तीव्र हालचाली करण्यासाठी किमान ३० मिनिटे ते एक तास प्रतीक्षा करा. हे तुमच्या शरीराला पाचक प्रक्रिया वाढवण्यास आणि ऍसिड रिफ्लक्सला प्रतिबंध करण्यास मदत करते. आपल्या शरीराकडे लक्ष द्या. खाल्ल्यानंतर तुम्हाला जड किंवा अस्वस्थ वाटत असल्यास, फेरफटका मारण्यापूर्वी बरे वाटेपर्यंत थांबा .खाल्ल्यानंतर लगेच उच्च तीव्रतेचा व्यायाम केल्याने वेदना होऊ शकतात.

६) जेवणानंतर मानसिक ताण किंवा ऑक्टेन हार्मोन वाढवणारे ‘युक्तिवाद’ टाळा कारण यामुळे पाचन प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.

हे ही वाचा<< अचानक हृदयाचे ठोके बंद पडल्याने होणारा मृत्यू टाळू शकतं ‘हे’ एक सोपे उपकरण; लॅन्सेटचा अभ्यास काय सांगतो? 

७) जेवणानंतर आंघोळ हे पचनासाठी खूप हानिकारक असू शकते, जेवण आणि आंघोळीमध्ये दोन तासांचा ब्रेक ठेवा.

वर नमूद केलेल्या चुका कदाचित आपल्याकडून अनेकदा होत असतील पण आजवर हेच केलं म्हणून पुढेही तसंच करायला हवं असं नाही. तुमच्या चुका म्हणण्यापेक्षा सवयी वेळीच बदलायला सुरुवात करा.