प्रसूतीनंतर अनेक महिलांचे वजन वाढते. काहीवेळी हे वाढते वजन कमी करणे आव्हानात्मक असते. यात स्वत:सोबत बाळाचीही विषेश काळजी घ्यावी लागत असल्याने महिल्यांना वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेळ मिळत नाही. काही महिला गर्भधारणेनंतर आपल्या आरोग्याकडे योग्यप्रकारे लक्ष देतात. मात्र काही महिलांना ते शक्य होत नाही, त्यामुळे त्या लठ्ठ दिसू लागतात. अनेकदा गर्भधारणेनंतर लठ्ठ दिसणाऱ्या महिलांना टोमणे मारले जातात, अशा परिस्थितीचा सामना करणाऱ्या महिलांसाठी मुंबईतील फोर्टिस हॉस्पीटलच्या सल्लागार आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संगीता रोडीओ यांनी महत्वाचे सल्ले दिले आहेत. ज्यात त्यांनी प्रसूतीनंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही आवश्यक माहिती दिली आहे.

प्रसूतीनंतर वजन वाढण्यामागे काय आहे कारण?

प्रसूतीनंतर अनेक महिलांचे वजन खूप वाढते. बाळंतपणात शरीरास भरपूर ऊर्जा लागते यात स्तनपानासाठीही शरीर तयार होत असते. यामुळे अनेक महिला कॅलरीयुक्त पदार्थ खातात. हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे काही महिलांना अतिरिक्त खाण्याची इच्छा होते. अशापरिस्थितीत वजन खूप वाढते, जे प्रसूतीनंतर कमी करणे अत्यंत कठीण होते. यात व्यायामाचा अभावामुळे लठ्ठपणाची समस्या जाणवू लागते. यामुळे गर्भधारणेच्या आधी असलेले वजन गर्भधारणेनंतर टिकवून ठेवणे शक्य नसते.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी

बऱ्याच महिला विभक्त कुटुंबात राहतात. ज्यामुळे बाळाची काळजी घेणे अवघड होते. बाळाची काळजी घेताना वेळ मिळत नसल्याने महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. घरातील कामे, बाळाचा सांभाळ आणि इतर जबाबदाऱ्या पार पडत असताना महिलांमध्ये व्यायामासाठी लागणारी ऊर्जा शिल्लक राहत नाही. काही महिला जास्तीत जास्त वजन कमी करण्यासाठी कोणत्या व्यायाम प्रकार केला पाहिजे आणि आहार कसा घेतला याकडे लक्ष देत नाहीत, परिणामी वजन आणखी वाढते. तर प्रसूतीनंतर बाळा घेऊन घराबाहेर पडता येत नसल्याने महिलांना घरातल्या- घरात राहून सर्व गोष्टी कराव्या लागतात. यामुळे जास्त शारीरिक हालचाली करता येत नाही. यामुळे प्रसूतीनंतर अनेक महिलांमध्ये थायरॉइट्स, मधुमेह, नैराश्य, खाण्यावरुन मन उडणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

गर्भधारणेनंतर व्यायाम सुरु करण्याची योग्य वेळ कोणती?

गर्भधारणेदरम्यान वाढलेले वजन कमी करण्यापूर्वी गर्भधारणेपूर्वी शरीराचे वजन किती होते हे विचारात घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे योग्यप्रमाणात वजन कमी करता येईल. प्रसूतीनंतर सर्व महिलांनी सहा आठवड्यांत त्यांचे बॉडी मास इंडेक्स किंवा बीएमआयसाठी मूल्यांकन केले पाहिजे. सहा आठवड्यांत त्यांचा बीएमआय 23 kg/m2 पेक्षा जास्त असल्यास त्यांनी आपल्या जीवनशैलीत बदल करत वैद्यकीय सल्लागाराचा सल्ला घेत वजन कमी करावे. ज्या महिलांची प्रसूती कोणत्याही गुंतागुतीशिवाय सुरळीत पार पडली त्या महिलांनी ४ ते ६ आठवड्यात शारीरिक हालचाली सुरु केल्या पाहिजेत.

ज्या महिलांची प्रसूती इमर्जन्सी सी- सेक्शन किंवा गुंतागुतीने झाली त्यांनी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत साधारणपणे ६ ते ८ आठवड्यानंतर व्यायाम सुरु करावा. सुरुवातीला चालण्यापासून सुरुवात करावी. यानंतर कमी प्रभावाच्या व्यायामांवर लक्ष केंद्रित करा. शरीराची शक्ती जसजशी वाढेल तसतसे स्नायूंना बळकट करणाऱ्या व्यायामांवर लक्ष केंद्रित करा.

प्रसूतीनंतर महिलांनी आहार कोणत्या पदार्थांचा समावेश करा आणि करु नये?

प्रसूतीनंतर महिलांना व्यायाम करणे शक्य होत नसेल तर त्यांनी सकस आहार घ्यावा. त्यांनी एक परफेक्ट डाइट प्लॅन तयार करावा. या प्लॅनमध्ये तुम्ही तुमच्या खाण्याच्या आवडीप्रमाणे, सवयीप्रमाणे बदल करावा. दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहारात समावेश करा. ज्यात दुपार आणि रात्रीचे जेवण आणि मधल्यावेळात भूक लागली तर स्नॅक्स खा. स्तनपानाची स्थिती, व्यायाम आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर योग्य लक्ष देत तुम्ही वजन कमी करु शकता.

यात महिलांनी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, शेंगा, मासे आणि शेंगदाणे यांचे योग्यप्रमाणात सेवन करावे. पण दुग्धजन्य पदार्थ आणि चिकन,मटन यांचे सेवन कमी करावे. निरोगी शरीर राखण्यासाठी आणि गर्भधारणेनंतर वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

प्रसूतीनंतरच्या अनेक महिला नैराश्येच्या शिकार होता, अशावेळी त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. यावेळी कोणत्या मानसिक विकाराचे निदान झाल्यास त्यावर योग्य औषधोपचार करावे. तसेच नवा डाईट प्लॅन तयार करावा.

Story img Loader